कृष्णमूर्ति ज्योतिष

Thursday 28 July 2022

स्वप्न-- एम एस होण्याचे --४

          एका परिचित स्त्रीचा फोन ---म्हणाली मी ज्या कंपनीत काम करते त्या कंपनीतील माझी बोस एक स्त्री आहे .. तिला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे . मी म्हटले त्यांना फोन करावयास सांगणे . दुसऱ्या दिवशी त्या स्त्रीचा फोन आला . तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून आपला फोन नंबर मिळाला . म्हणाली मी एका MNC कंपनीत मॅनेजर या पदावर काम करीत आहे . माझा मुलगा B,E, Mech.  झाला आहे . पण पुढील शिक्षण परदेशात म्हणजे अमेरिकेत घ्यायचे आहे . अशी त्याची खूप इच्छा आहे . अमेरिकेत शिक्षण घेण्याच्या . दृष्टीने मी पण तशी तयारी केली आहे . मलाही वाटते त्याने परदेशात एम एस चे शिक्षण घ्यावे. माझ्या मुलाचे   अमेरिकेत एम् एस शिक्षण  होईल का ? तो केंव्हा अमेरिकेला जाईल. ? असा प्रश्न विचारला . मी म्हटले त्याचे बर्थ डिटेल्स व तुम्हा दोघांचे बर्थ डिटेल्स मला लागतील. ठीक आहे म्हणाल्या . मी उद्या तुम्हाला डिटेल्स देते.  त्यांनी खालीलप्रमाणे डिटेल्स दिले . 

जातक--दि  १५  / मार्च  १९९९ वेळ सकाळी ८-५८  पुणे 

आई --३० ऑक्टोबर ७४   वेळ-२=५०am स्थळ--१७,२५  रे ७३,३१

वडील--११ मार्च १९७२  वेळ १=४५  am   स्थळ ---१७,४१ रे ७५,५५

 जातक--दि १५ मार्च  १९९९ वेळ सकाळी ८=५८ स्थळ--पुणे

 हि धनु लग्नाची पत्रिका आहे . लग्नाचा सब मंगल शुक्राच्या नक्षत्रात आहे आणि चंद्र सुधा शुक्राच्या नक्षत्रात आहे . जातकाच्या चतुर्थ भावाचा सब राहू आहे  राहू कर्क राशीत बुधा च्या नक्षत्रात आहे . आईचा चंद्र बुधाच्या नक्षत्रात आहे . जातकाच्या नवम  भावाचा सब राहू आहे राहू कर्क राशीत बुधाच्या नक्षत्रात आहे . वडिलांच्या पत्रिकेत चंद्र राशिस्वामी गुरू आहे . सब राशी स्वामी चंद्रावर वडिलांच्या पत्रिकेत चंद्र राशी स्वामी गुरुची दृष्टी आहे . सब चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे जातकाची वेळ बरोबर आहे .

जातकाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे . पुढील शिक्षणासाठी त्याला अमेरिकेत जावयाचे  आहे प्रथम त्याच्या पत्रिकेत परदेशगमनाचा योग्य आहे का ते पहिले पाहिजे . लोक परदेशात वेगवेगळ्या कारणासाठी जातात. कोणी व्यवसाय करणेसाठी , कोणी नोकरी करणेसाठी , कोणी सहल म्हणून जाण्यासाठी परदेश गमन करतात. इथे जातकाला उच्च शिक्षण घेण्यासाठी जावयाचे आहे . 

नियम---परदेश गमन ---व्यय भावाचा सब ३,९,१२, पैकी भावाचा कार्येश असेल तर ३,९,१२ च्या संयुक्त दशेत व्यक्ती परदेशात जाते .  

उच्च शिक्षण --- ९ भावावरून उच्च शिक्षणाचा विचार केला जातो. ९ भावाचा सब ९,११ भावाचा कार्येश असेल तर उच्च शिक्षण होईल.  

