भृगु नंदी नाडी ---
भृगु नंदी नाडी हि ज्योतिष शास्त्राची शाखा आहे . ह्या पद्धतीमध्ये
गुरु ग्रहाला अनन्यसाधारण महत्व आहे .गुरूला जीवकारक मानले आहे .ज्या जातकाची पत्रिका
असते त्यातील गुरु ज्या राशीत आहे ती रास लग्नस्थानी मांडलेली असते ,त्यामुळे ह्या
पत्रिकेमध्ये फक्त तारीख व जन्मस्थळ माहित असायला हवे . वेळ माहित नसली तरी चालू शकते. पारंपारिक पद्धतीमध्ये ज्या प्रश्नाची उत्तरे पहिली जातात
ते सर्व प्रश्न ह्या पद्धतीत पाहता येतात. पारंपारिक पद्धती मध्ये जसे गोचर पहिले जाते
तसे येथे गोचर ण म्हणता प्रोग्रेशन म्हटले जाते . जास्त करून गुरु शनी राहू केतू ग्रहांचे
प्रोग्रेशन विचारात घेतले जाते . या पद्धतीमध्ये ग्रहांचे कारकत्व व राशींचे कारकत्व
अतिशय महत्वाचे आहेत भृगु नंदी नाडी हि ग्रहांचे कारकत्व व राशींचे कारकत्व वर अवलंबून आहे
गुरु जीव कारक ,बुध –शिक्षण , शुक्र / मंगळ –विवाह कारक, शनी सेवा कारक , राहू –परदेशगमन
, आजारपण कारक . ग्रहांचे शत्रू मित्र विचारात
घेतले आहेत . तसेच स्थान परत्वे चांगले वाईट भाव विचारात घेतले आहेत . या पद्धतीमध्ये
त्रिकोणातील ग्रह म्हणजे १,५,९,/ २,६,१० / ३,७,११ / ४,८,१२ (TRINE) युतीत धरले जातात
प्रोग्रेशन दोन प्रकारचे असते १) मेजर प्रोग्रेशन २)मायनर प्रोग्रेशन .वक्री ग्रह पुढील व मागील भावाचे फळ
देतो . तसेच ग्रह १ ते ३ अंश असेल तर मागील व ज्या भावात आहे तेथील फळ देतो . ग्रह
२७ ते ३० अंश असेल तर ज्या भावात आहे तेथील व पुढील भावातील फळ देतो . ग्रहांचे राशी
परिवर्तन सुधा विचारात घेतले जाते २,१२ भावातील ग्रहांचा सुधा विचार केला जातो .
प्रोग्रेशन गुरुचे –गुरु हा जातकाचे जीवाचे प्रतिनिधित्व करतो
गुरु चा प्रवास त्याच्या कुंडलीतील .मुल स्थानापासुण सुरु होतो .गुरु
एका विशिष्ट राशीत १२ वर्षे व्यतीत करतो . १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो लगतच्या पुढील राशीत प्रवेश
करतो . हि प्रक्रिया जातकाच्य संपूर्ण आयुष्यभर चालू राहते . १ ते १२ वर्षे –बालपण
,1३ते२४ शिक्षण व नोकरी,व्यवसाय ,२५ ते ३६ विवाह ,करिअर ,३७ ते ४८ प्रमोशन अथवा व्यवसायातील
प्रगती , ४९ ते ६० सेवा निवृत्त , ६१ ते ७२
आजारपण ७३ ते ८४ दीर्घायू ,
प्रश्न सोडविताना विशिष्ट ग्रहापासून गुरुचे प्रोग्रेशन १,२,५,७,९
भावामधून हो त असेल तर ते strong influence मानले जाते व 3,11,12 हे weak influence मानले जाते युतीतील परिणाम १००%
असतात, त्रिकोणातील परिणाम ७५ % ,२ मधील ५० %, ३,११ मधील २५ % मानले जातात.
या पद्धतीनुसार विवाहाचे एक उदाहरण पुढील लेखात पाहूया ..
प्रा . कोरडे पी आर
७३९१८६२५७६