कृष्णमूर्ति ज्योतिष

Tuesday 19 October 2021

 नोकरी----

फेसबुकवरील लेख वाचून एका स्त्री जातकाचा फोन ----- प्रथम  तिने तिच्या वैवाहिक समस्येबद्दल चा प्रश्न   विचारला . . माझी  घटस्फोटाची केस चालू आहे माझा घटस्फोट केंव्हा होईल यासंबंधी प्रश्न विचारला. तिच्याप्रश्नबद्दल  उत्तर दिल्यानंतर तिने तिच्या भावाबद्दल प्रश्न विचारला . माझा भाऊ आताच इंजिनिअर ची परीक्षा पास  झाला आहे . . नोकरीसाठी प्रयत्न करीत आहे . त्याला नोकरी केंव्हा लागेल ? असा प्रश्न मला विचारला . मी म्हटले त्याला मला फोन करावयास सांगणे दोन दिवसांनी त्याने मला फोन केला . तो म्हणाला नुकताच मेकॅनिकल इंजिनिअर झालो आहे . सद्य नोकरी साठी प्रयत्न करीत आहे . मला नोकरी केंव्हा लागेल आसा प्रश्न त्याने विचारला ... त्याचे बर्थ डिटेल्स  खालीलप्रमाणे ----

दि --१९ / ७ /९५ वेळ रात्री १-३० am सांगली 

प्रथम त्याची जन्मवेळ सब चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे शुद्ध करून घेतली जन्मवेळ बरोबर आहे 

हि कुंडली मेष लग्नाची आहे प्रश्न सोडविताना मी त्यावेळेचे रुलिंग घेतले ते खालीलप्रमाणे 

दि --१३ / /७ /२१ वेळ २३=२४=२२ फलटण 

शनी*  लग्न--गुरु , चंद्र नक्षत्रस्वामी --केतू , चंद्र राशी स्वामी --रवी , वार --मंगळ 

नियम ---दशम भावाचा सब २,६,१० पैकी भावांचा कार्येश असेल तर २,६,१० भावांच्या सयुंक्त दशेत नोकरी लागते

या पत्रिकेत दशम भावाचा सब गुरु आह . गुरु रुलिंग मध्ये आहे . . गुरुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 7   9 12   
It's N.Swami :-------- Saturn:- (11)   (10) 11     Mars-Drusht  (5)   (1) (8)
It's Sub :------------ Mars:- (5)   (1) (8)     Saturn-Drusht  (11)   (10) 11
It's Sub's N.Swami :-- Sun:- (3)   5   
Itself aspects :------ 2 12 4

गुरु २,३ पायरीला १०, ११ भावांचा कार्येश आहे म्हणजे नोकरी लागणार हे नक्की झाले . आता केंव्हा लागणार ह्यसाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील..... कुंडलीचे लग्न मेष आहे चर लग्न आहे म्हणजे घटना लवकर घडणार आहे . 

कुंडली  सोडवितेवेळी शुक्र महादशा मध्ये गुरुची अंतर्दशा चालू होती. 

शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (3)   (2) 7     Mercury-Yuti  (3)   3 6
It's N.Swami :-------- Jupiter:- (7)   (9) 12   
It's Sub :------------ Saturn:- 11   10 11     Mars-Drusht  5  1 8
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (7)   (9) 12   
Itself aspects :------ 9

शुक्र पहिल्या पायरीला   २ भावाचा कार्येश आहे दुसऱ्या व चौथ्या पायरीला ७ भावाचा कार्येश आहे . जेंव्हा ७ भाव कार्यान्वित होतो त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाची , काही कालावधीसाठी नोकरी लागते गुरुचे कार्येशत्व आपण यापूर्वी पहिलेच आहे गुरु १०,११ भावाचा कार्येश आहे . २,६,१० भावाची साखळी जुळण्यासाठी ६ भाव अद्याप लागला नाही . कुंडली सोडवितेवेळी मंगल ग्रहाची विदशा चालू होती. परंतु मंगळ  हा ५ ,९ या विरोधी भावाचा कार्येश आहे म्हणून मी राहू विदशा निश्चित  केली राहूचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (6)      Rashi-Swami Venus (3)   (2) 7
It's N.Swami :-------- Rahu:- (6)      Rashi-Swami Venus (3)   (2) 7
It's Sub :------------ Rahu:- (6)      Rashi-Swami Venus (3)   (2) 7
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (6)      Rashi-Swami Venus (3)   (2) 7
Itself aspects :------ 1

राहू २,६ भावाचा कार्येश आहे याठिकाणी २,६,१०,११ भावांची  साखळी जुळली . 

शुक्र महादशा गुरु अंतर्दशा व राहू विदशा चा कालावधी येतो २० / ८ /२०२१ ते १३ / १ / २०२२

या कालावधीत नोकरी लागेल. असे सांगितले परंतु हा कालावधी जवळजवळ ५ महिन्याचा होतो म्हणून अजून कमी कालावधी सांगता येईल का आसा विचार करून   राहुचीच सूक्ष्मदश घेतली शुक्र गुरु राहू राहू दशेचा कालावधी येतो २० /८ / २०२१ ते ११ / ९ / २०२१  या कालावधीत नोकरी लागेल असे संगीतलें . 

त्याच्या बहिणीचा १८ ऑक्टोबर २०२१ ला फोन आलं . तिने सांगितले सप्टेंबर महिन्याच्या शेवटी त्याचा इंटरव्हू झाला . त्यात त्याची निवड झाली १८ ऑक्टोबर २०२१ ला ऑफर लेटर मिळाले . मी सांगितले त्यापेक्षा एक महिना कालावधी जास्त लागला . हा फरक अक्षांश रेखांश व अयनांश मुले पडू शकतो. उद्या तो नोकरीवर जॉईन होणार आहे सदर जातक १९ ऑक्टोबर २०२१ ला नोकरीवर रुजू झाला त्याला कर्नाटक राज्यात एका एमएनसी कंपनीत नोकरी लागली आहे त्याला ६. ५ लाखाचे पॅकेज मिळाले . सद्य वर्क फ्रॉम दिले आहे . 

महाजनांनी मार्गदर्शन करावे 

शुभंम भवतु  !!!

No comments:

Post a Comment