Sunday, 29 June 2014

म्हैस आजारातून केंव्हा बरी होईल ?

                                                            आज एका आगळ्या वेगळ्या विषयावर लेखन करणार आहे . सातारा 

जिल्ह्यातील फलटण , माण खटाव हे दुष्काळ ग्रस्त तालुके आहेत . त्याल्यात्यात माण तालुका अतिशय 

दुष्काळ प्रवण तालुका . या तालुक्यात पावसाचे प्रमाण सरासरी ३५-४० सेमी . आहे . बहुतेक शेती पावसाच्या 

पाण्यावर अवलंबून आहे . त्यामुळे ठराविकच पिके काढली जातात . या तालुक्यात घरटी एक माणूस मुंबईला 

कामाला असते . किंवा सैन्यात भरती होते . 

                                                              त्यामुळे शेतीच्या जोडीला दुग्ध व्यवसाय किंवा मेढी पालन हा जोड 

धंदा केला जातो . प्रत्येक घरा गणिक २-३ दुभती जनावरे असतातच . या जोड धंद्यामुळे येथील जनता कसेबसे 
दोन घास खाऊ शकतात . दुग्ध व्यवसाय मुळे येथील जनता तग धरून आहे . म्हणून शेती बरोबर दुभती 

जनावरांची जास्त काळजी घेतात . 

                                                            असाच एक गरीब शेतकरी एक दिवस माझ्याकडे आला व मला 

म्हणाला माझी एक म्हैस २ महिन्यापासून आजारी आहे . ती दुध देत नाही . त्यामुळे घरात तारेवरची कसरत 

करावी लागते . माझी म्हैस आजारातून कधी बरी होईल ? असा प्रश्न मला विचारला . अश्या प्रकारचा प्रश्न 

सोडविण्याचा प्रसंग माझ्यावर पहिल्यांदाच आला . काही ज्योतिषी  उपाय म्हणून गंडे , ताईत , दोरे देतात हे 

मला माहित होते . पण त्यातले ज्ञान मला काहीच नाही . 

                                                           मी माझ्या कॉलेज मधील प्राध्यापकांना विचारले कि माणूस व पाळीव 
प्राणी यांच्या शरीर रचनेत काही फरक आहे का? त्यांनी सांगितले नाही . माणूस व पाळीव प्राणी यांच्यामधील 

 क्रिया सारख्याच असतात . फक्त पाळीव प्राण्याची ( गाय , बैल म्हैस ,कुत्रा ) यांची Efficiency जास्त आहे . 

आणि प्रेग्नसी पिरीयड वेग वेगळा असतो . गायी मध्ये २८५ दिवस व म्हैस मध्ये ३०० दिवस असतो  गाय 

बैल म्हैस आजारी पडल्यावर पशु वैध त्यांच्या ठराविक लक्षणावरून औषधोपचार करतात . तेही ठराविक 

आजारावर करतात . माणसाच्या बाबतीत जसे रक्त , मुत्र यांची तपासणी केली जाते तसे पाळीव प्राण्याची 

तपासणी केली जाते हे माझ्या  ऐकिवात नाही . किंवा त्यांची शस्त्रक्रिया केली जाते हे कोठे पाहण्यात नाही . 

किंबहुना माणसा सारखे आजार त्यांना होतात य़बधल मला कल्पना नाही . आणि या सर्व गोष्टी करायचे 

म्हटले तर त्याचा खर्च हि शेतकऱ्याच्या आवाक्या पलीकडचा असणार त्यामुळे शेतकरी त्या फंदात पडत 

नसावेत . अगदीच गंभीर आजार असेल तर त्यांची काळजी घेणेही शक्य होणार नाही . 

