Saturday, 15 May 2021

प्लूटो इफेक्ट ----

दोन  दिवसापूर्वी एका  जुन्या जातकाने एक पत्रिका पाठवली . आणि म्हणाली हा माझा भाऊ आहे ह्यच्या विवाहाचा योग्य केंव्हा आहे . वय फार वाढलेले आहे . अजूनही  जुळून  येत नाही  त्याचे बर्थ डिटेल्स खालीलप्रमाणे ---

दिनांक ---१/ ९ /१९८३  वेळ--४-४६ पहाटे जन्मस्थळ अ  १५ , २०   रे ७४,३०

जन्म १९८३ चा आहे म्हणजे आता वय ३८ चालू आहे . प्रथम एवढा उशीर का झाला ह्याचे कारण शोधून काढले पाहिजे सर्वसाधारणपणे   विवाहाला मंगल शनी हर्षल नेपच्यून व प्लूटो या ग्रहांमुळे उशीर होतो .  मंगळामुळे २७--२८  वर्षी विवाह होतो. विवाहामध्ये शनीचा संबंध येतो तेंव्हा वय साधारण २९--३२ असते  ह्यच्याही पुढे विवाहामध्ये हर्षल नेपच्यून व प्लूटो या ग्रहांचा संबंध येतो. हर्षल मुले एकदा  तरी विवाह मोडतो . नेप्च्यूनमुळे जातकाची फसवणूक होऊ शकते त्यामुळेसुद्धा विवाहाला उशीर होतो. विवाहा मध्ये  प्लूटो या ग्रहाचा संबंध येत असेल तर प्लूटो संबंधित घटनाच होऊ देत नाही असा अनुभव येतो . आता नेमके काय झाले ते पाहू ------

नियम --सप्तमाचा सब किंवा त्याचा नक्षत्रस्वामी २,७,११,५,८ यापैकी भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेमध्ये विवाह होतो . 

मी जेंव्हा कुंडली सोडवायला घेतली त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट खालीलप्रमाणे होते ---

१४ / ५ /२०२१ वेळ--१६-३१-३९ 

मंगळ * बुद्ध , मंगळ , शुक्र , शुक्र 

शुक्राच्या राशीत राहू आहे व मंगळाच्या राशीत केतू आहे म्हणजे हे दोन्ही ग्रह रुलिंग मध्ये घेता येतील  या पत्रिकेत ७ भावाचा सब शुक्र आहे शुक्र रुलिंग मध्ये आहे म्हणजे पत्रिकेची वेळ बरोबर आहे .या पत्रिकेतील योग  पाहू ---

गुरु हर्षल युती (२ अंश २८ कला ), केतू नेफयून युती ( ५ अंश ,३० कला ) शनी प्लूटो युती ( ३ अंश ४ कला )

या पत्रिकेत सप्तमाचा सब शुक्र आहे . शुक्र रुलिंग मध्ये आहे शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 1   4 11   
It's N.Swami :-------- Ketu:- (5)      Rashi-Swami Mars (12)   5 10
It's Sub :------------ Moon:- (10)   1  Cusp Yuti: (11)     
It's Sub's N.Swami :-- Moon:- (10)   1  Cusp Yuti: (11)     
Itself aspects :------ 8

शुक्र केतू च्या नक्षत्रात आहे केतू नेपच्यून च्या युतीत आहे शुक्र ५,११ या अनुकूल भावाचा कार्येश आहे म्हणजे विवाह व्हायला हवा होता तरीपण विवाह झाला नाही . 
आता दशा पाहू -----
विवाह योग्य  वय आपण वय वर्षे २५ घेऊ . वयाच्या २५ व्या वर्षी दशा राहूची होती . राहूचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ---

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 11       Rashi-Swami Venus 1   4 11
It's N.Swami :-------- Mars:- (12)   5 10  Cusp Yuti: (1)     
It's Sub :------------ Jupiter:- (4)   (6) (9)   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (3)   (7) (8)   
Itself aspects :------ 5


राहू  पहिल्या तीनही पायरीवर प्रतिकूल भावांचा कार्येश आहे फक्त ४ थ्या पायरीवर ३,७,८ भावांचा कार्येश आहे . राहू दशा विवाहाला अनुकूल असून सुद्धा विवाह झाला नाही ह्याला एकमेव कारण ४ थ्या पायरीवर शनी प्लुटोच्या युतीत आहे . राहू महादशा सप्टेंबर २०१० पर्यंत होती. २०१० पर्यंत विवाह झाला नाही. त्यानंतर गुरु महादशा सप्टेंबर २०२६पर्यंत आहे गुरु महादाशेमध्ये गुरु अंतर्दशा ऑक्टोबर २०१२ पर्यंत आहे गुरु चे कार्येशत्व 

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (4)   (6) (9)   
It's N.Swami :-------- Saturn:- (3)   (7) (8)   
It's Sub :------------ Venus:- 1   4 11   
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (5)      Rashi-Swami Mars (12)   5 10
Itself aspects :------ 11 9 1


४ थ्या पायरीवर केतू बुध  नक्षत्रात आहे बुध  २ ऱ्या स्थानात आहे . एकूण गुरु २,३,५,७,८ भावाचा कार्येश असून सुद्धा गुरु अंतर्दशेत विवाह झाला नाही . कारण गुरु शनीच्या नक्षत्रात आहे शनी प्लूटो युती आहे ( ३ अंश ४ कला )त्यापुढील अंतर्दशा शनीची आहे शनी अंतर्दशा  मे  २०१५ आहे म्हणून २०१५ पर्यंत विवाह झाला नाही .तयानांतर बुधा ची अंतर दशा बुध  २ भावाचा कार्येश आहे बुध  अनुकूल असूनसुद्धा विवाह झाला नाही बुध  अंतर्दशा ऑगस्ट २०१७ पर्यंत होती . महादशा . अंतर्दशा तरी विवाहाला अनुकूल असली पाहिजे  महादशा गुरु अनुकूल नाही अजून एक विचार प्रवाह असाही आढळून येतो तो म्हणजे पहिल्या दोन पायरीवर जर प्लूटो चा संबंध येत असेल तर अशुभ परिणाम होत नाही . येथे  ह्या विचारला छेद जातोय येथे दुसऱ्या पायरीवर प्लुटोचा संबंध आला आहे . तरी सुद्धा घटना घडली नाही .  पुढील केतू अंतर्दशा जुलै २०१८ पर्यंत होती. केतुचे कार्येशत्व ---

