जन्म वेळ निश्चित करणे (लग्न शुद्धी भाग -१)
पंधरा दिवसापूर्वी जबलपूर मध्यप्रदेश येथून मला एक अपरिचित व्यक्तीचा फोन आला . मी XXX आपला ब्लोग वाचला आहे . त्याने मला विचारले माझी पत्रिका काढाल का ? मी म्हटले काढेन कि . मला तुमची जन्मतारीख ,जन्मवेळ व ठिकाण ध्या . ते म्हणाले मला तारीख माहित आहे पण जन्मवेळ माहित नाही . आई म्हणते संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेला जन्म झाला आहे . जन्म ठिकाण बेतुल आहे . मी म्हटले ठीक आहे मी पत्रिका काढण्याचा प्रयत्न करीन . मी त्यांची जन्मवेळ काढायचे ठरविले . तसेच त्यांना विचारले तुमच्या आयुष्यातील ठळक घटना सांगा म्हणजे काढलेली पत्रिका बरोबर आहे कि नाही ते तपासून पाहता येईल . त्यांनी तीन घटना मला सांगितल्या . १) त्यांच्या नोकरीची तारीख २) वडिलांचा मृत्यू तारीख ३) बहिणीचे लग्न .तारीख
जन्मतारीख ---१० / ०१ /१९७९ जन्म ठिकाण --बेतुल वेळ - संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ
दि . १८ / २ / २०१४ रोजी दुपारी ३=०७ वाजता हा प्रश्न सोडविला यावेळेचे एल एस आर डी खालीलप्रमाणे
एल --बुध (मिथुन)
एस --चंद्र (हस्त )
आर -- बुध (कन्या )
डी -- मंगळ ( मंगळवार )
मिथुन राशी मध्ये मंगल , राहू व गुरु चे नक्षत्र आहे पैकी मंगळ एल एस आर डी मध्ये आहे . तसेच कर्क राशी मध्ये गुरु शनि बुधाचे नक्षत्र आहे बुध एल एस आर डी मध्ये आहे . मिथुन व कर्क यापैकी कोणते लग्न निवडावे . हा प्रश मला पडला . मी कर्क लग्नामध्ये बुधाच्या नक्षत्राची निवड केली कारण मिथुन लग्नामध्ये मंगळ एल एस आर डी मध्ये चवथ्या प्रतीचा आहे . कर्क लग्न मध्ये बुध पहिल्या प्रतीचा आहे .
म्हणून कर्क लग्न बुध नक्षत्र बुध उप नक्षत्र व मंगळ सब सब यांची निवड केली .
कर्क लग्न - बुध नक्षत्र -बुध उप नक्षत्र - मंगळ सब सब अशी निवड केली
के पी . नंबर ७५ चंद्र -बुध बुध -मंगळ १७,३६, ४० ते १७ , ४३ , १७ आहे याचा मध्य काढू . याचा मध्य ३,४२ येतो . हा १७, ३६ , ४० मध्ये मिळवू
कर्क लग्न १७-३६ - ४०
०३-४२
-------------------
निरयन लग्न कर्क लग्न १७-४०-२२ हे निरयन लग्न जन्मवेळी पूर्व क्षितिजावर उदित असताना जन्म झाला आहे .
निरयन जन्म लग्नावरून जन्मवेळ शोधावी लागेल .
निरयन जन्म लग्न कर्क १७-४०-२२ असे आले आहे जन्म ठिकाण बेतुल आहे अक्षांश २१, ५४
रेखांश ७७ , ५५ रेखन्तर काळ (-) १८=२० व दिनाक १० / १ /१९७९ या माहिती आधारे जन्मवेळ शोधू .
निरयन जन्म लग्न कर्क १७-४०-२२
-------------------------
सायन लग्न सिंह ११ - ८ - ४७
म्हणजेच ४,१७,८,४७
अंशात रुपांतर १३१- ०८ - ४७
जन्म गांव बेतुल अक्षांश , २१ , ५४ आहे पूर्ण अंश २२ घेऊ कृष्णमुर्ती ज्योतिष रहस्य पान नंबर १८६-१८७---
सायन जन्म लग्ना जवळचे मोठे लग्न १३१-३१-५५ सां काळ २=२७
-"- लहान लग्न १३०-५२-०७ सां काळ २=२४
---------------------------------------------------
फरक ०-३९ -४८ ०= ०३
३ मिनिटामध्ये लग्न ३९-४८ पुढे जाते . हि झाली लग्नाची गती
गणिताची सोयीसाठी ४० कला घेऊ .
सायन जन्म लग्न १३१-०८-४७
सायन लहान लग्न - १३०-५२-०७
--------------------------
०- १६ - ४० सोयीसाठी १७ कला घेऊ
४० कला लग्न पुढे जाण्यासाठी (३ मिनिट ) १८० सेकंद लागतात
तर १७ कला जाण्यासाठी किती सेकंद लागतील १८० x ७ / ४० = ७७ सेकंद =१ मी १७ से
सायन लहान लग्नाचा सां काळ २=२४=००
०७ कला साठी लागणारा काळ + ० =१= १७
-------------------------
जन्म वेळेचा सां काळ २=२५=१७
वरील जन्म वेळेचा सां काळावरून जन्म वेळ खालील प्रमाणे
जन्म वेळेचा सां काळ ता . मी .से
०२ = २५ =१७
यामधून जन्म तारखेचा ( १०/०१/१९७९ ) रात्रो १२=०० वाजताचा सां काळ वजा करायचा आहे . पण वजाबाकी होत नाही म्हणून सां काळामध्ये २४ तास मिळवावेत ---
जन्म वेळेचा सां काळ ०२=२५=१७
-----------------------
२६=२५=१७
जन्म तारखेचा रात्रो १२=०० चा सां काळ - ०७=१४=४६
-----------------
संस्कारित वेळ १९=१०=३१
संस्कार करा गुणिले १० भागिले ६ = १९०+०२=१९२=३ मिनिटे १२ सेकंद
संस्कारित वेळ १९=१०=३१
संस्कार (-) ०३=१२
----------------
स्थानिक वेळ १९=०७ =१९
रेखन्तर काळ (+) १८=२०
------------------
१९=२५=३९
XXX ची जन्म वेळ संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटे ३९ सेकंद अशी येईल .
हि जन्मतारीख बरोबर आहे कि नाही याची पडताळणी लग्न शुद्धी भाग-२ मध्ये केली आहे . त्यांनी दिलेल्या घटना म्हणजे १) नोकरीची तारीख २) थोरल्या बहिणीचे लग्न ३) वडिलांचा मृत्यू ह्याची पडताळणी भाग -२ मध्ये केली आहे . कृपया ते पाहावे .
हि जन्मतारीख बरोबर आहे कि नाही याची पडताळणी लग्न शुद्धी भाग-२ मध्ये केली आहे . त्यांनी दिलेल्या घटना म्हणजे १) नोकरीची तारीख २) थोरल्या बहिणीचे लग्न ३) वडिलांचा मृत्यू ह्याची पडताळणी भाग -२ मध्ये केली आहे . कृपया ते पाहावे .