Monday, 25 February 2019

विवाह --वैवाहिक जीवन
                                                जवळजवळ ९९ टक्के लोकांचे विवाह होतात. पण सर्वांचे वैवाहिक सौख्य समाधानकारक असतेच असे नाही. वैवाहिक सौख्य समाधानकारक म्हणजे नेमके काय ? याची व्याख्या काय होऊ शकेल ? वैवाहिक सौख्य यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो.? मला वाटते यामध्ये एकमेकांचे स्वभाव, आवडीनिवडी, समजूतदारपणा , एकमेकांवरील विश्वास , एकमेकांबद्धलचे आकर्षण , प्रेम, एकमेकांबध्दल वाटणारी आस्था, आत्मीयता लैंगिक  सौख्य, निष्ठा , विचारांचे स्वातंत्र्य  विचारांची देवाणघेवाण , सुसंवाद यासगळ्यांचा परिपाक म्हणजे वैवाहिक सौख्य . फेसबुकवर पदार्पण केल्यापासून एक गोष्ट लक्षात आली . ५० टक्के लोकांचे वैवाहिक सौख्य याबदल  समस्या आहेत. याची करणे सुद्धा खूप असू शकतील  सद्याच्या काळात विवाहाचे प्रकार वेगवेगळे दिसून येतात या मध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज , लिव्ह इन रिलेशनशिप,यामध्ये जबाबदारी टाळण्याकडे प्रवृत्ती दिसून येते . यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले दिसून येते. आहे .
              सर्वच पालक मुलामुलींचे शिक्षण संपले , नोकरीमध्ये स्थिर स्थावर झाले कि वधू --वर संशोधनाला सुरुवात करतात. वधू -वर सूचक मंडळामध्ये नाव नोंदवितात . नाव नोंदविले कि स्थळे यायला सुरुवात होते.
बऱ्याच वेळा असे घडते कि कधी पत्रिका जुळते , मुलगा मुलगी पसंत पडत नाहीत, कधी पसंती झाली तर पत्रिका जुळत नाहीत. हल्ली मुलांपेक्षा मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत . त्यातूनही मुलींच्या  Biodata मध्ये अपेक्षा या सदरात एक शब्द आवर्जून लिहिलेला असतो तो म्हणजे  Well Settled . मुली असा विचार करत नाहीत कि त्यांचे वडील त्यांच्या विवाहाच्या वेळेला well settled होते का ? आज पालकवर्ग सुद्धा सासरी मुलीला कोणत्याच प्रकाराचे कष्ट पडू नयेत म्हणून संसाराला लागणाऱ्या सर्व गोष्टीची पूर्तता करतात . सद्याच्या काळात  स्त्री पुरूष समान  धरले जातात  . आणि हे असलेही पाहिजे. पालक म्हणतात आमच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण नगण्य होते . त्या काळात स्त्रीची दोनच कर्त्तव्य होती  चूल आणि मूल . आता काळ बदलला आहे . लोंकाच्या गरजा  वाढल्यात . एकाच्या पगारात भागात नाही . स्त्रियांच्यात शिक्षणाचे प्रमाण वाढते आहे .  . त्यामुळे तिच्या अपेक्षाही वाढल्या आहेत . अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नोकरी करण्याकडे कल  वाढत आहे . असे असून सुद्धा स्त्रीवर अन्याय होताना दिसून येतो .  यात पुरुषांचा अहं आडवा येतो. दोघे ही नोकरी करत असतात. कोणाचे कोणावाचून अडत नाही . ह्या विचारला जेंव्हा बळकटी प्राप्त होते तेंव्हा त्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे घटस्फोट .घटस्फोट झाल्यानंतर खंबीरपणे उभे राहणाऱ्या स्त्रियांचे  प्रमाण खूप अल्प आहे. कारण घटस्फोटित स्त्री कडे समाज वक्र दृष्टीनेच पाहत असतो . हे बदलणे काळाची गरज आहे .
                              मी  कृष्णमूर्ती ४ स्टेप  थेअरीने पत्रिकेचे विश्लेषण करतो. कृष्णमूर्ती पद्धती ( ३ स्टेप ) नुसार बऱ्याच वेळा विवाह होईल असे वाटते परंतु होत नाही , याचे कारण ४-स्टेप पद्धती मधून कळते . आतापर्यंत ३-४ पायरीला विरोधी भावाचे कार्येशत्व असेल तर बहुतेक वेळा विवाह होत नाही असे मी आजपर्यत समजत होतो. परंतु काही अशाही कुंडल्या पाहण्यात आल्या कि विरोधी भाव असताना सुद्धा  विवाह झाले आहेत.विवाह करणे हे उद्दिष्ट नसते तर तो पुढे २५-३० वर्षे टिकावा हे महत्त्वाचे असते .  विवाह झाला आणि दोन महिन्यात, सहा महिन्यात, किंवा वर्ष दोन वर्षात मोडला  तर त्याला विवाह झाला असे म्हणता येईल का ?