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 5       Rashi-Swami Mars 12   5 10
It's N.Swami :-------- Mercury:- (2)   3 12   
It's Sub :------------ Jupiter:- (4)   (6) (9)   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (3)   (7) (8)   
Itself aspects :------ 11केतू २,३,७,८,९ चा कार्येश असूनसुद्धा विवाह झाला नाही . केतू नेपच्यून च्या युतीत ( ५ अंश ३० कला ) व ४ थ्या पायरीवर शनी प्लूटो युतीत आहे ( ३ अंश ४ कला ) त्यापुढील शुक्र अंतर्दशा मार्च २०२१ पर्यंत  होती . शुक्र ५,११ भावाचा कार्येश असून सुद्धा या कालावधीत विवाह झाला नाही . त्यापुढे रवी,चंद्र मंगल राहू अंतर दशा शिल्लक आहेत . यापैकी मंगल ३-४ पायरीवर पूर्ण विरोधी भावाचा कार्येश आहे व राहू अनुकूल आहे पण  ४थ्या पायरीवर शनी प्लूटो च्या युतीत आहे मंगल व राहू अंतार्दशे मध्ये विवाह होणार नाही रवी  व चंद्राच्या ४ त्या पायरीवर केतू आहे आणि केतू नेपच्यून युती आहे ( ५ अंश ३० कला )   गुरु महादशेत विवाह होणार नाही . त्यावेळी जातकाचे वय ५२ असणार आहे 

 सप्तमाचा सब शुक्र केतूच्या नक्षत्रात आहे केतू नेप्च्यूनच्या युतीत आहे शुक्र ५ ११ भावांचा कार्येश आहे सप्तमाचा संबंध ५ स्थानाशी म्हणजे एखादे अफेअर असू शकते . येथे नेपच्यून मुळे फसवणूक झाली असावी . 
महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

शुभम भवतु  !!!

Monday, 19 April 2021

जन्मवेळ काढणे ---

फेसबुक वरील  लेख वाचून मुंबई हुन एका जातकाचा फोन -----म्हणाला   मी सद्या  पारंपरिक ज्योतिषाचा अभ्यास  करीत आहे.  फेसबुक वरची तुमची सर्व आर्टिकल मी वाचली आहेत. माझा थोरला भाऊ सरकारी नोकरीत उच्च पदावर आहे . त्याला दोन जुळे मुले आहेत. त्या जुळ्या मुलांची जन्मवेळ निश्चित माहित नाही . जन्मवेळ साधारणपणे रात्री ८ ते ९-३० या दरम्यान आहे . आणि दोन्ही मुलांच्या जन्मवेळेत १० ते १५ मिनिटाचा फरक आहे . त्यांची जन्मवेळ निश्चित करता येईल का ? असा प्रश्न त्याने विचारला . कृष्णमूर्ती पद्धती मध्ये रुलिंग प्लॅनेट वरून जन्मवेळ ठरविता येते . मी म्हटले त्या दोघांची बर्थ डिटेल्स द्या . मी प्रयत्न करतो. 

१) पहिला मुलगा ---दि ९ / ७ /. १९९४   वेळ रात्री ८ ते ९-३० (८-०१-५८ सुधारित )शेवगाव जिल्हा अहमदनगर 

२) दुसरा मुलगा ---दि ९ / ७ /. १९९४   वेळ रात्री ८ ते ९-३० ( ८-१८-५१ ) सुधारित जन्मवेळ )शेवगाव जिल्हा अहमदनगर 

जुळ्या मुलांची जन्मवेळ ठरवायची आहे.


कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये रुलिंग प्लॅनेट च्या  सहायाने वेळ निश्चित करता येते. मी कुंडली सोडविली त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट घेतले 

दि  १७/ ४/२१        वेळ १४-२१-१९ 

केतू* रवी ,मंगळ ,बुध ,शनि

( रवी बुध युती, चंद्र मंगळ युती )

चंद्र मंगळ युती आहे म्हणून चंद्र रुलिंग मध्ये घेतला.

यावेळेत पचांगमध्ये कोणती  लग्ने होती ती पहिली . ती खालीलप्रमाणे ----

मकर..१९-३३-४४ ते २१-२३-१३

कुंभ..२१-२३-१३ ते २२-५९-४३


मकर मध्ये रवी चंद्र मंगळ ह्यांची नक्षत्रे आहेत..रवी चंद्र मंगळ रुलिंग मध्ये आहेत.

कुंभ राशी मध्ये मंगळ राहू गुरू ची नक्षत्रे आहेत.यापैकी मंगळ रुलिंग मध्ये आहे.

मकर किंवा कुंभ यापैकी एक लग्न आहे हे नक्की.

मी,  त्यांनी दिलेल्या पहिल्या मुलाची वेळ काढण्याचे ठरविले.

रुलिंग मध्ये रवी लग्न रास आहे मंगळ चंद्र नक्षत्र आहे. रवी पहिल्या प्रतीचा आहे म्हणून मी मकर लग्न निच्छित केले.

