कृष्णमूर्ति ज्योतिष

Friday 12 July 2019

Case Study 80

परदेशगमन व नोकरी
                                     मंदार म्हणाला सर, फेब्रुवारी २०१८ मध्ये परदेशातील कंपनीसाठी मुलाखत झाली . मुलाखतीमध्ये माझी निवड झाली . पुढील प्रोसेससाठी माझे त्याच्याबरोबर बोलणे झाले . त्याप्रमाणे मी जेथे नोकरी करीत होते तेथे राजीनामा दिला माझा तीन महिन्याचा नोटीस पिरियड होता. मार्च एप्रिल मे . जूनमध्ये मी परदेशात नोकरीसाठी जाणार होतो . जूनच्या पहिल्या आठवड्यात मी त्यांच्याशी संपर्क केला त्यावेळी त्यांनी सांगितले येथील खूप कामे अजून पेंडिंग आहेत . तूर्त थांबावे . आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ . त्यावेळी मी त्यांना सांगितले आपल्या ऑफर लेटर प्रमाणे मी इकडच्या कंपनीचा राजीनामा दिला आहे . आणि तुम्ही म्हणता तूर्त थांबावे . आता मला नोकरी दिलीच पाहिजे . नंतर त्यांनी थोडी तडजोड केली ते म्हणाले आम्ही निम्मा पगार तुम्हाला देऊ . परंतु थोडे दिवस थांबावे . मी म्हटले ठीक आहे . त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांचा फोन आला अजून काही दिवस थांबा ,अद्याप काम बाकी आहे मला टेन्शन यायला लागले . मी घरी बसून होतो , तरीसुद्धा ते मला निम्मा पगार देत होते . मला शंका यायला लागली . भविष्यात काय वाढून ठेवले आहे मला कळत  नव्हते . त्याच अवस्थेत मंदारने मला फोन केला . मला परदेशात नोकरीची संधी मिळेल का .?
       एप्रिल २०१९ च्या पहिल्या   आठवड्यात त्याने मला फोन केला होता त्यावेळी मी त्याला म्हटले मनातं परदेशातील नोकरीची संधी मिळेल का असा विचार करून १ ते २४९ या पैकी एक संख्या सांग . त्याने थोडा विचार करून १३८ हि संख्या सांगितली . जातक ज्यावेळी संख्या सांगतो त्यावेळी संख्या हि प्रश्नाच्या अनुषंगाने दिली जाते . आता ह्याने १३८ हि संख्या दिली आहे तर याचा अर्थ काय होऊ शकतो  ते पाहू १ ह्या संख्येवरून स्वतः जातकाचा बोध होतो . ३ या संख्येवरून  प्रवास, घर सोडणे असा अर्थबोध होतो. ८ या संख्येवरून अडथळे, मनःस्ताप , संघर्ष किंवा कष्ट असा अर्थबोध होतो. ३ व ८ यांचा एकत्रित विचार केला तर व्हिसा मिळण्यात अडथळे . या तिघंची बेरीज केली तर १२ येते . १२ वरून परदेशगमन , किंवा अपरिचित ठिकाण  असा अर्थबोध  होतो. या सर्वांचा एकत्रित विचार केला तर अडथळे ची शर्यत पार करून परदेशी जाणे साठी घर सोडणे .असा अर्थ होईल .
            समजा  जातकाने मला ऑपरेशन करावे लागेल का ? असा प्रश्न विचारला आणि हिच  संख्या दिली तर
१ म्हणजे जातक, ३ घर सोडणे ,८ ऑपरेशन . आणि बेरीज १२ येते १२ वरून हॉस्पिटल ,अपरिचित ठिकाण .
ऑपरेशन साठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागेल म्हणजेच ऑपशन करावे लागेल.   किंवा मला अटक होईल का ? असा प्रश्न विचारला तर १२ चा अर्थ तुरुंग ,अपरिचित ठिकाण . . तुरुंगात जाण्यासाठी घर सोडणे  म्हणजेच अटक होणे. म्हणून प्रश्न काय विचारला आहे त्या अनुषंगाने संख्येचा अर्थ लावावा. जातकाने मनापासून  ( By Heart ) प्रश्न विचारला तर प्रश्नाचे उत्तर बर्याच अंशी बरोबर येते प्रश्न विचारण्यामागे तळमळ,कळकळ, उत्सुकता असली पाहिजे तसेच त्याने त्यासाठी प्रयत्न केले असले पाहिजेत . तरच प्रश्नांची उत्तरे बरोबर येतात. अन्यथा नाही.

