कृष्णमूर्ति ज्योतिष

Wednesday 30 November 2022

के.पी.-४ स्टेप ऍडव्हान्स थेअरी 

के.पी. ४ स्टेप ऍडव्हान्स चे नियम खालीलप्रमाणे ---- 

१) पहिल्या पायरीवरील ग्रहाचा विचार---

ग्रहाच्या नक्षत्रात इतर कोणताही ग्रह नसेल तर तो ग्रह ज्या भावात आहे त्या भावाचा बलवान कार्येश होतो . ( त्या भावात ग्रह असले तरी ) तसेच त्याच्या भावेशाच्या भावात कोणताही ग्रह नसेल तर त्या भावाचा तो बलवान कार्येश होतो . परंतु भावेशाच्या भावात ग्रह असेल तर तो त्या भावाचा कार्येश  होणार नाही. 

उदा.-- रवी ग्रहाच्या नक्षत्रात कोणताही ग्रह नसेल व  रवी पंचम भावात असेल आणि पंचम भावात इतर ग्रह नसतील  तर रवी पंचम भावाचा बलवान कार्येश होईल. रवी --५

२) पहिल्या पायरीवरील ग्रहाच्या नक्षत्राचा विचार 

ग्रह त्याच्या नक्षत्र स्वामी प्रमाणे  फळ देतो. हा कृष्णमूर्तींचा  मूलभूत सिद्धांत आहे . 

पहिल्या पायरीवरचा ग्रहाचा नक्षत्र स्वामी ज्या भावात आहे त्या भावात इतर ग्रह असले तरी तो त्या भावाचा बलवान कार्येश होतो. तसेच भावेशाच्या भावात कोणताही ग्रह नसेल तर तो त्या भावाचा बलवान कार्येश होईल. परंतु भावेशाच्या भावात ग्रह असेल तर तो त्या भावाचा बलवान कार्येश होणार नाही .   

उदा.--- वरील रवी ग्रहाचा विचार करू -- रवी शुक्राच्या नक्षत्रात सप्तमात आहे . सप्तमात शुक्र बरोबर मंगल व गुरु आहे . शुक्र सप्तमात  आहे म्हणून शुक्र सप्तमाचा बलवान कार्येश होईल  

 

३) पहिल्या पायरीवरील ग्रहाच्या उप नक्षत्राचा  ( सब )विचार---

या पायरीवर  पहिल्या नियमाचा वापर करावयाचा आहे . 

४)  या पायरीवर उप नक्षत्र स्वामींच्या   (सब )नक्षत्राचा विचार ----

या पायरीवर दुसऱ्या नियमाचा वापर करावयाचा आहे . 

५) स्वनक्षत्रात असलेला ग्रह ---

    स्वनक्षत्रात असलेला ग्रह ज्या भावात आहे त्या भावाचा बलवान कार्येश होईल , त्याचबरोबर त्याच्या भावेशाच्या भावात ग्रह नसेल तर त्या भावाचा  बलवान कार्येश होईल.  भावेशाच्या भावात ग्रह असेल तर त्या भावाचा बलवानकार्येश होणार नाही . 

६) भावारंभी ग्रहाचा विचार ----

          भावारंभी असणारा ग्रह ज्या भावात आहे त्या भावाचा बलवान कार्येश होईल.  परंतु तो ग्रह मागील भावात असून पुढील भावारंभी असेल तर तो दोन्ही भावाचे बलवान कार्येश होईल. 

उदा.-- समजा ४ भावारंभ  ५ अंश ४५  कला ३३ विकला असेल आणि मंगल ग्रह ३ अंश २५ कला असेल तर तो तिसऱ्या व चौथ्या  भावाचा बलवान कार्येश होईल. जास्त करून ४ त्या भावाचे फळ देईल. 

७)राहू केतू विचार ---

कृष्णमूर्ती मध्ये राहू व केतू याना अनन्यसाधारण महत्व आहे . राहू केतू वेगवेगळ्या प्रकारे फळ देतात. राहू केतू च्या नक्षत्रात ग्रह नसेल किन्वा  राहू केतू नक्षत्रस्वामी म्हणून येत असेल तर राहू केतू ज्या स्थानात  आहेत त्याचे फळ देतात. राहू केतून स्वतः च्या राशी नाहीत , परंतु ते ज्या राशीत आहेत त्या राशिस्वामी चे फळ देतात. तसेच राहू केतू ज्या ग्रहांच्या युतीत असतील किंवा ज्या ग्रहांच्या दृष्टीत असतील त्यांचे सुद्धा फळ देतात.  राहू केतू एकूण ४ प्रकारे फळ देतात.  १) स्थानाचे २) राशी स्वामींचे ३) युतीतील ग्रहांचे ४) दृष्टीतील ग्रहांचे 

८)  युती अथवा दृष्टी चा विचार ---

पारंपरिक ज्योतिशास्त्रामध्ये  अनेक योग्य आहेत उदा.. युती , लाभ , केंद्र , नवपंचम , षडाष्टक , प्रतियोग, द्विद्वदर्शक . यापैकी काही योगाचा विचार कृष्णमूर्तीनी केला आहे . सर्व ग्रह सप्तम दृष्टीने पूर्ण दृष्टी टाकतात. या व्यतिरिक्त मंगळाची ४,८ गुरुची ५,९ व शनीची ३,१० दृष्टी विचारात घेतली आहे . दृष्टी अथवा युती यांच्यामधील दिप्तांश ३ अंश २० कला घ्यावा . परंतु सरावानें  ५ अंशापर्यंत घ्यावयास हरकत नाही. जास्तीतजास्त ८ अंशापर्यंत घ्यावी

प्रा.कोरडे पी. आर. ( नक्षत्र शिरोमणी )

एम एस्सी डी एच ई


No comments:

Post a Comment