लग्न मकर नक्षत्र रवी निश्चित  केले आता सब व सब  सब निश्चित  करू.सब सब  कोष्टकमध्ये मकर लग्न रवी नक्षत्र च्या पुढे कोणते सब आहेत ते पहिले . सब राहू, गुरू, शनी ,बुध ,केतू ,शुक्र शिल्लक आहेत. राहू गुरू शुक्र रुलिंग मध्ये नाहीत.फक्त शनी बुध केतू आहेत. यापैकी शनी आपण लग्न रास म्हणून वापरला आहे. आता बुध केतू राहिले .यामधे केतू लग्न नक्षत्र स्वामी आहे म्हणून सब केतू निश्चित केला . आता सब सब ठरवायचे.रुलिंग मध्ये  मंगळ व बुध शिल्लक आहे. मंगळ , बुध मध्ये मंगळ श्रेष्ठ आहे म्हणून मंगळ सब सब निश्चित  केला.आता साखळी अशी तयार झाली

लग्न मकर ,नक्षत्र रवी ,सब केतू ,सब सब मंगळ. जेंव्हा उदयास येईल त्यावेळी जन्म झाला असे म्हणता येईल. 

सब सब कोष्टक वापरून ,अंश कला विकला ठरविले.ते येतात मकर ७ अंश ४३ कला २१ विकला. यावरून वेळ ठरवली ती येते रात्री ८-०१-५८

ही झाली पहिल्या मुलाची जन्म वेळ.

आता दुसऱ्या मुलाची जन्मवेळ ठरवू.पाहिल्या व दुसऱ्या मुलामध्ये १० ते १५ मिनिटं अंतर आहे.  रुलिंग तेच धरून जन्मवेळ निश्चित करायची आहे.

लग्न मकर चंद्र नक्षत्र ठरविले.

सब ठरविण्यासाठी , कोष्टकात खालील सब शिल्लक आहेत.

चंद्र, मंगळ,राहू ,गुरू शनी बुध केतू शुक्र रवी

चंद्र दोनदा आलेला नाही म्हणून चंद्र सोडून दिला.त्यापुढील मंगळ निश्चित केला.कारण राहू गुरू शुक्र रुलिंग मध्ये नाहीत.बुध केतू रवी रुलिंग मध्ये आहेत पण ते घेतले तर जन्मवेलेत खूप फरक पडेल.म्हणून बुध केतू रवी घेतले नाहीत.

मकर लग्न चंद्र नक्षत्र मंगळ सब रवी सब सब अशी साखळी तयार होईल.सब सब कोष्टकावरून त्यांचे अंश ठरविले ते येतात

मकर ११-४८-१७

यावरून जन्मवेळ येते रात्री ८-१८-५१

अशाप्रकारे जुळ्या मुलांची जन्मवेळ निश्चित केली.

महाजनांनी मार्गदर्शन करावे 

शुभंम भवतु !!!

Saturday, 27 March 2021

विवाह --

फेसबुकवरील  लेख वाचून एका स्त्री जातकाचा फोन -----माझा विवाह केंव्हा होईल हे सान्गु शकाल का ?  आपले बर्थ डिटेल्स द्या मी म्हटले . ती म्हणाली देते , पण माझे डिटेल्स कृपया सार्वजनिक करू नका . ठीक आहे मी म्हटले . ज्यांना पत्रिकेची पडताळणी करायची असेल त्यांनी व्यक्तिगत मेसेंजर वर मेसेज करावा . तिचे डिटेल्स खालील प्रमाणे ----

दि १६ मे ----- वेळ १२--५२  ( सुधारित ) स्थळ XXXX 

मी जातकाची जन्मवेळ सब चंद्र कनेक्शन थेअरी प्रमाणे निश्चित केली आहे . ( आई, वडील,बहीण ) 

१) लग्नाचा सब राहू चा राशिस्वामी गुरु , जो चंद्राचा नक्षत्रस्वामी आहे . 

२) लाभाचा सब राहू चा राशिस्वामी गुरुची अंशात्मक दृष्टी मोठ्या बहिचणीच्या चंद्रावर आहे 

३) चतुर्थाचा सब बुध शुक्रच्या नक्षत्रात , शुक्र आईच्या चंद्राचा राशिस्वामी आहे 

४) नवम भावाचा सब राहू हा वडिलांचा चंद्र नक्षत्रस्वामी आहे 


हि कुंडली सिंह लग्नाची आहे . 

विवाह -- ७चा सब २,७,११ भावांचा कार्येश असेल तर २,७,११ भावांच्या कार्येश दशेत विवाह होईल 

या पत्रिकेत ७ चा सब राहू आहे . राहूचे कार्येशत्व 

PLANET : RAHU

Itself :-------------- Rahu:- 5     Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Jupiter 1   5 8  Jupiter-Drusht  1  5 8

It's N.Swami :-------- Ketu:- (11)    Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Mercury (9)   (2) 11

It's Sub :------------ Jupiter:- 1   5 8   

It's Sub's N.Swami :-- Ketu:- (11)    Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Mercury (9)   (2) 11

Itself aspects :------ 11

२ व ४ थ्या पायरीवर केतू राहू नक्षत्रात आहे राहू पंचमात आहे राहू धनु राशीत राशिस्वामी गुरु प्रथम स्थानी आहे म्हणून ५,१, चे कार्येशत्व केतूला मिळेल.  
राहू १,२,५,९,११ चा कार्येश आहे विवाह होणार हे निश्चित सांगता येईल. 
                             आता केंव्हा होणार ह्यासाठी आपण दशा पाहू ..  कुंडली पाहतेवेळी बुध महादाशेमध्ये बुध  अंतर्दशा ३ ऑक्टोबर २०२० पर्यंत होती. कुंडलीचे लग्न सिंह हे स्थिर लग्न असल्यामुळे बुध  अंतर्दशेमध्ये विवाह होणार नाही म्हणून बुधाची अंतर्दशा सोडून दिली. त्यापुढील केतूची अंतर दशा विचारात घेतली बुध व केतू चे कार्येशत्व खालीलप्रमाणे --- बुध  / केतू  ३ /१०/२०२० ते ३० / ९/२०२१ प आहे 

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (9)   (2) 11     Jupiter-Drusht  (1)   5 8
It's N.Swami :-------- Venus:- (9)   3 (10)     Moon-Drusht  (3)   (12)
It's Sub :------------ Venus:- (9)   3 (10)     Moon-Drusht  (3)   (12)
It's Sub's N.Swami :-- Venus:- (9)   3 (10)     Moon-Drusht  (3)   (12)
Itself aspects :------ 3

