Wednesday, 1 September 2021

 जन्मवेळ काढणे 

                                       ज्योतिष ग्रुपमधील एका मित्राचा फोन .... . तो म्हणाला माझा एक मित्र माझ्याबरोबर 

नोकरीला  होता पूढील वर्षी तो सेवानिवृत्त होणार आहे त्याची पत्रिका काढायची आहे  . त्याच्याकडे जन्मतारीख , 

जन्मस्थळ आहे पण जन्मवेळ त्याला माहित नाही . त्याची जन्मवेळ ठरविता येईल का ? मी म्हटले कृष्णमूर्ती 

पद्धतीमध्ये रुलिंग प्लॅनेट वरून जन्मवेळ ठरविता येते . मी त्याची जन्ममवेल काढण्याचा प्रयत्न करेन. त्याला 

माझ्याशी संपर्क करायला सांगावे . दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्राचा फोन म्हणाला माझी जन्मवेळ मला माहित नाही. 

तर जन्मवेळ ठरवता येईल का ?मी म्हटले मला तुमचे जंमटिपण द्या त्याच बरोबर घरातील सर्वांचे जंमटिपण द्या .

(पत्नी, मुलगा, मुलगी ). तसेच तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांच्या तारखा द्या . (विवाह , नोकरी लागल्याची 

तारीख ) त्यांनी दिलेले टिपणं खालीलप्रमाणे 

जातक दि  १/ २ /६२  जन्मवेळ माहित नाही , जन्मस्थळ सांगली 

( त्याच बरोबर पत्नी, मुलगी व मुलाचेजन्म टीपण दिले )

कृष्णमूर्ती पद्धती मध्ये रुलींग प्लॅनेटवरून जन्मवेळ ठरविता येते . मी ज्यावेळी पत्रिका तयार करायला घेतली 

त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट खालीलप्रमाणे होते 

दि --२४ / ८ / २०२१   वेळ --२२-५६-५८   स्थळ-- फलटण 

लग्न नक्षत्र स्वामी  शुक्र , लग्न स्वामी मंगल , चंद्र नक्षत्र स्वामी शनी , राशी स्वामी गुरु , वाराचा  स्वामी मंगल 

शुक्र * मंगल , शनी , गुरु , मंगळ 

 गुरु व शनी दोन्ही  वक्री आहेत . त्यामुळे गुरु शनी घेता येणार नाहीत राहिले दोनच ग्रह शुक्र व मंगल . केवळ दोन 

ग्रहांवरून जन्मवेळ ठरविता येणार नाही . रुलिंग मध्ये कमीतकमी चार ग्रह असले पाहिजेत.  थोडा विचार 

केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे शुक्राच्या वृषभ राशीत राहू आहे व मंगळाच्या वृश्च्छिक राशीत केतू 

आहे . म्हणून  राहू केतू आपणाला रुलिंग मध्ये घेता येतील . आता रुलिंग असे होईल--

 

शुक्र * , (राहू ),  मंगळ , ( केतू) , मंगळ 

 राहू केतू ना राशी नाहीत याचा अर्थ सदर कुंडलीचे लग्न एक तर शुक्राचे किंवा मंगळाचे असले पाहिजे . . सदर 

जातकाची तारीख नक्की आहे  म्हणजे प्रथम आपल्याला कालावधी ठरवावा लागेल  दिलेली तारखेनुसार ३१ 

जानेवारी रात्री १२ नंतर ते १ फेब्रुवारी १९६२ च्या रात्री १२ वाजेपर्यंत चा कालावधी घ्यावा लागेल. एकंदरीत २४ तास  

धरावे लागतील परंतु रुलिंग प्लॅनेट ने आपले काम सोपे केले आहे . आपल्याला फक्त शुक्र व मंगळाची लग्ने  केंव्हा 

येतात तेवढेच पाहायचे आहे . 

तूळ लग्न ---२३-२६-४६ ते ०१-३६-०९

वृश्च्छिक लग्न ---१--३६--०९  ते ३--४९--३०

मेष लग्न ---११--०२--४८ ते १२ --४७  -३३

वृषभ लग्न ---१२--४७--३३ ते १४--४७ --५० 


वृषभ , तूळ , मेष  व वृश्च्छिक यापैकी एक लग्न या  पत्रिकेचे असले पाहिजे. 

१) प्रथम वृश्च्छिक लग्न घेऊ .... वृश्चिक राशिस्वामी मंगल रुलिंग मध्ये आहे वृश्चिक राशीमध्ये गुरु, शनी बुद्धाचे 

नक्षत्र आहे त्यापैकी गुरु शनी रुलिंग मध्ये आहे परंतु गुरु शनी व क्री आहेत व बुद्ध रुलिंग मध्ये  नाही म्हणून वृश्चिक 

लग्न असणार नाही 

२) मेष लग्न ... मेष लग्नाचा स्वामी मंगल रुलिंग मध्ये आहे मेष राशीमध्ये केतू शुक्र व रवीचे नक्षत्र आहे . 

यापैकी केतू शुक्र रुलिंग मध्ये आहेत . म्हणजे मेष लग्न असू शकते 

३) तूळ लग्न .... तुला राशीचा स्वामी शुक्र रुलिंग मध्ये आहे तुला राशी मध्ये मंगल राहू गुरु ची नक्षत्रे आहेत. यापैकी

 मंगल राहू रुलिंग मध्ये आहेत म्हणजे या कुंडलीचे तुला लग्न असू शकते 

४) वृषभ  लग्न ---वृषभ राशीचा स्वामी शुक्र रुलिंग मध्ये आहे वृषभ राशीमध्ये रवी चंद्र मंगळ ची नक्षत्रे आहेत 

यापैकी मंगळ रुलिंग मध्ये आहे म्हणजे वृषभ लग्न असू शकते 

एकूण   चार लग्णांपैकी तीन लग्ने  शिल्लक राहिली ---मेष ,वृषभ , तूळ यापैकी एक लग्न असणार आहे यापैकी 

कोणते लग्न असेल ते ठरवू 

मेष  स्वामी मंगळ 

वृषभ   स्वामी शुक्र 

तूळ   स्वामी  शुक्र 

शुक्र रुलिंग मध्ये लग्न नक्षत्र स्वामी आहे व मंगळ लग्न स्वामी आहे . लग्न नक्षत्र स्वामी शुक्र  हा लग्न स्वामी पेक्षा श्रेष्ठ 

आहे किंवा पहिल्या प्रतीचा आहे म्हणून मेष लग्न असणार नाही आता राहिले वृषभ व तुला लग्न या दोन पैकी कोणते 

लग्न असेल ते ठरवू  

 

वृषभ राशी मध्ये रवी चंद्र मंगल ची नक्षत्रे आहेत यापैकी मंगल रुलिंग मध्ये आहे म्हणून वृषभ लग्न मंगल नक्षत्र 

होईल आता सब व सब सब ठरवू राहू हा लग्न नक्षत्र स्वामी शुक्राचे प्रतिनिधित्व करतो म्हणून राहू सब घ्यावा लागेल 

व केतू सब सब घ्यावा लागेल . म्हणजे साखळी झाली लग्न वृषभ  नक्षत्र मंगळ, राहू सब , केतू सब सब 

 वृषभ -मंगल -राहू- केतू

आता तुला लग्नाचा विचार करू तूळ राशी मध्ये मंगल राहू गुरु ची नक्षत्रे आहेत यापैकी मंगल राहू रुलिंग मध्ये आहे . 

राहू लग्न नजष्ट्र स्वामी शुक्राचे प्रतिनिधित्व करतो शिवाय छाया ग्रह बलवान असतात .म्हणून राहू नक्षत्र स्वामी 

 म्हणून घेतला पाहिजे .  आता सब व सब सब ठरवू शिल्लक राहिले मंगळ आणि केतू . यापैकी केतू छाया ग्रह आहे 

म्हणून बलवान आहे म्हणून केतू सब म्हणून घ्यावा लागेल व सब सब म्हणून मंगळ घ्यावा लागेल आता साखळी 

अशी तयार झाली   लग्न तूळ नक्षत्र राहू सब केतू सब सब मंगल 

 तूळ --राहू --केतू--मंगळ 

  १)  वृषभ -मंगल -राहू- केतू 

 २) तूळ --राहू --केतू--मंगळ 

या दोन पैकी एक लग्न असणार आहे ते कोणते असेल ते ठरवू ----

दोन्ही लग्नाचे स्वामी शुक्र च आहेत . त्यांच्या नक्षत्र स्वामींचा विचार करू . रुलिंग मध्ये राहू हा लग्न नक्षत्र स्वामी 

शुक्राचे प्रतिनिधित्व करत आहे व मंगळ हा लग्न स्वामी आहे . म्हणून राहू पहिल्या प्रतीचा झाला आहे म्हणून 

कुंडलीचे लग्न तूळ च असले पाहिजे . 

आता या साखळीवरून लग्नाचे अंश सब सब कोष्टकावरून काढता येतील . ते येतात  १४ अंश ४४ कला ४५ 

विकला  कॉम्पुटर मधील ट्रान्झिट ऑपशन वापरून तुला लग्न या अंश कलावर  केंव्हा उदित होईल ते आपल्याला 

काढता येईल. वेळ येते   ००-२९-३५  am 

काढलेली वेळ बरोबर आहे कि नाही ते पाहण्यासाठी त्यांच्या पत्नी मुलगी मुलगा यांच्याशी पडताळून पाहू. 

या साठी आपण सब चंद्र संबंध थेअरी च वापर करणार आहोत. 

१) जातकाचा लग्नाचा सब केतू आहे  केतू मकर राशीत व मंगळाच्या नक्षत्रात आहे मंगल चंद्राचा राशी 

स्वामी आहे जातकाचा चंद्र बुध च्या लग्नाचा सब केतू व चंद्र नक्षत्र बुध युतीत आहे . 

२) सप्तमाचा सब शुक्र चंद्राच्या नक्षत्रात व पत्नीचा चंद्र राशी स्वामी चंद्रच आहे . तसेच साप्टमचा सब शुक्र 

चा राशी स्वामी शनी आहे पत्नीचा चंद्र शनी नक्षत्रात आहे 

३)लग्नाचा सब केतू  मकर राशीत व मंगळाच्या नक्षत्रात आहे  व धाकट्या मुलाचा चंद्र नक्षत्रस्वामी केतू च 

आहे . 

४) लाभाचा सब   रवी मकर राशीत चंद्राच्या नक्षत्रात आहे मोठ्या मुलीचा चंद्र वृषभ राशीत मंगळाच्या 

नक्षत्रात आहे लाभाचा सब रवी चा  व त्याचा नक्षत्रस्वामी चा कोणत्याही प्रकारे मोठ्या मुलीच्या चंद्राशी 

संबंध येत नाहीत . म्हणून मी लग्नाचा , सप्तमाचा , सब न बदलता लाभाचा सब बदलला त्यासाठी जन्मवेळ 

१ मिनिटाने वाढवली , म्हणून जन्मवेळ ००-३०-३५  अशी  घेतली . या नवीन जन्मवेळेनुसार लाभाचा सब 

चंद्र वृश्चिक राशीत बुध च्या नक्षत्रात आहे . येथे लाभाचा सब चा राशिस्वामी मंगल आहे व मोठ्या मुलीचा 

चंद्र नक्षत्र मंगल च आहे. 

५) अशाप्रकारे जातकाची जन्मवेळ ००-३०-३५ अशी निश्चित केली . 


आता जातकाच्या आयुष्यातील घटना पडताळून पाहू ----

१) विवाह तारीख ---६ जून १९९०

या तारखेला   शुक्र गुरु शनी दशा चालू  होती . 

शुक्र ----१,२,३,४,७,८,११ चा कार्येश 

गुरु ----२,३,४,६,७,९,१०,१२  चा कार्येश 

शनी .... २,३,४,५,६, ९, ,१२

नियम-- सप्तमाचा सब २,७,११ चाकार्येश असेल तर त्यांच्या सयुंक्त दशेत विवाह होतो. येथे सर्वच भाव 

२,७,११ / ५ ,८ भाव कार्यन्वित झाले आहेत. 

२) नोकरी ---३ डिसेंबर १९८६ 

या कालावधीत शुक्र शनी शनी दशा चालू होती 

शुक्र ... १,२,३,४,७,८,११ चा कार्येश 

शनी---२,३,४,५,६, ९, ,१०,१२

नियम---दशमाचा सब २,६,१० भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेमध्ये नोकरी लागते. 

यथे सर्वच भाव २,६,१० भाव कार्येश आहे . 

जातक बँकेत नोकरीला होते . 

दशमाचा सब राहू बुध  नक्षत्रात आहे बुध  गुरु युतीत आहेत. बुध  गुरु बँकिंग सेक्टर दाखवितात. 

महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

शुभम भवतु  !!!

No comments:

Post a Comment