कृष्णमूर्ति ज्योतिष

Wednesday 2 October 2019

                                                     Case Study--104   


स्वप्न--एम एस होण्याचे-२
                                   
                                                        फेसबुकवरील माझा , स्वप्न एम एस होण्याचे हा लेख वाचून एका मुलाच्या आईने पुणयाहून फोन केला . माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे . माझ्या मुलाची एम एस होण्याची खूप इच्छा आहे . तो हुशार सुद्धा आहे १२ वि परीक्षेत त्याला ८० टक्के मार्क्स मिळाले होते . यापूर्वी ऑल इंडिया लेव्हल एक परीक्षा झाली होती त्यात त्याचा   १८ वा नंबरआला होता. आणि त्या दृष्टीने तो प्रयत्न सुद्धा करीत आहे . माझी इच्छा आहे त्याने एम एस करावे. माझा प्रश्न असा आहे कि तो परदेशात एम एस करेल का ? तशी संधी त्याला मिळेल का ? मिळणार असेल तर त्या दृष्टीने मला आतापासूनच पैशाची तरतूद करावी लागेल . त्याला पाठविण्याची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे . शैक्षणिक कर्ज काढावे लागेल किं त्याला स्कॉलरशिप मिळेल  ते पण सांगा आणि नसेल मिळणार तर त्याने दुसरे कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे हे हि सांगा.

             मी मुलाचे बिर्थ डिटेल्स त्यांच्याकडून मागवून घेतले गोपनीयतेच्या कारणास्तव येथे बिर्थ डेटल्स दिलेले नाही .. ज्यांना पडताळणी करावयाची असेल त्यांनी व्यक्तिगत संपर्क करावा .

दि -------वेळ ----- स्थळ--- रे ७२,५८ अ १९,१२

हि वृश्च्छिक लग्नाची पत्रिका आहे . लग्नाचा सब शनी केतू नक्षत्रात आहे व चंद्र धनु  राशीत केतूच्या नक्षत्रात आहे . चतुर्थ स्थानचा सब  ( आई ) . शुक्र बुधा च्या राशीत चंद्राच्या नक्षत्रात आहे आहे आईच्या पत्रिकेत चंद्र राशी स्वामी गुरुची दृष्टी बुधवार आहे. नवम  भावाचा सब (वडील) गुरु आहे वडिलांच्या पत्रिकेत चंद्र गुरूच्या नक्षत्रात आहे . याचा अर्थ पत्रिका बरोबर आहे

परदेशात उच्च शिक्षण --- व्यय भावाचा सब ३,९,१२ बरोबर ४,९,११ पैकी भावाचा कार्येश असेल तर त्यांच्या संयुक्त दशेत परदेशात उच्च शिक्षण होईल.

या पत्रिकेत व्यय भावाचा सब शुक्र आहे . शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (1)   (3) (10)     Jupiter-Drusht  (7)   (5) 8
It's N.Swami :-------- Sun:- (2)   1  Cusp Yuti: (2)       Mercury-Yuti  (2)   2 (11)
It's Sub :------------ Jupiter:- (7)   (5) 8     Mars-Drusht  (12)   4 (9)  Venus-Drusht  (1)   (3) (10)
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (7)   (5) 8     Mars-Drusht  (12)   4 (9)  Venus-Drusht  (1)   (3) (10)
Itself aspects :------ 8

शुक्र ३,९,१२ परदेशगमनासाठी अनुकूल आहे तसेच ९,११ उच्च शिक्षणासाठी अनुकूल आहे .
सदर जातक उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार हे निश्चितपणे सांगता येईल.

आता दुसरा प्रश्न .... परदेशी जाण्यासाठी पैशाची सोय  होईल का ते पाहू. त्याच्या आईने विचारले आहे त्याला स्कॉलरशिप मिळेल का ? स्कॉलरशिपसाठी नियम ----

अष्टमाचा सब २,६,११ चा कार्येश असेल तर स्कॉलरशिप मिळेल.

या पत्रिकेत अष्टमाचा सब केतू आहे . केतुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ...


 PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 6     Cusp Yuti: (7)      Rashi-Swami Saturn 8   6 7
It's N.Swami :-------- Mars:- (12)   4 (9)  
It's Sub :------------ Moon:- 4   12  
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (6)    Cusp Yuti: (7)      Rashi-Swami Saturn (8)   6 7
Itself aspects :------ 1




केतू २,६,११ पैकी ६ भावाचा कार्येश आहे म्हणजे त्याला स्कॉलरशिप मिळणार हे सांगता येईल.