           

वैवाहिक सौख्य....
                                       कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ७ चा सब २,७,११,५,८ भावाचा कार्येश असेल तर विवाह होतो पण याचे विरोधिभाव  असतील तर  म्हणजे १,४,६,१०,१२ विवाह होत नाही असे आत्तापर्यंत आपण म्हणत आलो आहोत. परंतु माझ्याकडे अशा काही कुंडल्या आहेत की विरोधी भाव असताना सुधा विवाह झाले आहेत परंतु त्यांच्या नशिबात वैवाहिक सौख्य नाही. काहींचे विवाह झाले नाहीत. बऱ्याच वेळा असे आढळून येते की विवाहाचे योग असताना सुधा विवाह होत नाही यामध्ये आपले काहीतरी चुकत असावे किंवा जातकाकडून  तसे प्रयत्न होत नसावे. याठिकाणी प्रयत्न आणि प्रारब्ध यांची सांगड घातली पाहिजे असे मला वाटते. आपण एखाद्याला सांगितले की अमुक काळात योग आहेत आणि त्यादृष्टीने त्याने प्रयत्न केलेच नाहीत तर आपल्या सांगण्याला काहीच अर्थ राहत नाही.मी ज्या कुंडल्या पहिल्या त्या खालीलप्रमाणे ....

( गोपनीयतेच्या कारणास्तव तारीख ,वेळ दिली नाही )
एक कुंडली...

७ चा सब शनी रुलिंग  प्रमाणे शनी बरोबर आहे.
शनी..८,१२,र यू ८,६
शनी...८,१२ र यू ८,६
बुध...९,४,९ क.यू ३
बुध...९,४,९ क.यू. ३

या पत्रिकेत ७ च सब ४,६,८,१२ या प्रतिकूल भावाचा कार्येश आहे त्यातल्यात्यात ३,९ भाव दुय्यम आहेत.तरीसुद्धा हिचा विवाह झाला आहे. एक मुलगा पण आहे.परंतु नवऱ्याचे पूर्ण दुर्लक्ष .  पती पत्नी मध्ये संवाद असा फारसा होतच नाही.वैशिष्टय म्हणजे विवाह झाला त्यावेळी २,७,११,५,८ हे भाव अनुकूल होते त्याच बरोबर ४,६,१२ हे भाव पण होते.मी एवढेच म्हणालो तुम्ही स्वतः चे अर्थार्जन पाहा. तिचे शिक्षण झाले आहे.  तुम्ही नोकरीचे प्रयत्न करा.  थोडाफार तरी संसाराला हातभार लावत येईल. ही स्त्री काही काळ  माहेरी होती. परत सासरी आली .कारण माहेरी थांबून तरी काय करू आई वडील थकले आहेत. भाऊ , भावाचा संसार तो किती साथ देईल याबद्दल शंकाच आहे आणि शिवाय समाज माझ्याकडे वक्र दृष्टीनेच पाहणार. म्हणून सासरी आले निदान मुलाला तरी आधार मिळेल.
उदा.२
७ चा सब गुरु
गुरु रुळींग प्रमाणे  बरोबर आहे .
गुरु...
शुक्र...५,१०,११,६ क.यू
शुक्र...६ क.यू
चंद्र...६

या पत्रिकेत ३-४ पायरीला  ६ हा भाव पूर्ण विरोधी आहे. तरी सुधा हिचा विवाह झाला आहे.
एक मुलगा  आहे.नवरा एका दुकानात कामाला आहे.  हा कधी पैसे देतो कधी देत नाही. ८-८ दिवस ही व्यक्ती बाहेर जाते कोठे जाते माहीत नाही. पती पत्नी मध्ये संवाद शून्य. . कामावरून घरी आला की मोबाईल वर बोलत असतो . . माझ्याकडे , मुलाकडे अजिबात लक्ष नसते.ही शिकलेली आहे , ट्युशन घेते आणि संसार चालवत असते.
उदा..३
स्त्री..वय वर्षे ४०
रूलिंग....शनी*, गुरु मंगळ, बुध रवी
७ चा सब बुध
बुध...१०,४,११ क.यू
रवी..१०,६
बुध...१०,४,११ क.यू
रवी..१०,६