१३८ या संख्येवरून मी कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली .

दि १७ / ४ / २०१९ वेळ १२-५५-४८ फलटण
हि तुला लग्नाची कुंडली आहे . तुला लग्न म्हणजे चर लग्न आहे . याचा अर्थ घटना लवकर घडणार आहे
मनातील विचार  जुळतो का ते पाहू . चंद्र मनाचा कारक . चंद्र दशमेश असून  साध्या कुंडलीत व्ययात  आहे . चंद्र रवी नक्षत्रात ,रवी  लाभेश भावचलित कुंडलीत षष्ठ स्थानात म्हणजे चंद्र ६,१०,११,१२चा कार्येश होतोय . प्रश्नाचा  रोख बरोबर आहे . .  दशमाचा सब २,६,१०,११ या भावाचा कार्येश असेल तर २,६,१०,११ या भावांच्या कार्येश दशेत नोकरी लागते

व्ययाचा सब २,६,१० चा कार्येश असेल परदेशात नोकरी लागते
हे दोन्ही नियम लागू पडतात का ते पाहू
या पत्रिकेत दशमाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 5   1 8     Moon-Drusht  11  10
It's N.Swami :-------- Jupiter:- (2)   3 6
It's Sub :------------ Rahu:- (9)      Rashi-Swami Mercury (5)   9 (12)  Saturn-Drusht  (3)   (4) 5
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (2)   3 6
Itself aspects :------ 12

शुक्र २ नोकरीसाठी अनुकूल भावाचा कार्येश आहे ३,९,१२ हे परदेशगमनासाठी अनुकूल आहेत .

आता व्ययाचा सब पाहू व्ययाचा सब बुध आहे . बुधा चे कार्येशत्व---

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (5)   9 (12)     Moon-Drusht  (11)   (10)
It's N.Swami :-------- Saturn:- (3)   (4) 5     Ketu-Yuti  (3)    Rahu-Drusht  (9)
It's Sub :------------ Mercury:- (5)   9 (12)     Moon-Drusht  (11)   (10)
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (3)   (4) 5     Ketu-Yuti  (3)    Rahu-Drusht  (9)
Itself aspects :------ 12

बुध १०,११ या नोकरीसाठी अनुकूल भावाचा ३,९,१२ या परदेशगमनासाठी अनुकूल आहे

म्हणजे परदेशात नोकरी लागणार हे निश्चित सांगता येईल . आता केंव्हा जाईल ह्यासाठी आपल्याला दशा अंतर दशा पाहाव्या लागतील .
कुंडली पहिली त्यावेळी रवी मध्ये शनी अंतर्दशा १२ जानेवारी २०२० पर्यंत आहे .

रवीचे कार्येशत्व ---

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- 6   11     Jupiter-Drusht  2  3 6
It's N.Swami :-------- Ketu:- (3)      Rashi-Swami Jupiter (2)   3 6  Saturn-Yuti  (3)   (4) 5
It's Sub :------------ Venus:- 5   1 8     Moon-Drusht  11  10
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (2)   3 6
Itself aspects :------ 1

रवी २ / ३ या अनुकूल भावाचा कार्येश आहे . कुंडलीचे लग्न तुला हे चर तत्वाचे आहे म्हणून  पुढील शनीची अंतर दशा घेतली. शनीचे कार्येशत्व ..... 


PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- 3   4 5     Ketu-Yuti  3    Rahu-Drusht  9  
It's N.Swami :-------- Venus:- (5)   (1) (8)     Moon-Drusht  (11)   (10)
It's Sub :------------ Ketu:- 3       Rashi-Swami Jupiter 2   3 6  Saturn-Yuti  3  4 5
It's Sub's N.Swami :-- Sun:- (6)   11     Jupiter-Drusht  (2)   3 6
Itself aspects :------ 9 5 12


शनी २,६,१०,११ या सर्व भावांचा कार्येश आहे . आता परदेशगमनासाठी जास्तीत जास्त भाव कोण दाखवितात ते पाहू . बुध ,शुक्र व राहू हे तीनही ग्रह ३,९,१२ चे कार्येशत्व दाखवितात. 