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 11     Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Mercury 9   2 11
It's N.Swami :-------- Rahu:- (5)    Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Jupiter (1)   5 8  Jupiter-Drusht  (1)   5 8
It's Sub :------------ Jupiter:- 1   5 8   
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (11)    Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Mercury (9)   (2) 11
Itself aspects :------ 5

बुध २,३,९ ( पंचमचे पंचम ) चा कार्येश आहे . केतू १, २,५,९,११ चा कार्येश आहे ( ४ थ्या पायरीवर केतू राहू नक्षत्रात आहे राहू पंचमात आहे राहू धनु राशीत राशिस्वामी गुरु प्रथम स्थानी आहे )  यामध्ये ७ भाव आलेला नाही . या पत्रिकेत ७ भाव फक्त चंद्र  व मंगळ दाखवितात. चंद्र प्लूटो  अंशात्मक युती ( ०. २ ) असल्यामुळे चंद्र विदशा सोडून दिली व मंगल विदशा निश्चित केली मंगल चे कार्येशत्व ---

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- 8   4 9   
It's N.Swami :-------- Saturn:- (6)   6 (7)   
It's Sub :------------ Rahu:- 5     Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Jupiter 1   5 8  Jupiter-Drusht  1  5 8
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (11)    Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Mercury (9)   (2) 11
Itself aspects :------ 2 11 3

मंगळ २,५,७,९,११ या सर्व भावांचा कार्येश आहे . बुध  महादशा केतू अंतर्दशा व मंगळ विदशा चा कालावधी येतो 
१० फेब्रुवारी २०२१  ते ३ मार्च २०२१ .

मार्च च्या शेवटच्या आठवड्यात  विवाह ठरला आहे असा  जातकाने मेसेज केला.  

उत्तराच्या जवळ पोहोचण्याचे आनंद वेगळाच असतो ना .... 

या कुंडलीचे वैशिष्ट्य असे आहे विवाहाचा कारक शुक्रावर प्लुटोची अंशात्मक दृष्टी आहे ( ३ अंश २५ कला ) असे असूनसुद्धा विवाह ठरला कारण साध्या कुंडलीप्रमाणे  गुरु ची शुक्रावर दृष्टी आहे ( अंशात्मक नाही ) 

महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

शुभंम भवतु !!!

Wednesday, 17 March 2021

कर्ज ---

                          एक त्रिकोणी कुटुंब .पती ,पत्नी व एक ५-६ वर्षाची मुलगी . या पूर्वी ते एकत्र राहत होते . म्हणजे सासू ,मुलगा ,सून व नातं. परंतु सगळ्यांच्या घरात घडते ते यांच्या सुद्धा घरात घडले .  सासू आणि सून यांच्यामध्ये अधून मधून भांडणे होत होती . सासरा मुलगा लहान असतानाच गेला होता . सासूला नवऱ्याची पेन्शन मिळत होती .  पत्नी नवऱ्याला म्हणत होती आपण वेगळे राहू . पण नवरा आईला सोडून वेगळे राहत नव्हता. एक दिवस सासू आणि सुनेचे कडाक्याचे भांडण झाले होते . संध्याकाळी नवरा  घरी आल्यानंतर बायकोने नवऱ्याला भांडणा बद्दल सांगितले . आता बस झाले झाले मी आता माहेरी निघून जाते . नवऱ्याने दोघीना समजावण्याचा प्रयत्न केला . पण काही फरक पडला नाही  . एक दिवस मुलगा बायकोला घेऊन भाड्याच्या खोलीत राहायला गेला  . तिथे गेल्यानंतर दोघांचे व्यवस्थित चालले होते अधून मधून आई मुलाला बोलावून घेत होती. बायकोची त्याबद्दल कोणतीच तक्रार नव्हती . नवऱ्याची क्लास २ ची सरकारी नोकरी होती. 

    एक दिवस बायको नवऱ्याला म्हणाली किती दिवस भाड्याच्या खोलीत राहायचे . आपल्याला परवडेल अशा एखाधा फ्लॅट बघू . नवऱ्याला ही पटत होते. त्यासाठी दोघेही वेगवेगळ्या साईट्स पाहायला गेले . त्यातील एक फ्लॅट दोघांना पसंत पडला . पण फ्लॅटच्या किंमत कोटीच्या घरात होती. त्यांच्या आवाक्यच्या बाहेर होते पत्नी सुद्धा शिकलेली होती . पण नोकरी नव्हती. पत्नी म्हणाली मी नोकरीसाठी प्रयत्न करते दोघांच्या नोकरीवर आपल्याला घरकर्ज काढता येईल . म्हणून पत्नी नोकरीसाठी प्रयत्न करत होती  अशातच एकदा कपडे धूत असताना बायकोला नवऱ्याच्या पॅन्ट  च्या खिशात पगाराची स्लिप सापडली. तिने वाचली त्यावेळी तिच्या लक्षात आले ह्या महिन्यात एकदम १०,०० रुपयाचे कटिंग झाले होते. ति मनात म्हणाली गेल्या महिन्यात कटिंग नव्हते  आणि ह्या महिन्यात एकदम १०,००० रु का कापले . तिने यासंदर्भात नवऱ्याला विचारले . तर नवरा तिला काहीच सांगत नव्हता. तो म्हणायचं माझ्या पगारात तू लक्ष घालू नको. . पण हिच्या डोक्यातून हा विचार जाईना नवऱ्याने कर्ज काढून पैसे कोणाला दिले असतील ? ह्याच विचारातून तिने मला हा प्रश्न विचारला . मी हा प्रश्न ,प्रश्न कुंडलीने सोडवायचे ठरविले . तिला सांगितले  हाच विचार मनात करून मला एक संख्या सांग . तिने २११ हि संख्या सांगितली ह्या संख्येवरून मी खालीलप्रमाणे कुंडली तयार केली . 

दि --५ मार्च २०२१  वेळ १५-१४-५१   फलटण . 

