कृष्णमूर्ति ज्योतिष

Saturday 26 November 2022

सब --चंद्र  सिद्धांत  किंवा सब चंद्र कनेक्शन थेअरी  

लग्नाचा उपनक्षत्र स्वामी किंवा सब हा कोणत्याही प्रकारे चंद्राशी संबंधित असावा .  

१) प्रथम भावाचा सब चंद्र असावा . 

२)  प्रथम भावाचा सब हा कर्क राशीत असावा . 

३)  प्रथम भावाचा सब च राशिस्वामी / नक्षत्र स्वामी हा चंद्र राशी स्वामी किंवा नक्षत्र स्वामी असावा 

४) प्रथम भावाचा सब चा राशिस्वामी व चंद्राचा नक्षत्रस्वामी एकाच असावा . 

५) प्रथम भावाचा सब चा नक्षत्रस्वामी व चंद्राचा राशिस्वामी एकाच असावा . 

६) प्रथम भावाचा सब चा राशिस्वामी / नक्षत्रस्वामी व चंद्राच्या राशिस्वामी /  नक्षत्रस्वामी  यांच्यामध्ये दृष्टी योग्य किंवा युतीत असावेत. 

७) प्रथम भावाचा सब चा राशिस्वामी / नक्षत्रस्वामी  तिसऱ्या  ग्रहाच्या माध्यमातून  चंद्राच्या राशिस्वामी किंवा नक्षत्रस्वामी शी संबंधित असावेत. 

८) दृष्टी अथवा युती साध्या  कुंडलीप्रमाणे पहावी.  

जन्मवेळेत याही पुढे अचूकता आणण्यासाठी कुटुंबातील सर्वांच्या कुंडल्या घ्याव्यात. ( जातक , जातकाचे आई , वडील, भाऊ , बहीण , बायको , मुलगा मुलगी ) 

जातकाच्या ४ भावाचा सब चा आईच्या पत्रिकेतीळ चंद्राशी वरील प्रमाणे संबंध असावा .  , जातकाच्या ९ व्या भावाचा सब चा वडिलांच्या पत्रिकेतील चंद्राशी वरीलप्रमाणे संबंध असावा . जातकाच्या ११ व्या भावाचा सब चा मोठ्या भावाच्या पत्रिकेतील चंद्राशी वरील प्रमाणे संबंध असावा . जातकांच्या ३ ऱ्या भावाचा सब चा धाकटी भावाच्या पत्रिकेतील चंद्राशी वरीलप्रमाणे संबंध असावा . जातकाच्या ७ भावाचा सब चा बायकोच्या पत्रिकेतील चंद्राशी वरील प्रमाणे संबंध असावा . जातकाच्या लाभाचा सब चा पहिल्या अपत्याच्या पत्रिकेतील चंद्राशी असावा . जातकाच्या प्रथम भावाचा सब चा जातकाच्या दुसऱ्या अपत्याच्या पत्रिकेतील चंद्राशी असावा. 

अशाप्रकारे नसेल तर जन्मवेळेत  मिनिटे (+)  किंवा (-) करून वेळ निश्चित  करावी 

अशाप्रकारे जातकाच्या पत्रिकेतील लग्न भावाची शुद्धी करता येते. 

जातकाचे लिंग खालीलप्रकारे ठरवावे ---स्त्री , पुरुष 

१)          जातकाचे पत्रिकेतील लग्न भावाचा सब सब हा विषम राशीत असेल तर पहिल्या १५ अंशापर्यंत पुरुष लिंग व नंतरच्या अंशात ( १५ पेक्षा जास्त ) असेल तर स्त्री लिंग समजावे . 

२)  जातकाचे पत्रिकेतील लग्न भावाचा सब सब हा  सम राशीत असेल तर पहिल्या १५ अंशापर्यंत स्त्री लिंग व नंतरच्या अंशात ( १५ पेक्षा जास्त ) असेल तर  पुरुष लिंग समजावे . 

अशाप्रकारे नसेल तर सब सब जुळवून घ्यावा .

No comments:

Post a Comment