कृष्णमूर्ति ज्योतिष

Wednesday 10 August 2022

मेडिकल प्रवेश ---

                              फेसबुक वरील लेख वाचून एका पालकांचा फोन ..... माझ्या मुलीने आता NIIT  ची परीक्षा दिली आहे . तिला मेडिकल जाण्याची खूप इच्छा आहे  आणि तिला खात्री वाटते तिला प्रवेश मिळेल. तरीसुद्धा मनात थोडी धाकधूक वाटत. आहे . ऍडमिशन  मिळेल कि नाही . प्रवेश  नाही मिळाले तर रिपीटेशन क्लास ला बसता येणार नाही. . सद्य रिपीटेशन चे क्लास सुरु झाले आहेत. मी विचारले रिपीटेशन क्लास म्हणजे काय ? म्हणाले ज्यांना NIIT परीक्षेत स्कोअ र होणार नाही असे वाटते.अशा मुलांचे पुढील वर्षासाठी क्लासेस  आतापासून  सुरु करतात. प्रवेश  मिळणार नसेल तर पुढील वर्षासाठी रिपीटेशन क्लास जॉईन करता येईल. ( म्हणजे पुन्हा फी भरायची ६०-७०,०००)

मी म्हटले मुलीकडे फोन द्या . मी हा प्रश्न नंबर कुंडलीनुसार सोडवायचे ठरविले. मुलीला  थोडक्यात नंबर कुंडली बदल माहिती सांगितली . मला मेडिकल प्रवेश मिळेल का ? असा विचार मनात करून  १ ते २४९ या मधील कोणतीही संख्या सांग . संख्या लकी नंबर असू नये.  . तिने ६५ हि संख्या सांगितली .  के.पी नंबर ६५ यावरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडल तयार केली . 

नियम--- ४ त्या भावाचा सब किंवा त्याचा नक्षत्र स्वामी  , लाभाचा (११) कार्येश असेल   त्याच बरोबर लाभाचा (११) सब ४ त्या भावाचा कार्येश असेल तर प्रवेश मिळे.ल . दोन्ही नियम लागू होत असतील तरच  प्रवेश मिळेल. ४ त्या भावाचा सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा . ४ थ्या  भावाचा सब वक्री असला तरी चालेल ,फक्त त्याचा नक्षत्र स्वामी वक्री नसावा . ४थ्या  भावाचा सब वक्री  ग्रहाच्या नक्षत्रात असून  आणि लाभाचा कार्येश असला तरी प्रवेश मिळत नाही . 

दि --८ / ८ /२०२२   वेळ--१२=०५-५७

हि कुंडली कर्क लग्नाची आहे . ज्यावेळी कुंडलीचे कर्क लग्न असते त्यावेळी होकारार्थी उत्तर द्यावे असा एक संकेत आहे . पण हा शॉर्टकट झाला. प्रत्यक्षात कुंडलीवरून काय येते ते पहिले पाहिजे . म्हणून मी कुंडली पाहायला सुरुवात केली . नियमानुसार ४ थ्या भावाचा सब गुरु आहे आता गुरु वक्री  आहे . एक निरीक्षण ज्यावेळी शिक्षणासंबंधी प्रश्न असतात गुरु किंवा बुध ची उपस्थिती असते . गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे --

गुरु-- 

शनी(व)---८ , ७ , ८ क.यु दृष्टी २ , १० , 

राहू--१० , मंगल १० ,दृ चंद्र ५ ,६ क यु दृ २

शुक्र ---१ , ११

गुरु २,५,६,७,८,१० ११ चा कार्येश आहे गुरु ११ भावाचा कार्येश आहे परंतु गुरु स्वतः वक्री असून शनी ह्या वक्री ग्रहाच्या नक्षत्रात आहे . 

लाभाचा सब राहू आहे . राहू चे कार्येशत्व ----

राहू--१०,११ क .यु मंगळ १०, दृ चंद्र ५

शुक्र --१, ११, दृ ७

शनी---८ क यु 

मंगळ ... १०, दृ चंद्र ५,, ११

लाभाचा सब राहू ४ चा कार्येश नाही .

सबब ह्या मुलीला मेडिकल ला प्रवेश मिळणार नाही. हे खात्रीपूर्वक सांगता येईल .( नियमानुसार ) पुन्हा पुढील वर्षी प्रयत्न करावा . असे सांगितले . अद्याप प्रवेश सुरु झाले नाहीत. घोडे मैदान जवळच आहे . प्रवेशासंबंधी कळले कि आपणाला कळवीनचं . असो .... खरे तर असे प्रश्न ज्योतिषाच्या माध्यमातून सोडवावेत का ? उत्तर होय आले तर ठीक आणि उत्तर नाही आले तर मुलगा मुलगी , चे मानसिक खच्चीकरण होऊ शकते . त्यांना टेन्शन येते. अशी मुले डिप्रेशन  मध्ये गेली  तर लवकर उभारी घेत नाहीत. कारण हल्लीच्या मुलांच्यामध्ये सहनशीलता खूप कमी आहे . तिने जी संख्या  सांगितली ती म्हणजे ६५. या संख्येतून काय अर्थ बोध होतो. ६ भावावरून रोग आजार चा बोध होतो. ५ यावरून औषधोपचार आणि दोघांची बे रीज केली तर ११ येते म्हणजे इच्छापूर्ती. सादर जातकाची मेडिकल ला जाण्याची खूप इच्छा आहे असे दिसते. आता थोडा वेगळा विचार केला तर -- NIIT  परीक्षा हि एक स्पर्धा परीक्षा च आहे . ६५ या संख्येवरून ---सुरवातीला ६ हि संख्या आहे म्हणजे प्रतिस्पर्ध्यावर विजय असे म्हणता येईल . परंतु त्यानंतरचा ५ हि संख्या समोरच्याला लाभदायक राहील. थोडक्यात काय  तर प्रवेश मिळणार नाही .. अजून एक ह्या मुलीची MBBS  ला च जाण्याची आहे . ४ भावाचा सब किंवा त्याचा नक्षत्र स्वामी स्थिर राशीत असेल तर MBBS  ला ऍडमिशन मिळेल. पण याठिकाणी ४ चा सब गुरु मिन राशीत व त्याचा नक्षत्र स्वामी शनी मकर राशीत आहे मिन रासं  द्विस्वभावी व मकर हि रास चर तत्वाची आहे येथे कोठेही स्थिर राशीचा संबंध आलेला नाही

. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ ऑगस्ट ला मी सांगितले प्रवेश मिळणार नाही. ७ सप्टेंबर ला निकाल लागला त्यात तिला खूपच कमी मार्क मिळाले . एम बी बी एस ला ऍडमिशन मिळणार नाही ह्याची तिला खात्री झाली . पुन्हा तिने प्रयत्न करायचे ठरविले आहे .  .  महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

शुभंम भवतु  !!!

No comments:

Post a Comment