हि कुंभ लग्नाची कुंडली आहे . 

प्रश्न बायकोने नवऱ्याबद्दल विचारला आहे म्ह्णून ७ स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली . 

चंद्र हा मनाचा कारक . मनातील प्रश्न जुळतो का ते पाहू . 

फिरवून घेतलेल्या कुंडलीमध्ये चंद्र चतुर्थात आहे चंद्र शनीच्या नक्षत्रात आहे आणि शनी षष्ठ स्थानात आहे . षष्ठ स्थानावरून कर्जाचा बोध होतो. म्हणजे प्रश्नाचा रोख बरोबर आहे . आता नवऱ्याच्या पत्रिकेत षष्ठ स्थानचा विचार करू. षष्ठ स्थानाचा सब शनी आहे शनीचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : SATURN

Itself :-------------- Saturn:- 6   6 7   

It's N.Swami :-------- Moon:- (3)   (12)  Cusp Yuti: (4)     

It's Sub :------------ Jupiter:- 6   5 8     Mercury-Yuti  6  2 11

It's Sub's N.Swami :-- Mars:- (9)   4 9   

Itself aspects :------ 12 8 3

शनी चंद्राच्या नक्षत्रात आहे चंद्र ३स्थानात ४ भावारंभी आहे शनी ३,४,९,१२ भावाचा कार्येश आहे . 

यातील ४ भावावरून घराचा अर्थबोध होतो. १२ भावावरून गुंतवणूक चा विचार केला जातो. ३,९ भावावरून कर्ज काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे च विचार केला जातो. नवऱ्याने घरासाठी कर्ज काढले आहे असा निष्कर्ष निघतो. तसे मी तिला सांगितले . दोन दिवसांनी तिचा फोन आला म्हणाली तुम्ही म्हणता ते बरोबर आहे . तुम्ही सांगितल्यानंतर मी त्याला सुट्टीच दिली नाही मी खोदून खोदून त्याला विचारले सुरुवातीला म्हटले तुमच्या आईला पैसे दिले का ? कारण माझा नवरा मातृभक्त ना ... तर नाही म्हणाला . मग कशाला कर्ज काढले ? मग त्याने सांगितले मी घरासाठी कर्ज काढले आहे . एखादा फ्लॅट आपल्याला पसंत पडला तर त्याचे डाऊन पेमेंट देण्यासाठी आपल्याकडे पैसे असले पाहिजेत . म्हणून कर्ज काढले.  मी म्हणाले हे मला सांगायला काय हरकत होती ? असो ... 


शुभम भवतु !!!

Friday, 12 February 2021

इच्छित मुलाशी विवाह  होईल का ?

एक स्त्री डॉक्टर फोनवर बोलत होती ..... माझी भाची डॉक्टर आहे . तिची मैत्रीण फोनवर बोलत होती ... म्हणाली माझी मुलगी MBBS  च्या शेवट च्या वर्षात   शिकत आहे .तिला MS करण्या ची इच्छा  आहे .  तिच्या विवाहसंबंधी प्रश्न विचारायचा आहे . माझ्या ओळखीची एक फॅमिली आहे त्यांचा मुलगा डॉक्टर आहे . मुलाच्या आईला माझी मुलगी त्याच्या मुलासाठी करून घेण्याची इच्छा आहे . मलाही वाटते मुलीचा विवाह त्या मुला शी व्हावा .  ते हि मुलीला  MS करणार आहेत . तर मला जाणून घ्यायचे आहे कि माझ्या मुलीचा  विवाह त्यांच्या मुला शी होईल का ? म्हणजे ह्या ठिकाणी वर निश्चित आहे .  हा प्रश्न मूळ कुंडलीवरून सोडविता येणार नाही . हा प्रश्न , प्रश्न कुंडलीने सोडवायला हवा. . म्हणून मी  सांगितले मनांत  हा विचार करून १ ते २४९ मधील एक संख्या सांगा. त्यांनी १४१  संख्या सांगितली . हा प्रश्न मी खालीलप्रमाणे सोडविला ..... 

दि ५ जानेवारी २०२१ वेळ १०=२३=११  औरंगाबाद 

हि कुंडली तूळ  . लग्नाची आहे . 

प्रश्न आईने विचारला आहे . आईच्या मनातील विचार जुळतो का ते पाहू .... 

चंद्र व्ययात आहे . भावचलित कुंडली मध्ये लाभात आहे चंद्र दशमेश आहे . चंद्र रवी च्या नक्षत्रात आहे रवी तृतीयात म्हणजे मुलीच्या लाभात आहे व रवी मुलीचा सप्तमेश आहे . लाभ स्थान हे मुलीचे विवाह स्थान होईल. याचा अर्थ प्रश्न मनापासून विचारला आहे . आता प्रश्न मुलीसंबंधी विचारला आहे म्हणून पंचम स्थान लग्न धरून कुंडली फिरवून घेऊ. 

नियम ---सप्तम भावाचा सब किंवा सब चा नक्षत्रस्वामी स्थिर राशीत असेल आणि २,७,११ पैकी भावाचा कार्येश असेल तर २,७,११ च्या संयुक्त दशेमध्ये  इच्छित व्यक्तीशी विवाह होईल. 

फिरवून घेतलेल्या कुंडली मध्ये सप्तम भावाचा सब चंद्र आहे . चंद्राचे कार्येशत्व ---

PLANET : MOON

Itself :-------------- Moon:- (7)   (6)   

It's N.Swami :-------- Sun:- (10)   11  Cusp Yuti: (11)     

It's Sub :------------ Mercury:- 3   9 12   

It's Sub's N.Swami :-- Sun:- (10)   11  Cusp Yuti: (11)     

Itself aspects :----

चंद्र ७,११ भावाचा कार्येश आहे . पण चंद्र हा कन्या राशीत आहे व चंद्राचा नक्षत्र स्वामी रवी धनु राशीत आहे . 

