कृष्णमूर्ति ज्योतिष

Saturday 2 November 2019

                                                Case Study  --124

जन्मवेळ निश्चित करणे -----

                      रायगड हुन एक स्त्री तिच्या मुलाबरोबर माझ्याकडे आली होती. प्रथम तिने मुलाच्या शिक्षणाबद्दल प्रश्न विचारला . तीचा  मुलगा सद्या इ. ११ साय न्स  शिकत आहे . त्याच्या पुढील शिक्षणाबद्दल तिला मार्गदर्शन हवे होते . त्यासंदर्भात    मुलाला मार्गदर्शन केले , त्यानंतर ती स्त्री म्हणाली माझी पत्रिका काढायची आहे . मी म्हटले त्यासाठी माझ्याकडे यायची गरज नव्हती . तुमच्या  गावी सुद्धा कोणीही पत्रिका काढून दिली असती . त्यावर ती म्हणाली माझी जन्म तारीख मला माहित आहे पण माझी वेळ मला माहित नाही. मी म्हटले वेळ कमीतकमी शब्दात तरी सांगता येईल का ? . म्हणजे सकाळी , दुपारी , संद्याकाळी, रात्री , पहाटे .एवढं तरी सांगितले पाहिजे . ती म्हणाली माझी आत्या म्हणतेय तुझा जन्म सकाळी झाला आहे. ठीक आहे . मी काढण्याचा प्रयत्न करतो . तिने सांगितलेले जन्मटिपण  खालीलप्रमाणे ---

दि ३ जानेवारी १९८३    वेळ -- सकाळी     स्थळ--  अ १७,४१   रे ७३,५९

कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये रुलिंग प्लॅनेट वरून जन्मवेळ काढता येते . मी पत्रिका काढायला घेतली त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट पाहिले ते खालीलप्रमाणे होते .

दि- १ नोव्हेंबर २०१९  वेळ २१-३३-३९ स्थळ फलटण

लग्न नक्षत्रस्वामी राहू , लग्न स्वामी बुध  , चंद्र नक्षत्रस्वामी केतू , चंद्र राशिस्वामी गुरु , वार शुक्रवार

राहू *   बुध   , केतू , गुरु , शुक्र

आता ,  स्त्रीने सांगितले आहे जन्म सकाळी झाला आहे . सकाळी म्हणजे  दुपारी बारा वाजेपर्यंत च्या कालावधीला आपण सकाळ म्हणावयास काही हरकत नसावी . या वेळेत पंचागामध्ये कोणती लग्ने  येतात ते पाहू.


      १) धनु -----५-४९-०७ ते ७-५५-४१   स्वामी गुरु
 
      २) मकर ----७-५५-४१ ते ९-४६-२२  स्वामी शनी
 
      ३) कुंभ -----९-४६-२२ ते ११-२४-२३   स्वामी शनी
 
      ४) मिन ----११-२४-२३  ते  १२-५९-५७  स्वामी गुरु

रुलिंग मध्ये शनी नाही म्हणजे मकर व कुंभ लग्न असणार नाही हे निश्चित सांगता येईल . रुलिंग मध्ये गुरु आहे आहे म्हणजे धनु किंवा मिन लग्न असणार हे ठामपणे सांगता येईल . आता धनु व मिन यापैकी कोणते लग्न असेल ते पाहू . धनु राशीत मूळ (केतू ) , पूर्वाषाढा (शुक्र ) उत्तराषाढा (रवी ) नक्षत्रे आहेत . यापैकी केतू व शुक्र रुलिंगमध्ये आहेत म्हणजे आपणाला धनु लग्न घेता येईल. आता मिन लग्नाचा विचार करू. मिन राशीमध्ये पूर्वाभाद्रपदा (गुरु) उत्तराभाद्रपदा (शनी) , रेवती (बुध ) नक्षत्रे आहेत . यापैकी गुरु व बुध रुलिंग मध्ये आहे . म्हणजे मिन लग्न सुद्धा आपण घेऊ शकतो.

 धनु व मिन यापैकी कोणते लग्न घ्यावे या संबंधी विचार करू ---

प्रथम आपण मिन लग्नाचा विचार करू....

                      मिन राशीमध्ये गुरु शनी बुधाची नक्षत्रे आहेत . मिन लग्न व गुरु नक्षत्र घेता येणार नाही कारण गुरु दोनदा आलेला नाही . रुलिंग मध्ये शनी नाही , म्हणून मिन लग्न व बुध नक्षत्र घ्यावे लागेल. . आता सब व सब सब ठरवू. रुलिंग मध्ये केतू व शुक्र शिल्लक आहेत यापैकी केतू नक्षत्र  स्वामी आहे व शुक्र वाराचा  स्वामी आहे .वाराचा  स्वामी पेक्षा , नक्षत्र स्वामी श्रेष्ठ म्हणून केतू सब म्हणून घेता येईल व शुक्र सब सब म्हणून घेता येईल. मिन लग्न बुध नक्षत्र केतू सब व शुक्र सब सब ज्यावेळी उदयास येईल त्यावेळी जातकाचा जन्म झाला असे म्हणता येईल. यानंतर कॉम्पुटर मधील ट्रान्झिट हा ऑपशन  वापरून जातकाची जन्मवेळ ठरवू  शकतो. ती वेळ येते १२-२३-२३. परंतु हि वेळ दुपारी १२ नंतर येते . म्हणून हि वेळ आपणाला घेता येणार नाही . आता राहिलेला शेवटचा पर्याय म्हणजे धनु लग्न