आता  शैक्षणिक कर्ज मिळेल का  ते पाहू .. कर्जाचा विचार षष्ठ स्थानावरून करतात. षष्ठ  भावाचा सब २,६,११ . चा कार्येश असेल तर शैक्षणिक कर्ज मिळेल . षष्ठ  भावाचा सब चंद्र आहे चंद्राचे कार्येशत्व ----


PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 4   12  
It's N.Swami :-------- Ketu:- (6)    Cusp Yuti: (7)      Rashi-Swami Saturn (8)   6 7
It's Sub :------------ Ketu:- 6     Cusp Yuti: (7)      Rashi-Swami Saturn 8   6 7
It's Sub's N.Swami :-- Mars:- (12)   4 (9)  
Itself aspects :------ 11



चंद्र ६ भावाचा कार्येश आहे शैक्षणिक कर्ज मिळेल असे सांगता येईल. आतापर्यंत सगळ्याच गोष्टी अनुकूल झाल्या आहेत पण तो ज्यावेळी जाणार तो काळ अनुकूल आहे का ते पहिले पाहिजे तरच ह्या गोष्टी  शक्य आहेत . ह्यासाठी त्याच्या पत्रिकेतील दशा आपणास पाहाव्या लागतील
                                        आता तो इंजियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे . शै .वर्ष २०१९-२०२० मध्ये ३ रे वर्ष पूर्ण होईल. व साधारणपणे जुलै २०२१ मध्ये त्याचे ४ थे वर्ष पूर्ण होईल. जुलै २०२१ नंतर चा कालावधीत त्याचे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणे घडेल का ते पाहू.परदेशातील शिक्षण साधारणपणे सप्टेंबर महिन्यात सुरु होते . या काळात शुक्रामध्ये बुधा ची अंतर दशा चालू आहे शुक्र / बुध जून २०२४ पर्यंत आहे . शुक्र बुधा चे कार्येशत्व खालीलप्रमाणे ....


PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (1)   (3) (10)     Jupiter-Drusht  (7)   (5) 8
It's N.Swami :-------- Sun:- (2)   1  Cusp Yuti: (2)       Mercury-Yuti  (2)   2 (11)
It's Sub :------------ Jupiter:- (7)   (5) 8     Mars-Drusht  (12)   4 (9)  Venus-Drusht  (1)   (3) (10)
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (7)   (5) 8     Mars-Drusht  (12)   4 (9)  Venus-Drusht  (1)   (3) (10)
Itself aspects :------ 8



PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (2)   2 (11)  Cusp Yuti: (2)       Sun-Yuti  (2)   1
It's N.Swami :-------- Moon:- (4)   12  
It's Sub :------------ Rahu:- (12)    Cusp Yuti: (1)      Rashi-Swami Sun (2)   1
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (6)    Cusp Yuti: (7)      Rashi-Swami Saturn (8)   6 7
Itself aspects :------ 8

शुक्र  ३,९,११,१२ चा कार्येश आहे व बुध ४,६,११,१२ चा कार्येश आहे आपणास  आवश्यक  असलेल्या ३,९,१२ व ४,९,११ भावाचे कार्येशत्व आहे .

शुक्र महादशा  बुध अंतर दशा उच्च शिक्षणासाठी अनुकूल आहे . २०२१ ते २०२४ या कालावधीत त्याचे शिक्षण होईल असे सांगता येईल.
                                       आता आईची पत्रिका काय म्हणतेय ते पाहू . आईच्या पत्रिकेत मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेशी जाईल का ? आईच्या पत्रिकेत पंचम स्थान हे मुलाचे लग्न स्थान होईल. पंचम स्थान लग्न स्थान धरून कुंडली फिरवून घेतली  आईची पत्रिका  वृश्चिक लग्नाची आहे . पंचम स्थानात मिन रास  आहे .
फिरवून घेतलेल्या कुंडलीमध्ये व्यया चा सब रवी आहे . रवीचे कार्येशत्व

 PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (8)   (6)     Venus-Yuti  (8)   3 8
It's N.Swami :-------- Saturn:- (4)   11 12 
It's Sub :------------ Venus:- (8)   3 8  Cusp Yuti: (9)       Sun-Yuti  (8)   (6)  Rahu-Yuti  (9)    Ketu-Drusht  (3)
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (4)   11 12 
Itself aspects :------ 3

 रवी ४,६,९ चा कार्येश आहे  सब रवी ४,९ चा कार्येश आहे . जातक उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार .



महाजनांनी आपला अभिप्राय द्यावा .

शुभम भवतु  !!!

No comments:

Post a Comment