कन्या व धनु या दोन्ही राशी द्विस्वभाव राशी आहेत . येथे कोठेही स्थिर राशीचा संबंध येत नाही . आता अजून थोडे  खोलात  जायचे म्हटले तर द्विस्वभाव राशीत दोन्ही चर  व स्थिर तत्वे आहेत . ७ भावाचा सब चंद्र आहे चंद्र ५ अंश २८ कला आहे . द्विस्वभाव राशी मध्ये पहिले १५ अंश स्थिर तत्वाचे आहेत . व दुसरे १५ अंश चर तत्वाचे आहेत. यानुसार पहिले तर चंद्र स्थिर तत्वाच्या राशीमध्ये येतो. परंतु  ग्रह त्याच्या नक्षत्र स्वामी प्रमाणे फळ देतो हा  मूलभूत सिद्धांत आहे . चंद्र रवीच्या नक्षत्रात आहे आणि रवी धनु राशीत २१ अंशावर आहे . याचा अर्थ रवी धनु राशीत दुसऱ्या १५ अंश मध्ये आहे म्हणजेच रवी चर तत्वामध्ये आहे . रवीचा स्थिर तत्वाशी संबंध येत नाही. म्हणजे सुरुवातील मुलीबध ल आग्रही राहतील परंतु काही इतर कारणामुळे मुलीचा संबंधित मुळाशी विवाह होणार नाही अशे खात्रीपूलवक सांगता येईल.  . अजून खात्री करण्यासाठी , आईची इच्छपुरती होते का ते पाहू . 

लाभाचा सब (मूळ कुंडली ) जर लग्नाचा कार्येश असेल तर आईची इच्छापूर्ती होईल . येथे लाभाचा सब चंद्र आहे चंद्र २,३,१०,११ भावाचा कार्येश आहे . चंद्र  लग्नाचा कार्येश होत नाही . सदर स्त्री ला तुमच्या मुलीचा विवाह त्या मुला शी होणार नाही असे सांगितले . महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

शुभम भवतु !!!


Saturday, 6 February 2021

 एका लग्नाची तिसरी गोष्ट --२

फेसबुक वरील लेख वाचून एका स्त्री जातक फोनवर बोलत होती ....... म्हणाली माझा पहिला घटस्फोट झाला आहे . त्यानंतर मी  दुसरे लग्न केले आहे . परंतु दुसऱ्या विवाहाची घटस्फोटाची केस चालू आहे . त्यानंतर एका मुलाची ओळख झाली.  ओळखीचे रूपान्तर प्रेमात झाले आहे . मला वाटत आहे हा घटस्फोट झाला की प्रेम विवाह करावा . तर माझ्या नशिबात प्रेम विवाह आहे का ? मी तिसऱ्यांदा लग्न करावे का ? मी म्हटले तुझे बर्थ डिटेल्स दे . तिने खालीलप्रमाणे दिले आहे . मी येथे जन्मठिकाण दिलेले नाही , ज्या ज्योतिषांना पडताळणी करायची असेल त्यांनी व्यक्तिगत संपर्क करावा 

दि --२३ / ६ / १९९१ वेळ ९-३८ सकाळी  जन्मस्थळ---XXXX 

प्रथम झालेल्या घटना तपासून पाहू. .... 

पहिला विवाह दि ६ / १ /२०१३

सप्तम भावाचा सब २, ७ ,११ /५ ८ भावाचा कार्येश असेल तर २,७,११ भावांच्या सयुंक्त दशेत विवाह होतो . 

पहिला विवाह सप्तम स्थानावरून .... ७ भावाचा सब गुरु आहे . गुरु चे कार्येशत्व 

PLANET : JUPITER

Itself :-------------- Jupiter:- 12   6 9     Mars-Yuti  12  5 10  Venus-Yuti  12  4 11

It's N.Swami :-------- Mercury:- (11)   3 12   

It's Sub :------------ Ketu:- (11)    Cusp Yuti: (12)      Rashi-Swami Mercury (11)   3 12

It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (12)   6 (9)     Mars-Yuti  (12)   5 (10)  Venus-Yuti  (12)   (4) 11

Itself aspects :------ 7 5 9

पहिल्या  पायरीवर गुरु ११ चा कार्येश आहे म्हणून विवाह झाला  परंतु ४ थ्यपायरीवर ४ ,१०,१२  . हे भाव विवाहाला प्रतिकूल आहेत  गुरु , बुध  नक्षत्रात आहे . बुध  हर्षलच्या प्रतियोगात ( १७६.२ . ) आहे . गुरु चा सब केतू नेपच्यून च्या प्रतियोगात  ( १७५. )आहे  यामुळे घटस्फोट झाला.  दशेचा विचार केला तर त्यावेळी शनी रवी बुध  दशा होती. 

शनी --- ३,७,८,९  / १,४,६,१०,१२

रवी ----२,५,९,११ / ४,६,१०,१२

बुध ----५,९,११  / ४,६,१०,१२ 

दशेमध्ये २,५,७,८,११ भाव असल्यामुळे विवाह झाला परंतु १,४,६,१०,१२ हे भाव विवाहाला प्रतिकूल आहेत म्हणून घटस्फोट झाला 

दुसरा विवाह --२७ / ८ /२०१७ 

दुसरा विवाह नवम  स्थानावरून--- नवम भावाचा सब राहू आहे . राहू चे कार्येशत्व ---

PLANET : RAHU

Itself :-------------- Rahu:- 5     Cusp Yuti: (6)      Rashi-Swami Jupiter 12   6 9

It's N.Swami :-------- Venus:- (12)   (4) 11     Mars-Yuti  (12)   5 (10)  Jupiter-Yuti  (12)   6 (9)

It's Sub :------------ Ketu:- (11)    Cusp Yuti: (12)      Rashi-Swami Mercury (11)   3 12

It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (12)   6 (9)     Mars-Yuti  (12)   5 (10)  Venus-Yuti  (12)   (4) 11

Itself aspects :------ 12

ह्या मध्ये राहू ९,११ या भावाचा कार्येश आहे त्यामुळे विवाह झाला आहे परंतु ४,६,१०,१२ हे भाव विवाहाला  प्रतिकूल आहेत .   तसेच राहू , शुक्राच्या नक्षत्रात आणि शुक्र प्लूटो केंद्र योग्य आहे ( ९१. ) राहूच सब , केतू नेप्क्युन च्या प्रतियोगात आहे . यामुळे घटस्फोट ची केस चालू आहे . 