                                                        शेतकऱ्याच्या बोलण्यातून एक गोष्ट कळली ती म्हणजे म्हैस आठव्या 

महिन्यात व्याली होती . सर्व साधारण पणे म्हैसी चा प्रेग्नसी कालावधीत ३०० दिवस म्हणजे १० महिन्याचा 

असतो . दोन महिने अगोदर व्याल्या मुले गर्भाशयाला इजा झाली असेल का? हा विचार माझ्या मनात आला . 

ज्योतिष शास्त्रात शष्ट स्थानावरून पाळीव प्राण्याचा विचार करतात ( गाय , बैल , म्हैस कुत्रा ,शेळी मेंढी )

 मी मनात विचार केला हा प्रश्न सोडवून तर पाहू . शेतकऱ्याला एक २५० पानाचे पुस्तक दिले व सांगितले 

मनामध्ये माझी म्हैस आजारातून बरी केंव्हा होईल असा विचार कर आणि एक पान  काढ व उजव्या 

बाजूवरील पान क्रमांक मला सांग . त्याप्रमाणे करून त्याने मला १४५ क्रमांक सांगितला  १४५ नंबरवरून मी 

कृष्णमुर्ती प्रमाणे एक कुंडली तयार केली . 
     
हा प्रश्न मी  ९ जून २०१४ रोजी १०=३४=२२ वाजता अं १७,५९  रे ७४,२६ येथे सोडविला                                                
                                                      ह्या कुंडलीत शेतकऱ्याच्या मनातील विचार जुळतो का ते पाहू . 

चंद्र लाभ स्थानात आहे . म्हणजे षष्ठ स्थानापासून षष्ठ स्थानात . शष्ट स्थानावरून पाळीव प्राण्याचा विचार 

केला जातो चंद्र लाभ  स्थानात आहे म्हणजेच  म्हैस आजारी आहे हे नक्की झाले . 

षष्ठ स्थान पाळीव प्राणी म्हणजेच म्हैस . षष्ठ स्थान हे म्हैसिचे लग्न स्थान होईल . षष्ठ स्थान लग्न स्थान 

धरून कुंडली फिरवून घेतली आहे . 

                                                     म्हैसिचे लग्न मेष चर  तत्वाचे आहे  षष्ठ स्थान कन्या ०३,१३,१९ ने सुरु 

होते . षष्ठ स्थानाचा सब शनि आहे शनि म्हैस आजारातून बरी होणार कि नाही ते सांगणार आहे . शनीचे 

कार्येशत्व खालीलप्रमाणे ----
   शनि --७,११,गु दृ ४,१०,शु दृ १,८
  गुरु ---३,१०,४ क यु 
  बुध ---३,४ 
   राहू ---६,७ क यु शु १,८

      लग्न चर तत्वाचे आहे म्हणजे ११ वे स्थान हे बाधक स्थान होईल . शनि १,३,४,६,७,८१० ११  भावांचा 

बलवान कार्येश आहे शनि १, ४,( अंतिम स्थान ) ६,( आजार )८,(मृत्यू) १०,(इच्छा पूर्ती होणार नाही) 

११ ( बाधक स्थान )

षष्ठ चा सब शनि आहे म्हणजे दीर्घ मुदतीच आजार आहे . शनि  तुल राशीत सप्तमात आहे .व अष्टम स्थानारंभी 

आहे . (अंदाजे ५ अंश फरक )

षष्ठ चा सब शनि आहे ----दीर्घ मुदतीचे आजार 

शनि तुल राशीत आहे म्हणून ----पोटा खालचा भाग ,मूत्रपिंड , गर्भाशय , कटी भागाची हाडे . 

