Tuesday, 20 May 2014

१२ सायन्स नंतर कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे ?

                  माझ्या विध्यार्थ्याची मुलगी ,नुकतीच तिने बारावी सायन्स ची परिक्षा दिली होती . पुढील शिक्षण कोणत्या प्रकारचे घ्यावे या संबंधी घरामध्ये चर्चा चाललेली होती . वडिलांचे मत होते तिने फार्मसीचे शिक्षण घ्यावे . तिचे म्हणणे होते कोम्पुटर किंवा आर्किटेक चे शिक्षण घ्यावे . 
                   माझा ज्योतिषाचा अभ्यास आहे हे त्याला माहित होते . एक दिवस त्याने मला फोन केला  व म्हणाला मला आपली भेट घ्यावयाची आहे केंव्हा येऊ? मी त्याला सकाळी १०=००  यायला सांगितले . त्याप्रमाणे तो सकाळी आला . बरोबर मुलीला घेऊन आला . थोडा वेळ इतर गप्पा मारल्यानंतर तो म्हणाला मी एका खास कामासाठी तुमच्याकडे आलो आहे . मी म्हटले काय काम आहे ? तो म्हणाला ज्योतिष विषयक एक सल्ला पाहिजे . मी म्हटले काय प्रश्न आहे ? हि माझी मुलगी नुकतीच तिने १२ वि  सायन्स ची परीक्षा दिली आहे . पुढील शिक्षण कोन्त्याप्रकाराचे घ्यावे या संदर्भात विचारणा करण्यासाठी आलो आहे .
                   मी हा प्रश्न दोन प्रकारे सोडविला . १ ) एल,एस आर डि ( रुलिंग )प्रमाणे  २) संख्या शास्त्रा प्रमाणे
     तिला एका कागदावर ४ पर्याय लिहिलायला सांगितले व प्रत्येकापुढे एक संख्या लिहायला सांगितली तिने खालीलप्रमाणे लिहिले

१) आर्किटेक   २) आय टी   ३) कोम्पुटर   ४ )फार्मसी   
       ०७               २००            १७८                   १७२

दिनांक १८ / ५ / २०१४  वेळ - १०. १५  या वेळेचे रुलिंग खालीलप्रमाणे 
१)   एल - चंद्र ,  एस -शुक्र ,   आर -गुरु ,   डी -रवि
एल-लग्नस्वामी , एस .. नक्षत्रस्वामी , आर ... राशिस्वामी , डी ...वाराचा स्वामी  संख्या शास्त्राप्रमाणे ----रुलिंग मधील लग्न स्वामी चंद्र आहे म्हणजे रास कर्क आहे . कर्क राशीचा क्रमांक ४ आहे . रुलिंग मधील नक्षत्रस्वामी शुक्र आहे . शुक्राच्या राशी दोन आहेत. वृषभ व तूळ  वृषभ हि दोन क्रमांकाची रास  व तुला हि ७ क्रमांकाची रास आहे म्हणून २+७ घ्या .  रुलिंग मधील राशी स्वामी गुरु आहे .गुरूच्या दोन राशी आहेत धनु व मिन धनु रास क्रमांक ९ व मिन राशीचा क्रमांक १२ म्हणून ९+१२ घ्या . रुलिंग मधील वरचा स्वामी रवी आहे रवीची सिंह आहे सिंह राशीचा क्रमांक ५ आहे .या सर्वांची बेरीज करणे खालीलप्रमाणे 

१)   चंद्र --कर्क राशी क्रमांक ---     ४
२)  शुक्र --वृषभ व तुल २+७----    ९
३)  गुरु ---धनु व मीन   ९+१२----२१
४)  रवि --- सिंह                   ----- ५
                                     ----------------
                                                    ३९
पर्याय फक्त ४ आहेत म्हणून ३९ या संखेला ४ ने भागिले बाकी ३ शिल्लक राहिली म्हणून तिसरा पर्याय कोम्पुटर हे उत्तर आले

२) तिने शाखेच्या पुढे ज्या संख्या लिहिल्या  आहेत त्यावरून  मी कृष्णमुर्ती कोष्टकाप्रमाणे राशी स्वामी , नक्षत्र स्वामी व उपनक्षत्र स्वामी काढले ते खालीलप्रमाणे आले 

१)  आर्किटेक ०७---  मंगळ --केतू -- गुरु 

२) आय टी   २०० --- शनि ---चंद्र --- बुध 

३) कोम्पुटर  १७८ ---गुरु ---शुक्र ---चंद्र 

४) फार्मसी   १७२ ----गुरु ---केतू ---राहू 

             यांची तुलना त्यावेळेच्या एल एस आर डि ( रुलिंग ) बरोबर केली . रुलिंग मधील ग्रह आहेत चंद्र शुक्र व गुरु  हे क्रमांक ३ च्या पर्याया बरोबर तंतोतंत जुळते म्हणून मी तिला सांगितले तुला कॉ म्पुटर या शाखेत प्रवेश मिळेल . 

                किंवा बी सी एस किंवा बी सी ए या शाखेमध्ये प्रवेश घेशील . कारण हि सुधा कोम्पुटर ची शाखा आहे . 

अशाप्रकारे दोन्ही पद्धतीने एकच उत्तर आले .

शुभम भवतु 

1 comment:

  1. सर जर पर्याय हे ग्रहांच्या बेरजेपेक्षा अधिक असतील तर..उदा. समजा एक व्यक्ती किती मतांनी निवडून येईल आणि 1 पासून 5000 पर्यंत असे घेतले तर ते कसे काढायचे

    ReplyDelete