दुसऱ्या विवाहाच्या वेळी शनी राहू बुध  दशा होती . 

शनी --- ३,७,८,९  / १,४,६,१०,१२

राहू--- ९,११  / ४,६,१०,१२ 

बुध ----५,९,११  / ४,६,१०,१२ 

३,५, ७,८,९,११  मुले विवाह झाला  १,४,६,१०,१२ मुले घटस्फोटाची केस चालू आहे 

आता सदर स्त्री जातक तिसरा विवाह करू इच्छिते . तिसरा विवाह होईल का ? आणि वैवाहिक सौख्य कसे असेल. असे विचारते आहे . तिसरा विवाह लाभ स्थानावरून पाहतात. लाभाचा सब गुरु च आहे गुरुचे कार्येशत्व या अगोदर आपण पहिलेच आहे . तिसरा विवाह करू नये असा सल्ला दिला . कारण त्यावेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे . जो मुलागा तिच्या मनात आहे त्याचा प्रथम विवाह आहे . त्याच्या घरचे दोनदा घटस्फोट झालेल्या मुलीला स्वीकारतील का हा मोठं प्रश्न आहे . प्रेम विवाहासाठी सप्तम भाव व पंचम भाव यांचे संबंध असावे लागतात. हिच्या पत्रिकेत सप्तम ,पंचम भावाचा सब गुरु ९ ( पंचम चा पंचम ) चा कार्येश आहे परंतु पंचमचा  सब गुरु ७ चा कार्येश नाही . म्हणून प्रेम विवाह होणार नाही . 

शुभंम भवतु  !!!


Saturday, 23 January 2021

 नोकरी---

फेसबुक वरील लेख वाचून एका जातकाचा फोन--  मी एक एमएनसी  कंपनीत नोकरीला होतो .  कंपनीचे मुख्यालय अमेरिकेत आहे . तेथील वरिष्ठानी फार मोठा fraud केला त्यामुळे कंपनीने वेग वेगळ्या देशातील शाखा बंद करायचे ठरविले आहे . भारतातील कंपनी त्यांनी अंशतः बंद केली स्टाफ कमी केला त्यात माझी नोकरी गेली . २८ मे २०२०  माझी नोकरी संपुष्टात आली. सद्य नोकरी शोधत आहे. मी होम लोन घेतले आहे त्याचे हप्ते भरणे अवघड जातंय . आज माझे वय ५० आहे .अजून १०वर्षे मी नोकरी करू इच्छितो. तर मला नोकरीकेंव्हां मिळेल असा प्रश्न विचारला त्यांचे बर्थ डिटेल्स खालीलप्रमाणे 

जन्मदिनांक --६ / ३ /१९७१ सकाळी ८-३०  स्थळ अ २२,४२  रे ७५,४२

मी त्याची  जन्मवेळ निश्चित  करण्यासाठी घरातील सर्वांचे बर्थ डिटेल्स घेतले ,ह्यांची पत्रिका इतरांच्या पत्रिकेबरोब्बर पडताळणीकेली. जन्मवेळ बरोबर आहे. तसेच आतापर्यंत केलेल्या नोकऱ्या tally करून पहिल्या 

हि कुंडली मिन लग्नाची आहे 

दशमाचा सब २,६,१० भावांचा कार्येश असेल तर २,६,१० भावांच्या कार्येश दशेत नोकरी लागते. या पत्रिकेत १० भावाचा सब राहू आहे . मी कुंडली जेंव्हा सोडविली तेंव्हा खालील रुलिंग होते . 

दि. २० / १ /२०२१       वेळ-- २१-३२-१६ 

शुक्र* रवी , केतू , मंगल , बुध 

शुक्राच्या वृषभ राशीत राहू आहे म्हणून राहू रुलिंग मध्ये घेता येईल. राहूचे कार्येशत्व .... 

PLANET : RAHU

Itself :-------------- Rahu:- 11       Rashi-Swami Saturn 1   11 12

It's N.Swami :-------- Mars:- (9)   (2) 9   

It's Sub :------------ Saturn:- 1   11 12   

It's Sub's N.Swami :-- Venus:- (10)   3 8   

Itself aspects :------ 5

राहू २,१० भावांचा कार्येश आहे . नोकरी लागणार निश्चित . आता केंव्हा लागणार यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील बुध मंगल दशा १ जुलै २०२१  पर्यंत आहे . कुंडलीचे लग्न मिन आहे म्हणून मंगल अंतर्दशेत घटना घडणार नाही. त्यापुढील राहू दशा घेतली . बुध  राहू दशा १८ जानेवारी २०२४ पर्यंत आहे . 

PLANET : MERCURY

Itself :-------------- Mercury:- 12   4 7  Cusp Yuti: (12)       Sun-Yuti  12  6

It's N.Swami :-------- Jupiter:- (8)   1 10   

It's Sub :------------ Jupiter:- 8   1 10   

It's Sub's N.Swami :-- Saturn:- (1)   11 12   

Itself aspects :------ 6

PLANET : RAHU

Itself :-------------- Rahu:- 11       Rashi-Swami Saturn 1   11 12

It's N.Swami :-------- Mars:- (9)   (2) 9   

It's Sub :------------ Saturn:- 1   11 12   

It's Sub's N.Swami :-- Venus:- (10)   3 8   

Itself aspects :------ 5

बुध  १२ व्या स्थानाच्या आरंभी आहे म्हणजे त्याची दृष्टी षष्ठ भावारंभी आहे . म्हणून बुध  ६,८,१२ चा कार्येश आहे . ८ वे स्थान दशमाचे लाभ स्थान आहे . राहू २,१० भावांचा कार्येश आहे . आता विदशा अशी शोधायची ती जास्तीतजास्त भावांची कार्येश असेल . (२,६,१०,११ ) या पत्रिकेत शनी २,६,८, १० भावांचा कार्येश आहे . 