धनु लग्न --- धनु राशी मध्ये रुलिंग मधील केतू शुक्र नक्षत्रे आहेत . केतू नक्षत्रस्वामी आहे व शुक्र वाराचा स्वामी आहे म्हणून धनु लग्न व केतू नक्षत्र असे घ्यावे लागेल. आता सब व सब सब ठरवू.  शिल्लक राहिले बुध  व शुक्र यामध्ये बुध लग्न स्वामी आहे व शुक्र वाराचा स्वामी आहे म्हणून सब बुध  व शुक्र सब सब घ्यावा लागेल.
धनु लग्न केतू नक्षत्र बुध  सब व शुक्र सब सब ज्यावेळी उदयास येईल त्यावेळी जातकाचा जन्म झाला असे म्हणता येईल. कॉम्पुटर मधील ट्रान्झिट ऑपशन वापरून जातकाची जन्मवेळ ठरवू. ती वेळ येते ६-४१-१४ सकाळी

जातकची जन्म वेळ आली सकाळी ६-४१-१४ . या वेळेनुसार जातकाची पत्रिका तयार केली .

दि ३ जानेवारी १९८३ वेळ-- सकाळी ६-४१-१४ स्थळ---अ १७,४१   रे ७३,५९

आता आपण काढलेली वेळ बरोबर आहे का ते  पाहण्यासाठी सब चंद्र कनेक्शन थेअरी चा वापर करून पाहू. व त्याच्या   आयुष्यातील घटना तपासून पाहू.

 सब चंद्र कनेक्शन थेअरी --- १)   लग्नाचा सब बुध आहे व चंद्र सिंह राशीत केतू नक्षत्र आहे .सब बुध व चंद्र राशी स्वामी रवी युतीत आहेत. सब बुध रवी नक्षत्रात व चंद्र नक्षत्र स्वामी केतू ,रवी केतू युतीत आहेत.
                                           २) पंचम स्थान हे प्रथम संततीचे स्थान आहे जातकाला पहिला मुलगा आहे . जातकाच्या पत्रिकेतील पंचमाचा सब चा संबंध मुलाच्या चंद्र राशी स्वामी किंवा नक्षत्रस्वामी शी असला पाहिजे . जातकाच्या पत्रिकेतील पंचमाचा सब गुरु   आहे व मुलाच्या पत्रिकेत चंद्र राशी स्वामी गुरु  च आहे (मिन )
                                            ३) सप्तम स्थान हे पतीचे स्थान आहे जातकाच्या पत्रिकेतील सप्तमाचा सब चा संबंध पतीच्या पत्रिकेतील चंद्र राशी स्वामी किंवा नक्षत्र स्वामी शी असला पाहिजे जातकाच्या पत्रिकेत  सप्तमाचा सब शनी आहे शनी तूळ  राशीत राहू  नक्षत्रात आहे राहू बुधा चे प्रतिनिधित्व करत आहे . पतीच्या पत्रिकेत चंद्र बुधाच्या नक्षत्रात आहे .
अशाप्रकारे सब चंद्र कनेक्शन थेअरी वापरून आपण वेळेची खात्री केली.

आता त्यांच्या आयष्यातील घटना तपासून पाहू .

१) विवाह--१६ /०४ / २०००

सप्तम भावाचं सब २,५,८,७,११, पैकीचा कार्येश असेल तर त्यांच्या सयुंक्त दशेमध्ये विवाह होतो
या कालावधीत शुक्र शनी चंद्र  दशा होती

शुक्र --१,६,७,९     चा कार्येश
शनी ---१,३, ४, ६,७,१०,११ चा कार्येश
चंद्र  ---१,३,४,८,१०,११,१२ चा कार्येश

या दशेत  ३,७,८,९,११ भाव विवाहाला अनुकूल होते .

२) प्रथम संतती ---३० / ७ / २००२

पंचम भावाचं सब २,५,११ पैकी चा कार्येश असेल तर त्यांच्या सयुंक्त दशेमध्ये संतती  होते.
या कालावधीत शुक्र बुध रवी दशा होती.

शुक्र --१,६,७,९     चा कार्येश
बुध ---१,३,४,७,९,१०,११,१२  चा कार्येश
रवी ---१,६,७  चा कार्येश

या दशेत ७,९,११ भाव संतती साठी अनुकूल आहेत.( पंचमचे पंचम म्हणून नवम भाव )

३) नोकरी ---नोव्हेंबर २०१६

दशम भावाचा सब २,६,१०,११ भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशे मध्ये नोकरी लागते.

वरील कालावधीत चंद्र शनी मंगळ  ची दशा होती

चंद्र ---१,३,४, ८,१०,११,१२   चा कार्येश
शनी ---१,३,४, ६,१०,११ चा कार्येश
मंगळ  ----२,३,१०,११,१२       चा कार्येश   

या दशेत २,६,१०,११ भाव नोकरीसाठी अनुकूल होते.          
अशा प्रकारे आपण काढलेली जन्मवेळ सब चंद्र कनेक्शन थेअरी व त्यांच्या आयुष्यातील घटना ची पडताळणी करून निश्चित केली .

शुभम भवतु !!!  

No comments:

Post a Comment