कृष्णमूर्ति ज्योतिष

Sunday 17 February 2019

---कुंडलीची सत्यता -- चंद्र-- उपनक्षत्र  संबंध 

                             रुलिंग प्लॅनेट हे दैवी मार्गदर्शन आहे.हे प्रत्येकाला लाभेल च असे नाही. आणि रुलींग प्लॅनेट कशासाठी घेतात  तर संबंधित भावाचा सब निश्चित करण्यासाठी. संबंधित भावाचा सब रुळिग मध्ये असेल तर आपण म्हणतो कुंडली बरोबर आहे.पण  संबंधित भावाचा सब रूलिग मध्ये नसेल तर आपण पुढचा किंवा मागचा सब घेवून वेळ निश्चित करतो. नवीन वेळेनुसार  कुंडली तयार करून प्रश्न सोडवितो.  पण रुलिग प्लॅनेट हे सगळ्यांनाच लाभणार का ? तर त्याचे उत्तर  नाही. कारण ते दैवी मार्गदर्शन आहे.
मग अशावेळी कुंडली ची सत्यता कशी पडताळून पहायची.?
तर कुंडलीची लग्नाशुधी करणे.
 चंद्र -उपनक्षत्र  संबंध  थिअरी प्रमाणे .
१) जातकाच्या कुंडलीतील लग्न भावाचा सब हा त्याच्या चंद्राचा  राशिस्वामी किंवा नक्षत्र स्वामी असावा
२) लग्नाचा सब चंद्राच्या राशीत  अथवा नक्षत्रात असावा
३)लग्नाचा सब चन्द्राच्या युतीत अथवा दृष्टीत असावा
४) लग्नाचा  सब आणि चंद्र राशी स्वामी किंवा नक्षत्र स्वामी तिसऱ्या ग्रहाच्या माध्यमातून संबंधित असावा

उदा....
समजा लग्ना च सब गुरु आहे तर चंद्राचा राशी स्वामी किंवा चंद्रा नक्षत्रस्वमि गुरु असावा.
किंवा चंद्र गुरु युतीत अथवा दृष्टीत असावा किंवा गुरु चंद्राच्या नक्षत्रात किंवा चंद्राच्या कर्क राशीत असावा असं असेल तर कुंडली बरोबर.पण असे नसेल तर वेळ (+)(-) करून सब बदलला पाहिजे. कारण त्यादिवशी चा राशी स्वामी किंवा नक्षत्र स्वामी निश्चित असणार आहे म्हणजे आपल्याला लग्नाचा सब च बदलावा लागेल.
एखादे जातक ची कुंडली आपण रुलिंग  नुसार निश्चित केली आणि पुन्हा तोच जातक वेगळ्या कारणासाठी आपण कडे आला आणि जर त्यावेळी संबंधित भावाचा सब जर रुलिंग मध्ये जुळला नाही तर पुन्हा त्याची वेळ बदलावी लागेल. असे करणे कितपत योग्य ठरेल.?
.म्हणजे एकाच कुंडलीच्या  दोन वेग वेगळ्या वेळा होतील.म्हणून मला वाटते लग्न शुढी करणे सर्वात उत्तम . आणि एकदा लग्न शूधी केली पुन्हा सब निश्चित करण्याचा प्रश्न येणार नाही . जो सब आहे त्याप्रमाणे प्रश्न सोडवावा.
.त्यात अजून बारकावे पाहता येतील.ज्यावेळी जातक आपल्याकडे प्रश्न विचारायला येतो. त्याचे जन्म टिपण ,तसेच त्याच्या पत्नीचे ,संतती असेल तर संततीचे जन्म टिपण घ्यावे.  वर सांगितल्याप्रमाणे प्रथम जातकाच्या पत्रिकेची लग्न शुध्दी करावी . नंतर त्याच्या पत्रिकेत सप्तमाचा सब त्याच्या पत्नीच्या चंद्राशी वरील प्रमाणे संबंधित असावा. तसेच त्याच्या पत्रिकेतील पंचामाचा सब त्याच्या संततीच्या चंद्राशी संबंधित असावा.जर जातकाचे  लग्न च झाले नसेल तर त्याच्या आई वडिलांचे जन्म टिपण घ्यावे. जातकाच्या चातुर्थाचा सब आई च्या चंद्राशी संबंधित असावा . व जातकाच्या पत्रिकेतील नवमाचा सब  हा वडिलांच्या चंद्राशी संबंधित असावा.किंवा लहान मोठं भाऊ बहीण यांच्या पत्रिका घ्याव्यात . जातकाच्या पत्रिकेतील लाभाचा सब हा जातकाच्या मोठ्या भावाच्या चंद्राशी संबंधित असावा . तसेच त्रितियाचा सब जातकाच्या लहान भाऊ बहिणीच्या चंद्राशी संबंधित असावा . अशाप्रकारे कुटुंबातील एकाची कुंडली कुटुंबातील इतर सदस्यांशी कनेक्टेड असली पाहिजे .
                          फक्त प्रश्न असा येतो हे सगळे करण्यास वेळ खूप लागणार आणि जातक इतका वेळ थांबणार का ? किंवा  दोन दिवसांनी जातकाच्या पत्रिकेची लग्न शुद्धी करून , इतरांशी कनेक्ट झाल्यानंतर, प्रश्न सोडवावा

शुभम भवतु

1 comment: