कृष्णमूर्ति ज्योतिष

Sunday 13 October 2019

Case Study---106

शोध --जावयाचा --२


                                        फेसबुकवरील लेख वाचून एका अपिरिचित व्यक्तीने मला नागपूरहून फोन केला . म्हणाले माझी मुलगी अमेरिकेत असते . ती डॉक्टर आहे . तिने अमेरिकेत एम एस  केले आहे . आता सद्या तिची इंटरशिप चालू आहे . आता आम्हाला वाटते तिचा विवाह व्हावा . आहे . तर तिच्या विवाहासाठी आपण मार्गदर्शन करावे . साधारणपणे तिचा विवाह कोणत्या कालावधीत होऊ शकतो . त्यादृष्टीने आम्हाला प्रयत्न करता येईल. आम्ही  शक्यतो तिकडचेच  एखादे स्थळ पाहण्याचा  प्रयत्न करीत आहोत. बऱ्याच वेळा  पालक वर्ग मुलगा मुलगी नोकरी व्यवसाय मध्ये स्थिर झाली कि त्याच्या विवाहाचे प्रयत्न सुरु करतात. आणि दोन तीन वर्ष प्रयत्न करूनही विवाह ठरत नाही त्यावेळी ज्योतिषाकडे धाव घेतात. मला वाटते ज्यांचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे त्यांनी एखादा तज्ज्ञ ज्योतिषाकडून मुला  मुलीचे विवाहाचे योग केंव्हा आहे ते जाणून घ्यावेत. व त्या अनुषंगाने प्रयत्न करावेत. म्हणजे वेळ व पैसा  वाचेल.
                                   मी त्यांच्या घरातील सर्वांचे बर्थ  डिटेल्स मागवून घेतले ( आई,वडील धाकटी  बहिण  व डॉक्टर मुलीचे  ) गोपनीयतेच्या कारणास्तव येथे त्यांचे बर्थ  डिटेल्स दिलेले नाहीत .ज्यांना पडताळणी करावयाची असेल त्यांनी व्यक्तिगत संपर्क करावा

दि -------- वेळ ------- स्थळ   रे ७३,५२  अ  १८,३२

                                        प्रथम मी या पत्रिकेची लग्नशुद्धी करून घेतली . लग्नाचा सब शुक्र रवीच्या नक्षत्रात आहे जो तिच्या पत्रिकेत चंन्द्राचा नक्षत्रस्वामी आहे तृतीय स्थान धाकटी बहीण तृतीयेचा सब गुरु सिंह राशीत रवीच्या नक्षत्रात आहे बहिणीच्या पत्रिकेत चंद्र राहू नक्षत्रात आहे . सब चा नक्षत्रस्वामी रवी, चंद्र ( धाकटी बहीण ) नक्षत्रस्वामी राहू युतीत आहेत. चतुर्थ स्थान आईचे आहे चतुर्थाचा सब शनी चंद्र नक्षत्रात आहे . आईच्या पत्रिकेत चंद्र सिंह राशीत केतूच्या नक्षत्रात आहे सब चा नक्षत्रस्वामी चंद्र व चंद्र ( आई )नक्षत्रस्वामी केतू युतीत आहेत. नवम स्थान  वडिलांचे आहे नवम स्थानाचा सब शनी आहे जो वडिलांच्या पत्रिकेत चंद्र नक्षत्रस्वामी आहे . ह्यावरून पत्रिकेची वेळ बरोबर आहे हे सिद्ध होते . मुलगी डॉक्टर आहे  ( दंत वैध  )

                                चतुर्थाचा सब  ४,५,६ ,७ ,८ ,९, १० चा कार्येश असून रवी मंगल केतू शी संबंधित असेल तर वयक्ती डॉक्टर होते. चतुर्थाचा  / नवमाचा सब शनी आहे शनीचे कार्येशत्व  खालीलप्रमाणे


 PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- (10)   10 (11)  
It's N.Swami :-------- Moon:- (5)   4  Cusp Yuti: (6)       Venus-Yuti  (5)   2 (7)
It's Sub :------------ Ketu:- 2       Rashi-Swami Mercury 4   3 6
It's Sub's N.Swami :-- Mars:- (2)   (1) 8  
Itself aspects :------ 4 12 7


चतुर्थाचा / नवमचा सब शनी आहे शनी हाडे व दाताचा कारक आहे . शनी चंद्राच्या नक्षत्रात केतूच्या सब मध्ये आहे . केतू वैद्य आहे . मंगल शस्त्रक्रिया . तसेच ५,११   भाव औषधोपचार ६ भाव आजार, रोग ७ ,१० वैद्यकीय व्यवसाय  म्हणून  सदर मुलगी दंत  वैद्य आहे .

सदर मुलीने अमेरिकेत एम एस केले आहे .
व्ययाचा सब ४,९,११ चा कार्येश असेल व्यक्ती परदेशात उच्च शिक्षण घेते .

व्ययाचा सब बुध आहे बुधा चे कार्येशत्व

 PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (4)   (3) (6)  
It's N.Swami :-------- Mercury:- (4)   (3) (6)  
It's Sub :------------ Saturn:- (10)   10 (11)  
It's Sub's N.Swami :-- Moon:- (5)   4  Cusp Yuti: (6)       Venus-Yuti  (5)   2 (7)
Itself aspects :------ 10

४ थ्या पायरीवर चंद्र आहे चंद्र आणि गुरु ची युती आहे( ८ अंश ) म्हणून गुरूमुळे ५,९,१२ चे कार्येशत्व बुधाला मिळेल. बुध ३,४,५,६,७,९,१०,११,१२ चा कार्येश आहे . ह्यामधील ४,५,६,९,११,१२ मुले परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले

आता आपण तिच्या विवाहाचा विचार करू. ----

सप्तमाचा सब २,७,११,५,८ या पैकी भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेत विवाह होतो.
मी पत्रिका पहिली त्यावेळेचे रुलिंग ----

दि  ४/१०/१९  वेळ २२-४२-३२

मंगळ *  बुध   केतू   गुरु   शुक्र                 ( बुध  / राहू ,  गुरु / केतू )

या पत्रिकेत सप्तमाचा सब बुध  आहे बुध रुलिंग मध्ये आहे . बुधा चे कार्येशत्व ----

खरे तर सप्तमाचा सब बुध  असू नये , कारण बुध  द्वित्व दाखवितो. एकापेक्षा जास्त विवाह परंतु बुध  जर २,७,११,५,८ हे भाव दाखवीत असेल तर काही वाईट परिणाम घडणार नाहीत .

 PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (4)   (3) (6)  
It's N.Swami :-------- Mercury:- (4)   (3) (6)  
It's Sub :------------ Saturn:- (10)   10 (11)  
It's Sub's N.Swami :-- Moon:- (5)   4  Cusp Yuti: (6)       Venus-Yuti  (5)   2 (7)
Itself aspects :------ 10

४ थ्या पायरीवर चंद्र आहे चंद्र आणि गुरु ची युती आहे ( ८ अंश ) म्हणून गुरूमुळे ५,९,१२ चे कार्येशत्व बुधाला मिळेल.

वरील पत्रिकेत बुध  ३,४,५,६,७, ९, १०,११ ,१२ चा कार्येश आहे

३,५,७,९,११ हे भाव अनुकूल आहेत . ४,६,१०,१२ भाव प्रतिकूल आहेत. येथे सप्तम भावाचा संबंध पंचम भावाशी येतोय . एखादी पुरुष व्यक्ती आयुष्यात येऊ शकते . परंतु पंचम भावाचा सब रवी ७ चा कार्येश नाही . म्हणून प्रेम विवाह होणार नाही . बुध ४,१० ,३,९,१२ चा कार्येश आहे ४,१० मुळे मुलगी राहते त्या गावातील ( आईच्या नात्यातील )व  ३,९,१२  मुळे परदेशात गेलेला,  स्थळ असेल.

आता आपण विवाह केंव्हा होईल हे पाहण्यासाठी पत्रिकेतील दशा पाहू

                                                 प्रथम पत्रिका पहिली त्यावेळी राहू मध्ये बुधा ची अंतर्दशा चालू आहे . याच  बरोबर ७ चा सब बुध स्वनक्षत्रात ,  शनीच्या सबमधे आहे . याठिकाणी शनीचा संबंध येतोय . शिवाय शनी चंद्राच्या नक्षत्रात आहे . म्हणजे पुनरफू योग  आहे . विवाह उशिरा होणार आहे . आता उशिरा म्हणजे किती उशिरा समजायचे , ज्यावेळी आई वडिलांना विवाह व्हावा असे वाटते त्यानंतर २-३ वर्षांनी विवाह होतो. माझ्यामते ज्यावेळी विवाहामध्ये शनीचा संबंध येतो त्यावेळी विवाहाचे वय २९ ते ३२ असते. म्हणून मी बुध  अंतर्दशा सोडून दिली . त्यापुढील केतू अंतर दशा घेतली राहूचे कार्येशत्व -----


PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (8)      Rashi-Swami Jupiter (5)   (9) (12)
It's N.Swami :-------- Ketu:- (2)      Rashi-Swami Mercury (4)   (3) (6)
It's Sub :------------ Sun:- 5   5  
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (2)      Rashi-Swami Mercury (4)   (3) (6)
Itself aspects :------ 3



राहू २,३,४,५,६,८,९, १२ भावांचा कार्येश आहे . यापैकी २,३,५,८,९ हे भाव अनुकूल आहेत  विवाहासाठी ६ भाव असू च नये कारण ६ भाव दूरत्व निर्माण करतो. या पत्रिकेत सर्वच ग्रह ६ भाव दाखवितात. २,३,५,८,९अनुकूल भावामुळे   राहू दशेत  विवाह होणार . आता केतू अंतर्दशेचा विचार करू . केतुचे कार्येशत्व ---



PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 2       Rashi-Swami Mercury 4   3 6
It's N.Swami :-------- Mars:- (2)   (1) 8  
It's Sub :------------ Venus:- (5)   2 (7)  Cusp Yuti: (6)       Moon-Yuti  (5)   4
It's Sub's N.Swami :-- Sun:- (5)   5  
Itself aspects :------ 9


केतू २,५,६,७, भावांचा कार्येश आहे यातील २,५,७ अनुकूल आहेत .
आता त्या पुढील शुक्राची  विदशा . शुक्राचे कार्येशत्व ----

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (5)   2 (7)  Cusp Yuti: (6)       Moon-Yuti  (5)   4
It's N.Swami :-------- Sun:- (5)   5  
It's Sub :------------ Saturn:- (10)   10 (11)  
It's Sub's N.Swami :-- Moon:- (5)   4  Cusp Yuti: (6)       Venus-Yuti  (5)   2 (7)
Itself aspects :------ 12


शुक्र ५,६,७,१०,११ भावांचा कार्येश आहे  यातील ५,७,११ अनुकूल आहेत .
राहू महादशा केतू अंतर्दशा शुक्र विदशा म्हणजे एप्रिल २०२२ ते जुलै २०२२ या कालावधीत विवाह होईल .
राहू महादशा   केतू अंतर दशा  शुक्र विदशा मध्ये (१,४, ६ , १०,१२ ) हे भाव असल्यामुळे वैवाहिक सौख्य असमाधानकारक राहील .

    गोचर भ्रमण---- या कालावधीत गोचर भ्रमण अनुकूल असेल तरच विवाह होईल . राहू केतू हे मंद गतीचे ग्रह असल्यामुळे त्यांचे सब मधील भ्रमण व शुक्र शीघ्र गतीचा ग्रह असल्यामुळे त्याचे नक्षत्रातील भ्रमण पाहावे लागेल . खालील कालावधीत राहू केतू व शुक्राचे गोचर भ्रमण अनुकूल आहे 

           १) २८ एप्रिल २०२२ ते ११ मे  २०२२

           २) ४ जुन २०२२        ते १५ जून २०२२                     

वरील कालावधीत च विवाह होईल. असे सांगता येईल. विवाह ठरणे आणि होणे यामध्ये अंतर असू शकते . कार्यालयाच्या तारखा या काळात उपलब्ध असतील तर या काळात विवाह होईल नाहीतर या काळात विवाह ठरू शकतो. 

वडिलांनी अजून एक प्रश्न विचारला आहे मुलगी विवाहानंतर अमेरिकेत कायमस्वरूपी राहील का ? व्ययाचा  सब बुध कर्क या चर राशीत ,. बुधाचा नक्षत्रस्वामी बुध च आहे म्हणून त्याचा सब शनी हा नक्षत्रस्वामी म्हणून घेतला आणि शनी मकर राशीत म्हणजे चर राशीत आहे म्हणून मुलगी अमेरिकेत कायमस्वरूपी राहणार नाही असे सांगितले .

महाजनांनी आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात .

शुभंम भवतु  !!!

No comments:

Post a Comment