शनि तुल राशीत सप्तमात आहे ----स्त्री इंद्रिय , मूत्राशय, गर्भाशय , स्त्री अंडाशय , प्रोस्टट ग्रंथी 

शनि अष्टम भावारंभी आहे( ५ अंश ) ----प्रजोत्पादन इंद्रिये , मुत्र , बीजकोष , योनी मार्ग 

शनीचा नक्षत्र स्वामी गुरु आहे------ रक्त दोष , सूज येणे पांढऱ्या पेशी वाढणे ,कैंसर 

गुरु अष्टमात नवम  आरंभी -----मांडी ,जांघ , नाडी  / धमणी 

गुरु मिथुन राशीत ---- खांदे , हात ,फुफ्पुसे ,रक्त , श्वास 

शनीचा सब बुध ---मज्जातंतूचे विकार , अपचन ,भूक मंदावणे ,पोटदुखी , अतिसार 

बुध अष्टमात ---वरीलप्रमाणे 

शनीचा सबचा नक्षत्र स्वामी राहू लाभात ( लाभ स्थान --बाधक )व्यायारांभी राहू तुल राशीत  वरील प्रमाणे 

वरील निष्कर्ष वरून एक गोष्ट लक्षात येते म्हैसिला गर्भाशय , मूत्रपिंड, मूत्राशय चा विकार झाला आहे . प्रश्न 

वेळी मंगल  / मंगल  / शुक्र  ची दशा चालू होती . मंगल शुक्र दशा १७ जून २०१४ पर्यंत होती . मंगल शुक्राचे 

कार्येशत्व खालीलप्रमाणे 

मंगल ---                                         शुक्र ---१,८
चंद्र ---६,७ कयु राहू यु ६                    शुक्र ---१ ,८
शनि ---७,११                                    राहू --- ७
गुरु ---३,११,४ कयू                            मंगल --- ६, ९

मंगल ३,४,६,७, ११ या भावांचा व शकूर १,६,७,८ भावांचा बलवान कार्येश आहे . 

१ (लग्न ), ४ ( अंतिम क्षणं ), ६ ( आजार, रोग ) , ७ (मारक ), ११( बाधक ), ८ (मृत्यू )

नियम -- ज्यावेळी १,४,६,८,१२,मारक  बाधक भावांच्या दशा येतात त्यावेळी वाचण्याची शक्यता  कमी असते 

१७ जून  २०१४ पर्यंत . परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही . आजारातून  बरी होण्यासाठी षष्ठ  

   चा व्यय म्हणजे पंचम भावाची दशा यावयास हवी . त्यापुढील विदशा रवीची आहे रविचे कार्येशत्व पुढीलप्रमाणे 

रवि --२,५,३
मंगल ---६,९
राहू ---७ 
मंगल ---६,९

रवि विदशा पंचम भावाची बलवान कार्येश आहे . तसेच ९ भाव म्हणजे पंचमाचा पंचम  रवि विदशेमध्ये आजर 
बरा  होइल . रवि विदश १७ जून २०१४ ते ८ जुलै २०१४ पर्यंत आहे याच कालावधीत म्हैसी चा आजार बारा 

होईल असे सांगितले . 

                    त्यानंतर मी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही . असो 

महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

                 
                         दि . १२/७/२०१४ रोजी वरील लेखातील शेतकरी एका कामानिमित्त माझ्याकडे आले होते . 

त्यांना विचारले म्हैस कशी आहे ? ते म्हणाले तुम्ही सांगितलेल्या तारखेपासून तिच्यामध्ये खूप चांगला 

फरक पडला आहे खाणे व्यवस्थित चालू आहे , परंतु अधाप दुध देत नाही .  मी म्हटले ठीक आहे हळूहळू 

तिच्यामध्ये फरक पडेल . 

ज्यांच्या बोटाला धरून इथपर्यंत वाटचाल केली त्या मा . गोंधळेकर सर यांना वंदन करून इथेच पूर्णविराम देतो . 

4 comments:

 1. फारच छान उदाहरण आहे.

  संतोष सुसवीरकर

  ReplyDelete
 2. khupach chhan
  changli mahiti shikayla milali

  ReplyDelete
 3. कृष्णमुर्ती पद्धतीत अशेहि प्रश्न हाताळता येतात हे आपल्यामुळे कळाले
  चांगला प्रयत्न आहे

  ReplyDelete