म्हणून बुध  राहू शनी दशेमध्ये नोकरी लागेल असे सांगितले . हा कालावधी येतो २१ मार्च २०२२ ते १६ ऑगस्ट २०२२ . या कालावधीत गोचर अनुकूल असेल तरच नोकरी लागेल. 

अजून एकदा खात्री करण्यासाठी मी त्यांना एक संख्या विचारली त्यांनी २४१ हि संख्या सांगितली २४१ ह्या संख्येवरून मी कुंडली काढली. . नोकरीसंबंधी विचार जुळतो का ते पाहण्यासाठी चंद्राची स्थिती पहिली. चंद्र प्रथम स्थानात होता चंद्राची रस पंचमात होती. व चंद्र केतूच्या नक्षत्रात होता आणि केतू नवम स्थानारंभी होता.  म्हणजे चंद्र १,५,९ चा कार्येश होता. चंद्राची स्थिती जुळत नव्हती. म्हणून त्यांना विचारले तुमच्या मनात अजून काय होते ? तुम्ही नोकरीसंबधी विचार करत होता का ? ते म्हणाले माझ्या मनात नर्मदा परिक्रमा व नोकरी संबंधी विचार होते. जास्त करून नर्मदा परिक्रमा . चंद्र १,५,९ चा कार्येश आहे म्हणजे १, स्वतः व्यक्ती , ५ ध्यानधारणा साधना उपासना ९ स्थान तीर्थयात्रा दर्शवित होता. नंतर ते म्हणाले बायकोने नंबर दिला तर चालेल का ? मी म्हटले ,हो . दुसऱ्या दिवशी बायकोने नवर्याच्या नोकरी संबंधी १८२ हा नंबर  दिला . हि प्रश्न कुंडली खालीलप्रमाणे सोडविली 

दि  २१ / १ / २०२१     वेळ १३-३४-५८ 

हि कुंडली धनु लग्नाची आहे . प्रश्न बायकोने नवऱ्यांच्या नोकरी विषयी विचारला आहे म्हणून सप्तमस्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली . आता फिरवून घेतलेल्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती पाहू . चंद्र चलित कुंडली मध्ये दशमात आहे चंद्राची रास कर्क द्वितीय स्थानी आहे . चंद्र केतूच्या नक्षत्रात आहे . केतू षष्ठ भावारंभी आहे म्हणजे चंद्र २,६,१० चा कार्येश आहे . येथे चंद्राची स्थिती तंतोतंत जुळली. 

हि पत्रिका मिथुन लग्नाची आहे . या पत्रिकेत ( फिरवून घेतलेल्या ) दशम भावाचा सब शुक्र आहे . त्यावेळेचे रुलिंग 

दि --२१ / १ / २०२१  वेळ-- १३-३८-२० 

रवी * शुक्र , केतू मंगळ , गुरु 

 कार्येशत्व ---

PLANET : VENUS

Itself :-------------- Venus:- (6)   (4) 11 (12)  Cusp Yuti: (7)     

It's N.Swami :-------- Venus:- (6)   (4) 11 (12)  Cusp Yuti: (7)     

It's Sub :------------ Jupiter:- (7)   7 (9)     Saturn-Yuti  (7)   8

It's Sub's N.Swami :-- Moon:- (10)   (2)     Mars-Yuti  (10)   5 6 10

Itself aspects :------ 1

शुक्र २,६,१०  तीनही भावांचा कार्येश  आहे . 
आता  दशा पाहू ---केतू मध्ये  बुद्ध अंतर्दशा १३ जुलै २०२१ पर्यंत आहे .कुंडलीचे मिथुन लग्न आहे म्हणून घटना बुध  अंतर्दशेमध्ये घडणार नाही म्हणून मी बुध  अंतर्दशा सोडून दिली . पर्यायाने केतू दशा सोडून दिली. 
त्यापुढील शुक्र महादशा विचारात घेतली शुक्राचे कार्येशत्व या अगोदर आपण पहिलेच आहे . शुक्र २,६,१० या तीनही भावांचा कार्येश आहे म्हणून मी शुक्र  महादशा शुक्र अंतर्दशा घेतली त्या पुढील विदशा रवी व चंद्रची आहे 
रवी ---१,३,६,७,८ चा कार्येश आहे . चंद्र ---२,५,६,८,१० चा कार्येश आहे .चंद्र २,६,१० भावांचा कार्येश आहे म्हणून मी चंद्र विदशा घेतली शुक्र शुक्र चंद्र दशेमध्ये नोकरी लागणार . हा कालावधी येतो २ एप्रील २०२२ ते १३ जुलै २०२२

 मूळ कुंडली मध्ये आलेला कालावधी व  प्रश्न कुंडली मध्ये आलेला कालावधी  समान आहे  वरील कालावधीत नोकरी लागणार हे  खात्रीने सांगता येईल . 

वाचकांची शंका ---प्रश्न कुंडलीचा कालावधी जास्तीतजास्त एक वर्ष साठी च असतो. तर त्या पुढील कालावधीचा विचार का केला. ? अगदी बरोबर आहे . याचा अर्थ प्रश्न सोडविला त्या तारखेपासून एक वर्ष म्हणजे जानेवारी २०२२ पर्यंत नोकरी लागणार नाही. असा होईल. असेच उत्तर वरील दोन्ही कुंडलीने दिले आहे . पण मूळ कुंडली आयुष्यभरासाठी असते त्यामध्ये आपण कालावधी ठरवू शकतो. आणि प्रश्न कुंडली तोच कालावधी दाखवत असेल तर  वरील कालावधीचा विचार का करू नये ? मी माझे मत मांडले आहे . महाजनांनी मार्गदर्शन करावे . 

                             शुभम भवतु   !!!