कृष्णमूर्ति ज्योतिष

Tuesday, 15 January 2019

जन्मवेळ निश्चिती
                   फेसबुकवरील लेखाना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला . सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार . फेसबुकवरील लेख वाचून एका व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधला . म्हणाले माझी तारीख निश्चित आहे . परंतु वेळ माहित नाही . आई म्हणते पहाटेचा जन्म आहे . पौर्णिमेचा  हनुमानजयंतीच्या आसपास . जन्मस्थळ धोंडीहिप्परगा आहे तालुका उदगीर . खरे तर ह्या व्यक्तीला मी टाळण्याचा प्रयत्न करीत होतो. कारण जन्मवेळ ठरविण्यात २-३ तास लागतात. पण हि व्यक्ती  दर दोन दिवसांनी नमस्काराचे मेसेज पाठवू लागली . म्हणून एके दिवशी पत्रिका काढायचे ठरविले . त्यांना जन्मटिपण मागितले .
तारीख २०/४/१९७३ वेळ --पहाटे,  स्थळ धोंडीहिप्परगा तालुका उदगीर
धोंडीहिप्परगा या गावाचे अक्षांश रेखांश उपलब्ध होऊ शकले नाही . परंतु गावापासून ९-१० किलोमीटर वर शहर गृहीत धरले   मी मनात म्हटले ९-१० कि.मी.ने  फारसा फरक पडणार नाही .
आता पहाटे  म्हणजे ३-० ते सूर्योदयापूर्वी असे आपण धरू शकतो. अंदाजे वेळ निश्चित केली. प्रथम शहराच्या ठिकाणी पहाटेच्या वेळी कोणती लग्ने आहेत ते पहिले . या वेळेत खालील लग्ने होती

१) कुंभ -- २-३१-४६ ते ४-०९-१४
२) मिन --४-०९-१४ ते ५-४४-०९
३) मेष --५-४४-०९ ते ७-०७-२७

प्रश्न पहिला त्यावेळी रुलिंग खालील प्रमाणे होते
७/१/२०१९ ५-३०-४१ फलटण
Ls--राहू ,L --बुध ,S ..रवी ,R ..शनी ,D--चंद्र 

आता पहाटे च्या वेळेचे लग्नाच्या स्वामींचा विचार करू.
१) कुंभ लग्नस्वामी शनी
२) मिन लग्नस्वामी गुरु
३) मेष लग्नस्वामी मंगल

यापैकी कुंभ लग्नाचा स्वामी शनी रुलिंग मध्ये आहे .  गुरु व मंगळ रुलिंगमध्ये नाही म्हणजे जातकाचा जन्म कुंभ लग्न असतानाच झाला आहे हे निश्चित झाले . कुंभ राशीमध्ये धनिष्ठा ( मंगळ ), शततारका (राहू), व पूर्वाभाद्रपदा (गुरु) ची नक्षत्रे आहेत यापैकी मंगल गुरु रुलिंगमध्ये नाहीत फक्त राहू रुलींगमध्ये आहे म्हणून कुंभ लग्न राहू नक्षत्रस्वामी घेता येईल . आता शिल्लक राहिले बुद्ध व रवी यापैकी बुद्ध लग्न स्वामी आहे व रवी नक्षत्रस्वामी आहे . नक्षत्रस्वामी पेक्षा लग्नस्वामी श्रेष्ठ , पहिल्या प्रतीचा आहे म्हणून  सब बुध  घ्यावा लागेल आणि राहिलेला रवी सब सब घ्यावा लागेल. जातकाचा जन्म कुंभ लग्न ,नक्षत्रस्वामी राहू,सब बुध व सब सब रवी असताना  झाला आहे हे निश्चित झाले
 या साखळीवरून सॉफ्टवेअर मधील ट्रांझीट्स हा पर्याय वापरून आपणाला वेळ काढता येईल .
ती येते ३-१६ am .हि वेळ वापरून जातकाची कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली . व त्या पत्रिकेवरून जातकाच्या आयुष्यातील घटनांची पडताळणी केली . १) विवाह तारीख  २) संतती तारीख