३-४ पायरीला पूर्ण विरोधी भाव , विवाह नाही. सप्तम भावारंभी प्लूटो.
ही म्हणते मला विवाह करायचा आहे. आता मी काय सांगू हिला.?
मी तिला सांगितले विवाहाचा विचार सोडून द्या. होण्याची शक्यता फार कमी आहे. स्वतः चे अर्थार्जन पाहा.
या पूर्वी तिने अनेक नोकऱ्या केल्या आहेत.



उदा..४
स्त्री..
 हिने एका मुलाबरोबर परस्पर  नोंदणी पद्धतीने विवाह केला. काही  दिवसात मुलाकडील  लोकांनी   कायदेशीररित्या मुला मुलीला वेगळे केले. त्यानंतर हिच्या घरच्यांनी  नात्यात च हिचा विवाह केला . परंतु नवरा नपुसंक . ही म्हणते मी काय करावे आता . ती माहेरी निघून आली.
७ चा सब गुरु आहे रुलिंग  प्रमाणे बरोबर आहे.
गुरु..
शुक्र..१०,६,७,११
शनी...४ क.यू.
शनी...४ क.यू.

गुरु ३-४ पायरीवर पूर्ण विरोधी आहे तरी सुधा विवाह झाला आहे.परंतु वैवाहिक सौख्य नाही.

उदा..५
ही पत्रिका२०१२ ला माझ्याकडे आली.  पालक म्हणाले माझ्या मुलीचा विवाह योग केंव्हा आहे ?
या पत्रिकेत ७ चा सब गुरु आहे
गुरु...
बुध...८,११
बुध...
शनी...४,६
गुरु ३-४ पायरीला  पूर्ण विरोधी भावाचा कार्येश आहे . त्यामुळे आज पर्यंत विवाह झाला नाही.

उदा..६
या पत्रिकेत ७ चा सब शनी आहे
शनी...४,११,१२,५ क.यू चंद्र दृष्ट ४
शनी...४,११,१२,५ क.यू चंद्र दृष्ट ४
केतू...
रवी ...६

शनी ३-४ पायरीला पूर्ण विरोधी आहे. याला सबची प्रतिकुलता म्हणतात. विवाह झाला नाही.

उदा. ७
या पत्रिकेत लग्नाचा सब  केतू आहे . चंद्राचा नक्षत्र स्वामी केतूच आहे म्हणजे पत्रिका बरोबर आहे
सप्तमाचा सब केतू आहे केतुचे कार्येशत्व ....
PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 12       Rashi-Swami Mercury 2   1 4
It's N.Swami :-------- Jupiter:- (2)   7 (10)
It's Sub :------------ Jupiter:- 2   7 10
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (12)      Rashi-Swami Mercury (2)   (1) (4)
Itself aspects :------ 7