या पत्रिकेत व्ययाचा  सब शनी  आहे शनी चे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 12   10 11  Cusp Yuti: (1)     
It's N.Swami :-------- Ketu:- (10)    Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Saturn (12)   10 11  Moon-Yuti  (10)   4
It's Sub :------------ Jupiter:- 12   9 12   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (12)   10 11  Cusp Yuti: (1)     
Itself aspects :------ 7 3 10

 शनी १२ चा कार्येश आहे म्हणजे परदेशगमनाचे योग्य आहेत. तसेच ९ चा दुय्यम कार्येश व लाभाचा बलवान कार्येश आहे .  म्हणजे जातक परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊ शकतो. 

आता ९ भावाचा सब पाहू----९ भावाचा सब गुरु आहे . गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 11   9 12   
It's N.Swami :-------- Saturn:- (12)   10 11   
It's Sub :------------ Rahu:- 4       Rashi-Swami Moon 10   4  Moon-Drusht  10  4
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (11)   (3) 6   
Itself aspects :------ 6 4 8

नवम भावाचा सब ३,१२ त्याच बरोबर लाभाचा कार्येश आहे . सदर जातक परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणार. आता केंव्हा जाणार ह्यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील. अमेरिकेतील शैक्षणिक संस्था मधील प्रवेश जानेवारी व सप्टेंबर मध्ये सुरु होतात. या काळात जर परदेशी जाण्याचे योग्य असतील तरच घटना घडणार आहे . 

कुंडली सोडवितेवेळी जातकाची राहू मध्ये मंगळाची अंतर्दशा ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे . राहू मंगळाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 4     Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Moon 10   4  Moon-Drusht  10  4
It's N.Swami :-------- Mercury:- (12)   (3) (6)   
It's Sub :------------ Jupiter:- 12   9 12   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (12)   10 11  Cusp Yuti: (1)     
Itself aspects :------ 10

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- 7   1 8   
It's N.Swami :-------- Rahu:- (4)    Cusp Yuti: (5)    Drusht  (११)  Rashi-Swami Moon (10)   4  Moon-Drusht  (10)   4
It's Sub :------------ Moon:- (10)   4     Ketu-Yuti  (10)    Rahu-Drusht  (4)  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (7)   (1) (8)   
Itself aspects :------ 1 10 2


राहू ३,१२ चा बलवान कार्येश आहे व ९,११ चा दुय्यम कार्येश आहे . मंगल ४ ,११ चा बलवान कार्येश आहे . ह्यात ९ चे बलवान कार्येशत्व आलेले नाही .९ चे बलवान कार्येशत्व फक्त रवी दाखवितो. म्हणून रवी विदशा घेतली . रवीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (11)   (5)  Cusp Yuti: (12)     
It's N.Swami :-------- Jupiter:- (12)   (9) 12   
It's Sub :------------ Moon:- (10)   4     Ketu-Yuti  (10)    Rahu-Drusht  (4)  
It's Sub's N.Swami :-- Mars:- (7)   (1) (8)   
Itself aspects :------ 6

रवी ९,११ ( उच्च शिक्षण )चा बलवान व ४ चा दुय्यम कार्येश आहे . ९,१२  ( परदेशगमन )चा बलवान कार्येश आहे . 

राहू महादशा मंगल अंतर दशा रवी विदशा चा कालावधी येतो १ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२२. या कालावधीत जातक उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाईल. 

गेल्या आठवड्यात संबंधित स्त्री चा मेसेज आला १८ जुलै ला व्हिसा अँप्रोव्ह झाला . आणि १४ ऑगस्ट ला सदर जातक अमेरिकेला जाण्याचे निश्चित झाले आहे . मी सांगितलेल्या कालावधी पेक्षा १५ दिवस जातक अगोदर जात आहे. महाजनांनी मार्गदर्शन करावे. 

शुभम भवतु !!!

No comments:

Post a Comment