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- (5)   9 (12)     Moon-Drusht  (11)   (10)
It's N.Swami :-------- Saturn:- (3)   (4) 5     Ketu-Yuti  (3)    Rahu-Drusht  (9)  
It's Sub :------------ Mercury:- (5)   9 (12)     Moon-Drusht  (11)   (10)
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (3)   (4) 5     Ketu-Yuti  (3)    Rahu-Drusht  (9)  
Itself aspects :------ 12

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 5   1 8     Moon-Drusht  11  10
It's N.Swami :-------- Jupiter:- (2)   3 6   
It's Sub :------------ Rahu:- (9)      Rashi-Swami Mercury (5)   9 (12)  Saturn-Drusht  (3)   (4) 5
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (2)   3 6   
Itself aspects :------ 12

कुंडली चर लग्नाची आहे  म्हणजे घटना लवकर घडणार आहे.  राहू ची विदशा उशिरा होती. म्हणून  मी रवी शनी बुध व रवी शनी शुक्र हे दोन्ही कालावधी दिले . रवि शनी बुध चा कालावधी येतो १४ मे  २०१९ पर्यंत व रवि शनी शुक्र चा कालावधी येतो ४ जून २०१९ ते १ ऑगस्ट २०१९ . या कालावधीत नोकरी वर जाशील असे सांगितले . 

२-३ दिवसापूर्वी ( दि १०/७/२०१९ रोजी )त्याचा मेसेज आला . सर, २५ जुलैला मी नोकरीसाठी परदेशी जात आहे . मी विचारले नेमके कसे घडले . २२ में ला संबंधित कंपनीचा फोन आला . म्हणाले पासपोर्ट व्हिसा व इतर कागदपत्रे तयार ठेवा . थोड्याच दिवसात विमानाचे तिकीट पाठवून देतो. नंतर त्यांनी  २५ जुलै चे विमानाचे तिकीट पाठवून दिले आहे . म्हणून मी २५ जुलैला परदेशात नोकरीसाठी जात आहे . सदरची घटना मी दिलेल्या कालावधीतच घडत आहे . 

हाच प्रश्न मी मुलकुंडलीवरून सोडविण्याचे ठरविले .याच कालावधीत नोकरीसाठी परदेशी जाण्याचे योग आहेत का ? हे पाहायचे ठरविले . 
जन्म तारीख १७ / १ /१९७७ वेळ ----- अ १९,८७ रे ७५,३४
हि मिथुन लग्नाची कुंडली आहे
लग्नाचा सब केतू  आहे व चंद्र केतूच्या नक्षत्रात आहे सब चंद्र संबंध आहे . म्हणजे वेळ बरोबर आहे .
दशमाचा सब २,६,१०,११ या भावाचा कार्येश असेल तर २,६,१०,११ या भावांच्या कार्येश दशेत नोकरी लागते

व्ययाचा सब २,६,१० चा कार्येश असेल परदेशात नोकरी लागते
हे दोन्ही नियम लागू पडतात का ते पाहू
या पत्रिकेत दशमाचा सब शुक्र आहे शुक्राचे कार्येशत्व खालीलप्रमाणे
PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 8   5 12  Cusp Yuti: (9)     
It's N.Swami :-------- Jupiter:- (11)   7 10   
It's Sub :------------ Jupiter:- 11   7 10   
It's Sub's N.Swami :-- Sun:- (7)   (3)   
Itself aspects :------ 3

दशमाचं सब शुक्र ३,९ / ११ या अनुकूल भावाचा कार्येश आहे . परदेशात नोकरी मिळू शकते हे सांगता येईल
व्ययाचा सब राहू राहूचे कार्येशत्व ---
PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (4)      Rashi-Swami Venus (8)   (5) (12)
It's N.Swami :-------- Mars:- (6)   6 11
It's Sub :------------ Sun:- (7)   (3)
It's Sub's N.Swami :-- Sun:- (7)   (3)
Itself aspects :------ 11