केतू मिथुन ह्या द्विस्वभाव राशीत आहे . मिथुन रास  हि वंध्या रास आहे . केतू गुरूच्या नक्षत्रात आहे, गुरूच्या सब मध्ये आहे . गुरु सिंह ह्या वंध्या राशीत आहे . ज्यावेळी विवाहाचा संबंध वंध्या राशीशी येतो त्यावेळी विवाह एक तर होत नाही किंवा वैवाहिकसौख्य  नसते . केतू १,२,४,१०,१२ या भावाचा कार्येश आहे . यातील २ भाव अनुकूल म्हणून विवाह झाला आहे 
भाव २ बरोबर १,४,१०,१२ हे विरोधी भाव सुद्धा कार्यान्वित झाले आहेत व केतू वर नेपच्यून ची दृष्टी आहे . सद्य हिची घटस्फोटाची केस चालू आहे हीच दुसरा विवाह होईल का .? सप्तमाचा सब हा बुधाशी ,अथवा द्विस्वभाव राशीशी संबंधित असेल आणि २,७,११ चा कार्येश असेल तर द्वितीय विवाह होईल . येथे ७ चा सब केतू मिथुन ह्या  बुधाच्या  द्विस्वभाव राशीत  आहे म्हणून दुसरा विवाह होऊ शकतो . दशेमध्ये २,८,११ हे भाव असावेत
चंद्र मंगल शनी २, ८ भावाचे कार्येश आहेत चंद्र मंगल डिसेम्बर २०२० पर्यंत आहे व चंद्र शनी ऑक्टोबर २०२३ ते मे २०२५ या कालावधीत होऊ शकतो . चंद्र केतू नक्षत्रात व केतूवर नेपच्यून ची दृष्टी . शनी  व प्लूटो मधे ७२.अंशाचे अंतर आहे त्यामुळे वैवाहिक सौख्य असमाधानकारक राहील.
या सर्व कुंडल्यांचे विश्लेशन पाहता ३-४ पायरीला जर अशुभ  भाव  असतील तर विवाह होत  नाही किंवा  झालाच तर वैवाहिक सौख्य असमाधानकारक असते असेच सिद्ध होते 
                    एक उच्च पदस्थ अधिकारी , माझ्याकडे आले होते. म्हणाले मी माझ्या मुलाचे विवाहासाठी प्रयत्न करीत आहे.आतापर्यंत खूप मुली पाहिल्या. पण कोठेच जमून आले नाही.मी मुलाची पत्रिका पहिली. त्यावेळी लक्षात आले पत्रिकेत विवाहाचा योग च नाही.आता काय सांगावे हा प्रश्न मला पडला. मी म्हटले विवाहाचे योग खूप कमी आहेत. खूप प्रयत्नांनी विवाह.मी म्हटले मुलाला माझ्याकडे पाठवा. फक्त तुम्ही आग्रह करू नका. त्याच्या मनात असेल तरच त्याने यावे. त्या दिवशी मुलगा आला नाही, दुसऱ्या दिवशी पण आला नाही. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याने मला फोन केला . माझी appointment घेतली. रात्री ८ वाजता आला. मी विचारले तू का आलास तेंव्हा तो म्हणाला मला मनातून वाटत होते म्हणून मी आलो. बरं,ठीक आहे. तुला काय विचारायचे आहे, तो म्हणाला मला दोन प्रश्न विचारायचे आहेत. मी म्हटले मी एकाच प्रश्नाचे उत्तर देणार. कारण समस्या खूप असतात पण प्राधान्यक्रमाने कोणता प्रश्न सोडवावा हे तू ठरवायचे. त्याने मला विचारले माझी ध्यान धारणा साधनेत  प्रगती होईल का ? त्यावेळी मी त्याला म्हणालो ज्यावेळी मी तुझी पत्रिका पहिली त्यावेळी तुझ्या पत्रिकेत विवाहाचे योगच नव्हते. म्हणून तुला पाठवायला सांगितले. त्यावेळचे कोडे आता सुटले. परत तो म्हणाला मी विवाह सुधा करणार. मी म्हटले ती मुलगी सगळे सोडून तुझ्यासाठी येणार ,तू तिला साधना कशी  करायची ते शिकविणार का तिला प्रवचन एकावणार. तर म्हटला मी तिच्यासाठी सुधा वेळ देणार. आता मला सांगा अशाप्रकारचा  विवाह किती यशस्वी होईल ? याबाबत मला शंका आहे.

       पालक जेंव्हा अशा प्रकारच्या पत्रिका घेऊन येतात. तेंव्हा काय सागायचे हा प्रश्न सर्वच ज्योतिषांना पडतो.त्यांना स्पष्ट सांगितले तर ते पटणार नाही. ते म्हणतात आमच्या मुला / मुलींमध्ये काय कमी आहे रंग रूप ,आहे, शिक्षण आहे, MNC कंपनीत नोकरी आहे. विवाहानंतर ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळी त्यांना ज्योतिषाने सांगितलेले आठवते..
मला एवढेच म्हणायचे आहे मुला/ मुलींच्या पत्रिकेत विवाह योग नसतील तर ..... ही वस्तुस्थिती पालक वर्ग स्वीकारतील का ?
शुभम भंवतू!!!


2 comments:

  1. उत्तम लिखाण करावे ते कौतुक कमी आहे असेच लेख लिहावेत ही विनंती

    ReplyDelete
  2. खूप छान लेख
    दुसऱ्या विवाहासाठी 2 चा sub consider नाही केले

    ReplyDelete