Tuesday, 22 December 2020

प्रमोशन ---

एक जातक , यापूर्वी अनेकवेळा त्यांने माझ्याकडून ज्योतिष विषयक सल्ला घेतला होता. तो अमेरिकन कंपनी 

( MNC) मध्ये मार्केटिंग विभागाकडे काम करत होता. त्याचे काम सुद्धा चांगले चालले होते . वरिष्ठ त्याच्या कामाबद्दल समाधानी होते . वरिष्ठाना वाटत होते ह्याचे प्रमोशन केले तर सदर जातक अजून चांगले काम करील. म्हणून त्यासंबंधी चा प्रस्ताव  त्यांनी वरिष्ठांकडे पाठविला . प्रमोशन संदर्भात ची कुणकुण जातकाला लागली होती. त्याने मला फोन केला व विचारले नजीकच्या काळात प्रमोशन मिळेल का ? मी म्हटले एक संख्या सांग . त्याने ९२ हि संख्या सांगितली . 

दि २५ / ९/२०२० वेळ १५-०३-०३६  अ १७,५९  रे ७४,२६  के. पी. नंबर ९२

हि सिंह लग्नाची कुंडली आहे . चंद्र गुरूच्या युतीत पंचमात आहे चंद्र शुक्राच्या नक्षत्रात आहे शुक्र दशमेश व तृतीयेश आहे . प्रश्न दशम स्थान शी संबंधित आहे म्हणजे प्रश्न बरोबर आहे .  कुंडलीचा अभ्यास करून डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ मध्ये प्रमोशन होईल असे सांगितले . 

आज दि २२/१२/२०२० दुपारी ३ वाजता त्याचा फोन आला म्हणाला आता च माझ्या मेलवर कंपनीचा E -मेल आला . माझे प्रमोशन झाले आहे . २२ डिसेंबर २०२० ला त्याला प्रमोशन मिळाले आहे

नियम--दशमाचा सब २,६,१०,११ भावाचा कार्येश असेल तर २, ६,१०,११ भावांच्या कार्येशदशेत प्रमोशन मिळते या पत्रिकेत दशमाचा सब राहू आहे .. राहू चे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (10)      Rashi-Swami Venus (12)   (3) 10
It's N.Swami :-------- Mars:- (8)   4 (9)     Mercury-Drusht  (2)   2 (11)
It's Sub :------------ Saturn:- (5)   (6) (7)   
It's Sub's N.Swami :-- Sun:- (1)   1  Cusp Yuti: (2)     
Itself aspects :------ 4 

राहू २,६,१०, ११ या सर्व भावांचा कार्येश आहे . म्हणजे प्रमोशन मिळणार हे नक्की सांगता येईल. परंतु प्रचलित कृष्णमूर्ती प्रमाणे संबंधित भावाचा सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर संबंधित घटना घडणार नाही . ह्याठिकाणी दशमाचा भावाचा सब राहू वक्री मंगळाच्या नक्षत्रात आहे . म्हणजे प्रमोशन मिळणार नाही असे म्हणावे लागेल. डॉ गोंधळेकर सर म्हणतात फक्त गोचर पाहताना वक्री ग्रहाचा नियम वापरावा . इतरवेळी नाही. म्हणून मी जातकाला सांगितले तुला प्रमोशन मिळेल . आता केंव्हा मिळेल त्यासाठी आपणाला दशा पाहाव्या लागतील . कुंडली सोडवितेवेळी शुक्र महादशे मध्ये बुध  अंतर्दशा चालू होती. बुध अंतर्दशा २६ मार्च २०२२ पर्यंत होती. शुक्र बुध ग्रहाचे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 12   3 10   
It's N.Swami :-------- Mercury:- (2)   2 (11)     Mars-Drusht  (8)   4 (9)  Saturn-Drusht  (5)   (6) (7)
It's Sub :------------ Jupiter:- (5)   5 8     Moon-Yuti  (5)   12
It's Sub's N.Swami :-- Venus:- (12)   (3) 10   
Itself aspects :------ 6

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 2   2 11     Mars-Drusht  8  4 9  Saturn-Drusht  5  6 7
It's N.Swami :-------- Mars:- (8)   4 (9)     Mercury-Drusht  (2)   2 (11)
It's Sub :------------ Venus:- 12   3 10   
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (2)   2 (11)     Mars-Drusht  (8)   4 (9)  Saturn-Drusht  (5)   (6) (7)
Itself aspects :------ 9

शुक्र २,५,६, ७,८,९,११ भावाचा कार्येश आहे  व बुध २,५,६,७,८,९,११ भावाचा कार्येश आहे . शुक्र व बुध दोन्ही अनुकूल आहेत. ह्यातील ५,८,९ थोडे अडथळे दर्शवितात . किंवा लांबवणीवर पडू शकते . ह्यात १० भाव कोठेच दिसत नाही . १० भाव फक्त राहू दाखवितो . राहू चे कार्येशत्व खालीलप्रमाणे 

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (10)      Rashi-Swami Venus (12)   (3) 10
It's N.Swami :-------- Mars:- (8)   4 (9)     Mercury-Drusht  (2)   2 (11)
It's Sub :------------ Saturn:- (5)   (6) (7)   
It's Sub's N.Swami :-- Sun:- (1)   1  Cusp Yuti: (2)     
Itself aspects :------ 4

राहू २,६,१०,११ या सर्व भावाचा कार्येश आहे . याठिकाणी २,६,१०,११ ची साखळी पूर्ण होते 

शुक्र महादशा बुध  अंतर्दशा राहू विदशा २३ डिसेंबर २०२० ते २८ मे २०२१ या कालावधीत प्रमोशन होईल . 


गोचर भ्रमण ----संबंधित कालावधीत गोचर अनुकूल असेल तर च प्रमोशन होईल. या पत्रिकेतील चंद्र मंगल व गुरु हे पहिल्या दोन पायरीला म्हणजे नक्षत्र लेव्हल वर अनुकूल नाहीत . बाकी सर्व ग्रह नक्षत्र लेव्हल वर अनुकूल आहेत .शुक्र व बुध हे जलद गतीचे ग्रह आहेत म्हणून ह्यांचे नक्षत्रातील भ्रमण पहिले व राहू मंद गती ग्रह असल्यामुळे त्याचे सब मधील भ्रमण पहिले . वरील  कालावधीपैकी  खाली ल दोन च कालावधीत गोचर ग्रहमान अनुकूल आहे .

२३ डिसेंबर २०२० ते ११ जानेवारी २०२१

२० मार्च ते २५ मार्च २०२१

मी सांगितल्यापेक्षा एक दिवस अगोदर त्याचे प्रमोशन झाले आहे . एक दिवसाचा फरक नगण्य आहे . 

आता प्रश्न असा आहे संबंधित भावाचा सब जर वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर घटना घडत नाही असे प्रचलित कृष्णमूर्ती  सांगते . ह्या नियमाला छेद देणारे हे उदाहरण आहे . यावर महाजनांनी मार्गदर्शन करावे .

शुभंम भवतु !!!

No comments:

Post a Comment