Friday, 4 April 2014

ज्योतिष ---कृष्णमुर्ती ज्योतिष 

विवाह ----घटस्फोट -----पुनर्विवाह  ?

                          इंदोर  येथून एका अपरिचित महिलेचा मला फोन आला होता . ती म्हणाली मी नक्षत्राचे देणे या दिवाळी अंकामध्ये आपला लेख वाचला म्हणून मी आपणाला फोन करीत आहे . मला एक प्रश्न विचारावयाचा आहे मी म्हटले काय विचारावयाचे आहे . ती म्हणाली माझा पुनर्विवाह होईल का ? सध्या मी एका शाळेत  नोकरीला आहे . मी म्हटले आपली जन्मतारीख जन्मवेळ व ठिकाण ध्या . त्यांच्याकडून मी आवश्यक माहिती घेतली व दोन दिवसांनी फोन करा असे सांगितले . 
  जन्मतारीख  २६ / ४ /१९७० जन्मवेळ --पहाटे ४=१०  जन्मस्थळ -- अ १९,५४  रे  ७७ , ३५ यावरून मी कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली तयार केली . प्रथम आपण झालेल्या घटना तपासून पाहू -----
१)  विवाह ----१६ / १२ /२००४
२)  घटस्फोट ---३० / ९ /२००९
३)  संतती   ---- नाही 

कुंडली पहिली त्यावेळेचे एल , एस , आर  ,डि    दि -२२ / ३/२०१४ वेळ - २२=२२=३९
एल - शुक्र , एस - बुध , आर - मंगल , डी - शनि  , एल एस - गुरु 

१) पहिला विवाह १६ / १२ /२००४ रोजी झाला म्हणजे वयाच्या ३४ व्या वर्षी झाला . एवढा उशीर होण्याचे कारण काय असेल ? हा प्रश्न मला पडला . मंगल शनि व हर्शल यांच्यामुळे विवाहाला उशीर होऊ शकतो . या पत्रिकेमध्ये सप्तमभावारंभी हर्शल आहे , तसेच वैवाहिक सौ ख्याचा कारक शुक्र नेपच्यून यांचा प्रतियोग आहे . हर्शल मुळे विवाहात अडथळे येऊ शकतात , किंवा ठरलेला विवाह मोडतो . तसेच शुक्र नेपच्यून प्रतियोग असल्यामुळे फसवणूक होऊ शकते . या कारणामुळे विवाहाल उशीर झाला असे म्हणता येईल . 
   सप्तमाचा सब शुक्र आहे . पत्रिका पहिली त्यावेळच्या एल , एस आर डी      मध्ये शुक्र आहे म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे . शुक्राचे कार्येशत्व ----
 शुक्र ---
रवि ---१,२ क.यु 
शनि --२ , ११
शुक्र ---२ , ३ ,८

नियम --- सप्तमाचा सब २,७,११ / ५ , ८ या भावांचा कार्येश असेल तर २, ७ ,११ या भावांच्या कार्येश ग्रहांच्या दशेत विवाह होतो . 
सप्तमाचा सब शुक्र  २ ,३ ८ ,११ या भावांचा बलवान कार्येश असून सुधा विवाह योग्य वयात झाला नाही चौथ्या पायरीचा शुक्र नेपच्यून प्रतियोग आणि हर्षल सप्तम भावारंभी म्हणून वयाच्या ३४ व्या वर्षी झाला . विवाह झाला त्यावेळी चंद्र  / शनि  / बुध ११ / ११ /२००४ ते ७ / ३/ २००५ हि दशा चालू होती   चंद्र शनि व बुध यांचे कार्येशत्व ------
चंद्र ---१० का.यु                                           शनि ---२ , ११                                      बुध --- २ , ४
केतू ---६ र १ मं दृ २                                    शुक्र ----२ , ३ ,८                                  रवि ---१ , क यु 
राहू ---१२ , श २ , ११                                   मंगल ---२ , ३ क यु                              मंगल ---२ , ३ क यु
 राहू ---१२ , श २ , ११                                 चंद्र ---- ९ , ५ ,१० क यु                         चंद्र ---- ९ , ५ ,१० क यु 


अनुकूल     २ ११                                                 २ , ३ ,५, ८ , ९ , ११                        २ ,३ ,५ , ९ 
प्रतिकूल   १ , ६ ,१० ,१२                                          १०                                             १ , ४ , १०

दशा  २ ,३,५,८,९,११ या अनुकूल भावाबरोबरच १,४,६,१०,१२ या प्रतिकूल भावांची कार्येश आहे . 
२,३,५,८,९,११ या भावांचा कार्येश  ग्रहामुळे विवाह झाला आहे १,४,६,१०,१२ या भावांच्या कार्येश ग्रहामुळे वैवाहिक सौख्य असमाधानकारक . त्यामुळे घटस्फोट कडे वाटचाल सुरु झाली .  ह्या महिलेला ३० / ९ /२००९ ला कायदेशीर घटस्फोट मिळाला .  त्यावेळी जातकाची चंद्र / शुक्र  / बुध दशा  चालू होती 
       १२ / ७ /२००९ ते   ७ / १० / २००९     चंद्र शुक्र बुधाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

चंद्र   १० क यु                                   शुक्र -                                         बुध -- २ , ४
केतू --६ र १ मं दृ २                          रवि --१ ,२ क यु गु दृ ७ , १०         रवि --१ ,२ क यु गु दृ ७ , १०   
राहू ---१२ श २ , ११                         शनि ---२ , ११                              मंगल -- २, ३ क यु 
राहू ---१२ श २ , ११                         शुक्र ---२ , ३, ८                          चंद्र    ---९ , ५ १० क यु 