 विवाह तारीख ११/३/२००१

सप्तमाचा सब २,७,११,५,८ यापैकी भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेमध्ये विवाह होईल.
 विवाहाच्या वेळी बुध चंद्र  शनी ची दशा होती
PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (1)   5 (8)
It's N.Swami :-------- Saturn:- (4)   1 12
It's Sub :------------ Sun:- (2)   (7)     Venus-Yuti  (2)   4 9
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (5)      Rashi-Swami Mercury (1)   5 (8)
Itself aspects :------ 8

४-पायरीवर केतू राहू च्या नक्षत्रात आहे राहू लाभत आहे म्हणून केतू ११ भावाचा कार्येश आहे .
बुध २,५,७,८,११  तीनही भावाचा कार्येश आहे
PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 9   6
It's N.Swami :-------- Jupiter:- (12)   2 11
It's Sub :------------ Rahu:- 11       Rashi-Swami Jupiter 12   2 11
It's Sub's N.Swami :-- Venus:- (2)   4 9     Sun-Yuti  (2)   (7)
Itself aspects :------ 4

चंद्र २,७  भावाचा कार्येश आहे 

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 4   1 12   
It's N.Swami :-------- Mars:- (12)   (3) (10)   
It's Sub :------------ Mars:- (12)   (3) (10)   
It's Sub's N.Swami :-- Mars:- (12)   (3) (10)   
Itself aspects :------ 10 6 1

शनी ३ भावाचा कार्येश आहे 
बुध २,५,७,८,११
चंद्र २,७
शनी ३
बुध चंद्र शनी दशेमध्ये २,३,५,७,८,११ साखळी पूर्ण  झाली 

प्रथम संतती --२४ /१०/२००२ 
पंचमच सब २,५,११ चा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेमध्ये संतती होते 
पंचमच सब केतू आहे केतुचे कार्येशत्व --

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 5       Rashi-Swami Mercury 1   5 8
It's N.Swami :-------- Rahu:- (11)      Rashi-Swami Jupiter (12)   2 11
It's Sub :------------ Sun:- (2)   (7)     Venus-Yuti  (2)   4 9
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (5)      Rashi-Swami Mercury (1)   5 (8)
Itself aspects :------ 11

४ त्या पायरीवर केतू राहूच्या नक्षत्रात आहे आणि राहू ११ व्य स्थानात आहे 
केतू ११ भावाचे कार्येशत्व दाखवितो 
केतू २,५,११ या तीनही भावाचा कार्येश आहे 

संतती झाली तेंव्हा बुध  मंगल चंद्र दशा होती 


PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (1)   5 (8)   
It's N.Swami :-------- Saturn:- (4)   1 12   
It's Sub :------------ Sun:- (2)   (7)     Venus-Yuti  (2)   4 9
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (5)      Rashi-Swami Mercury (1)   5 (8)
Itself aspects :------ 8

४ त्या पायरीवर केतू राहूच्या नक्षत्रात आहे आणि राहू ११ व्य स्थानात आहे
बुद्ध २,५,११ या तिन्ही भावाचा कार्येश आहे 

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (12)   (3) (10)   
It's N.Swami :-------- Mars:- (12)   (3) (10)   
It's Sub :------------ Mars:- (12)   (3) (10)   
It's Sub's N.Swami :-- Mars:- (12)   (3) (10)   
Itself aspects :------ 6 3 7

मंगल फक्त ३ भावाचा कार्येश . तिसरं भाव पंचमाचा लाभ स्थान आहे 

PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 9   6
It's N.Swami :-------- Jupiter:- (12)   2 11
It's Sub :------------ Rahu:- 11       Rashi-Swami Jupiter 12   2 11
It's Sub's N.Swami :-- Venus:- (2)   4 9     Sun-Yuti  (2)   (7)
Itself aspects :------ 4
 चंद्र २ भावाचा कार्येश आहे 

बुध  मंगल चंद्र दशे २,३,५,११ मुळे  संतती झाली . 

शुभम भवतु 

No comments:

Post a Comment