कृष्णमूर्ति ज्योतिष

Monday 28 February 2022

कॅन्सर असेल का ?-----. २

                                      एक अपरिचित जातकाचा दि १५ / १२ /२०२१ रोजी  फोन , म्हणाला तुमचा नंबर मला गोंधळेकर यांनी दिला ( सदर गृहस्थ माझ्या ओळखीचे आहेत ) मी म्हटले बर , पुढे बोला , तो म्हणाला आम्ही दोघे नोकरीला असतो . माझी पत्नी एका हॉस्पि टल मध्ये नोकरीला आहे . तिथे दरवर्षी मेडिकल चेकअप केले जाते . तसे ह्यावर्षी सुद्धा केले . ह्यावर्षी डॉ नि तिला मॅमोग्राम ची टेस्ट घेण्याचा आग्रह केला . त्याप्रमाणे ती टेस्ट झाली . हि टेस्ट झाली १३ डिसेंबर २०२१ ला . त्या रिपोर्ट वरून डॉ नि सांगितले तिच्या स्तनामध्ये एक छोटी गाठ आहे   आणि ती तपासायला पाठवली पाहिजे . हे तो सांगत असताना त्याच्यावर कमालीचे टेन्शन आले होते . शेवटी तो म्हणाला असे काही असेल का ? मी म्हणालो असे प्रश्न मूळ कुंडलीवरून नाही सोडविता येणार . हा प्रश्न ,प्रश्न कुंडलीवरून सोडवू. नंतर त्याला थोडक्यात प्रश्न कुंडली ( नंबर कुंडली ) बदल सांगितले . १ ते २४९ यापैकी एक संख्या सांग . त्याने  ३५ हि संख्या  सांगितली ३५ ह्या संख्येवरून मी कृष्णमुर्ती पद्धतीने कुंडली तयार केली .  

दि --१५  /  १२  /२०२१      वेळ--१६-१२-०४       फलटण १७,५९   ७४,२६  के.पी. नंबर ३५

हि वृषभ लग्नाची   आहे . चंद्रावरून जातकाच्या मनात काय आहे ते पाहू . प्रश्न जर  खरोखरच तळमळीने कळकळीने विचारला असेल तर प्रश्नाचे उत्तर बर्याच अंशी  बरोबरच येते अर्थात  होय किंवा नाही . चंद्र व्यय स्थानात म्हणजे मनामध्ये  चिंता काळजी आहे . व्यय स्थान म्हणजे पत्नीचे शष्ट  स्थान होईल ( सप्तम स्थानापासून व्यय स्थान सहावे येते )म्हणजे पत्नीचे आजारासंबंधी प्रश्न असा अर्थ निघतो चंद्राची रास कर्क  तृतीय स्थानी म्हणजे पत्नीच्या बाधकस्थानी ( पत्नीचे वृश्चिक लग्न ) चंद्र शुक्राच्या नक्षत्रात शुक्र अष्टम स्थानात म्हणजे पत्नीच्या द्वितीय स्थानात ,मारक स्थान . शुक्र पत्नीचा सप्तमेश व व्ययेश आहे   पत्नीकडून विचार केला तर चंद्र ६ , ९,१२ , २,७ चा कार्येश होतो . ६ आजार ,१२ हॉस्पिटल २,७ मारक , ९ बाधक . म्हणजे जातकाचा प्रश्न बरोबर आहे . 

 

कॅन्सर --षष्ठ भावाचा संबंध राहुशी येत असेल आणि त्याचा कोणत्याही प्रकारे गुरूशी संबंध येत असेल तर ( युती किंवा  दृष्टी ) कॅन्सरची शक्यता जास्त असते कारण राहू हा शरीरात गाठ निर्माण करतो आणि या गाठीचा विस्तार गुरु करतो . गुरु गाठीतील पेशींची अनावश्यक वाढ करतो. 

येथे पत्नीसंबंधी प्रश्न आहे म्हणून सप्तम स्थान लग्न धरून कुंडली फिरवूंन घेतली आहे 

या पत्रिकेत शष्ट  भावाचा सब चंद्र आहे चंद्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

चंद्र---६ क यु 

शुक्र --२, ७ 

राहू ---६   शु २,७ मंगल दृष्ट १२

रवी---१ ,  १०

साध्य कुंडलीप्रमाणे मंगळाची दृष्टी ४ स्थानावर पडते 

चंद्र १,२,४,६,७ , १० , १२ चा कार्येश आहे येथे चंद्राचा सब राहू आहे . राहून गाठ निर्माण केली परंतु राहू बरोबर कोणत्याही प्रकारे गुरूचा संबंध येत नाही . त्यामुळे गाठीचा विस्तार झाला नाही . येथे मंगळाचा संबंध आलेला आहे मंगल शस्त्रक्रिया दाखवितो , म्हणून शस्त्रक्रिया करून गाठ काढली पाहिजे येथपर्यंत मी निष्कर्ष  काढला . सदर जातकाला सांगितले गाठ आहे ती शस्त्रक्रिया करून काढली पाहिजे . परंतु कॅन्सर नाही . हे मी १५ डिसेंबर ला च सांगितले दुसरी दिवशी म्हणजे १६ डिसेम्बरला गाठीचा बायोप्सीचा रिपोर्ट येणार होता . त्या दिवशी जातकाकडून काहीच रिप्लाय आला नाही . मी एक दिवस वाट पाहून मीच त्याला फोन केला ,आणि वैचारले काय झाले . त्याने सांगितले डॉ म्हणतात कॅन्सर आहे . मी ठासून म्हटले शक्यच नाही . मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. . त्यानंतर तो म्हणाला हा cure होणार कॅन्सर आहे . बरा होणार कॅन्सर  आहे . हे मी प्रथमच ऐकत होतो . आतापर्यंत कॅन्सरवर  औषध नाही हे माहित होते . मग त्याने सांगितले डॉ म्हणतात हा                                                               TUBULAR BREAST CARCINOVA STAGE--I . असा आहे . हा कॅन्सर पहिल्या स्टेजवरच आहे म्हणून हा काढून टाकता येईल त्यानंतर रेडिएशन थेरपी करून पेशंट पूर्ण बरा होऊ शकतो. 

२३ /१२/२०२१ रोजी ऑपरेशन करून गाठ काढली . त्यानंतर रेडिएशन थेरपी वापरून १२ फेब्रुवारी २०२२ रोजी पेशंट पूर्ण बारा झाला . शुक्र राहू बुध  राहू दशेमध्ये शश्त्रक्रिया केली 

अशाप्रकारचं एक लेख यापूर्वी प्रसिद्ध केला आहे . त्यामध्ये सुद्धा राहूच समबंध येत होता पण गुरूच संबंध आलेला नाही. त्यावेळी गाठीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. फक्त शस्त्रक्रिया करून गाठ काढली होती. 

असो--- महाजनांनी मार्गदर्शन करावे ----

शुभम भवतु !!!

 

No comments:

Post a Comment