     ( १, ६, १० ,१२  )                                    ( ३ , १० )                                     ( १ , ३ ,४ , ९ ,१० ) 

नियम --- सप्तमाचा सब जेंव्हा १,४,६,१०,१२ भावांचा कार्येश असतो त्यावेळी वैवाहिक सौख्य नसते १,४,६,१०,१२ भावाबरोबर च ३ , ९ या भावांचा कार्येश ग्रहांची दह्सा येते त्यावेळी कायदेशीर घटस्फोट होतो  
सदर जातकाला चंद्र / शुक्र  / बुध या दशेमध्ये च १२ / ७ /२००९ ते ७ /१० /२००९ या कालावधीत घटस्फोट मिळाला आहे . 
  संतती --- जातकाला संतती झाली नाही . 
नियम --- पंचमाचा सब  २ ,५ ,११ या भावांचा कार्येश असेल तर २ ,५ ,११ या भावांच्या ग्रहदशेमध्ये संतती होते . हाच सब जर १,४,१० ,१२  या भावांचा कार्येश असेल तर संतती होत नाही किंवा गर्भपात होतात .
 (१) कुटुंब वृद्धीला विरोध , ( ४) गर्भ राहण्यास विरोध , ( १०) इच्छापूर्ती नाही , ( १२) संततीचे मृत्यू स्थान आहे . तसेच पंचमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी वंध्या राशीत ( मेष ,मिथुन ,सिंह ,कुंभ )असेल तरसुधा संतती होत नाही .
         पंचमाचा सब राहू आहे राहू कुंभ या वंध्या राशीत व्यय स्थानात आहे . म्हणजे संततीचे मृत्यू स्थानात आहे . राहू स्वत:चे नक्षत्रात आहे . राहूचे कार्येशत्व ----
      राहू ---१२,श २,११
     राहू ---१२,  श २,११
     शुक्र ---
    रवि ---१,२ क यु
      ह्या ठिकाणी राहू २,११ या अनुकूल भावाचा कार्येश असून सुधा त्याने संतती दिली नाही . कारण राहू जेंव्हा स्व नक्षत्रात असतो तेंव्हा तो ज्या स्थानात असतो त्या भावाची फळे जास्त तीव्रतेने देत असतो .  तसेच चौथ्या  पायरीला राहूच्या सब चा नक्षत्रस्वामी मेष या वंध्या राशीत आहे म्हणून संतती झाली नाही . सध्या जातकाचे वय ४४ वर्षे आहे . निसर्गनियमानुसार स्त्रियांचा मासिक धर्म वय वर्षे ४०-४५ पर्यंत बंद  होतो यापुढे हि संतती होणार नाही .
                                आता पुनर्विवाहाचा विचार करू
     नियम-- सप्तमाचा सब बुध असेल, बुधाच्या नक्षत्रात असेल, बुधाच्या युतीत असेल , बुधाच्या दृष्टीत असेल , किंवा द्विस्वभाव राशीत असेल किंवा  नक्षत्रस्वामी द्विस्वभाव राशीत असेल  आणि २,११,८ या भावांचा कार्येश
असेल तर पुनर्विवाह होतो .
                                 सप्तमाचा सब शुक्र आहे ---
  शुक्र ---
 रवि ---१,२ क यु गु दृ ७,१०
शनि ---२,११
शुक्र ---२,३,८
                    शुक्र २,३,८,११ या अनुकूल भावाचा कार्येश आहे परंतु शुक्र वृषभ या स्थिर राशीत आहे व त्याचा नक्षत्रस्वामी रवि हा मेष   या चर राशीत आहे . याठिकाणी कोठेही बुधाचा किंवा द्विस्वभाव राशीचा संबंध येत नाही . म्हणून द्वितीय विवाह होणार नाही
                   आता दशा पाहू ---  कारण दशेचा  अधिकार स्वतंत्र असतो . सध्या मंगळाची दशा  चालू आहे . मंगळाचा नक्षत्रस्वामी चंद्र आहे . चंद्र २,६,१०,११,१२  भावांचा बलवान कार्येश आहे , २, ११ भाव अनुकूल आहेत पण ६,१०,१२ हे विवाह विरोधी आहेत म्हणून मी जातकाला स्पष्ट सांगितले तुमचा पुनर्विवाह होणार नाही .  पुन्हा अशीच स्थिती निर्माण होईल . कारण ज्योतिषाने फक्त सल्ला ध्यायचा असतो . सल्ला मानायचा कि नाही याचे स्वातंत्र्य व्यक्तीला आहेच             .
                      आणखी खात्री करण्यासाठी मी त्यांच्याकडून १ ते २४९ यापैकी एक संख्याविचारून घेतली . त्यांनी ७५ हि संख्या दिली . त्या संखेवरून मी एक कुंडली तयार केली . ह्या कुंडलीमध्ये सप्तमाचा सब शनि आहे . शनि तुल या  चर राशीत आहे . व त्याचा नक्षत्रस्वामी गुरु मिथुन या द्विस्वभाव राशीत आहे . गुरु ३,५,७,१२  या भावांचा कार्येश आहे . नंबर कुंडलीनुसार एखादे प्रेमप्रकरण चालू असावे . असे वाटते . पण नंबर कुंडलीनुसार विचार केला तर सध्या बुधाची दशा चालु  आहे . बुध ३,७,११,६,८,१२ या भावांचा कार्येश आहे . ६,८,१२ हे भाव विवाह विरोधी आहेत . म्हनुन पुनर्विवाह होणार नाही असा सल्ला दिला . नाहीतर आगीतून फुफाट्यात अशी अवस्था व्हायची . 

प्रा कोरडे पी आर
१४२, पद्मावातीनगर , फलटण
९६२३४७४६२७  / ९४०३८१२६२८

No comments:

Post a Comment