व्ययाचा सब राहू  ६ नोकरी मिळणाऱ्या भावाचा कार्येश आहे तसेच ३,१२ भाव परदेशगमनासाठी अनुकूल आहेत . परदेशात नोकरी मिळणार हे निश्चित सांगता येईल आत केंव्हा मिळणार ह्यासाठी दशा पाहू 
प्रश्न पाहतेवेळी मंगळामध्ये गुरु अंतर्दशा १३ मे  २०१९ पर्यंत आहे 
मंगळाचे कार्येशत्व --
PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- 6   6 11   
It's N.Swami :-------- Venus:- (8)   (5) (12)  Cusp Yuti: (9)     
It's Sub :------------ Rahu:- (4)      Rashi-Swami Venus (8)   (5) (12)
It's Sub's N.Swami :-- Mars:- (6)   6 11   
Itself aspects :------ 1 10 2

मंगळ ६ भाव नोकरी मिळण्यासाठी अनुकूल व ९,१२ भाव परदेशगमनासाठी अनुकूल आहेत . 
मूळ कुंडली मिथुन या द्विस्वभावी लग्न राशी असल्यामुळे गुरु अंतर्दशेत घटना घडणार नाही  म्हणून मी पुढील अंतर्दशा शनीची घेतली शनीचे कार्येशत्व ---

PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- (1)   8 (9)  Cusp Yuti: (2)       Mars-Drusht  (6)   6 11
It's N.Swami :-------- Mercury:- (6)   1 4
It's Sub :------------ Venus:- 8   5 12  Cusp Yuti: (9)  
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (11)   7 10
Itself aspects :------ 8 4 11

शनी २,६,११ या नोकरी मिळणाऱ्या भावाचा कार्येश आहे तसेच ९ भाव परदेशगमनासाठी अनुकूल आहे .
द्विस्वभावी लग्न मुले शनी विदशेत घटना घडणार नाही म्हणून पुढील बुधाची विदशा गृहीत धरली
बुद्धाचे कार्येशत्व ---

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 6   1 4
It's N.Swami :-------- Venus:- (8)   (5) (12)  Cusp Yuti: (9)  
It's Sub :------------ Venus:- 8   5 12  Cusp Yuti: (9)  
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (11)   7 10
Itself aspects :------ 1

बुध  ११ / ९ १२ या अनुकूल भावाचा कार्येश आहे 
म.द. मंगळ ६ / ९,१२ अंतर्दशा शनी २,६,११ / ९ विदशा बुध ११ / ९,१२ कार्येश आहे ह्यामध्ये ३ भाव आलेला नाही. विदशा बुध शुक्राच्या नक्षत्रात आहे आणि शुक्र नवम  भावारंभी आहे म्हणजे त्याची दृष्टी तृतीय भावा वर येते म्हणून बुध ३ भावाचा सुद्धा कार्येश आहे परदेश गमनासाठी ३,९,१२ हे भाव अनुकूल व नोकरीसाठी २,६ ,११ भाव कार्यान्वित झालेले आहेत . परंतु १० भाव कोठे चं लागत नाही म्हणून मी बुध  विदशेमध्ये सूक्ष्म दशा पाहायचे ठरविले यामध्ये छाया ग्रह केतू विदशा १० भावाची कार्येश आहे

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- (10)      Rashi-Swami Mars (6)   6 11
It's N.Swami :-------- Ketu:- (10)      Rashi-Swami Mars (6)   6 11
It's Sub :------------ Mars:- 6   6 11
It's Sub's N.Swami :-- Venus:- (8)   (5) (12)  Cusp Yuti: (9)  
Itself aspects :------ 5
 केतू ६,१० / ९,१२ चा  कार्येश आहे 
या ठिकाणी ३, ९, १२ व २,६,१०,११ भावाची साखळी पूर्ण होते आहे . 
मंगळ शनी बुध  केतू चा कालावधी येतो २४ /७ /२०१९ ते २७ / ७ /२०१९
जातक याच कालावधीत नोकरीसाठी परदेशी जात आहे . प्रश्न कुंडली व मूळ कुंडली मध्ये एकवाक्यता आहे . कोणत्याही घटनेसाठी प्रश्न कुंडली होकार दर्शवित असेल तर तो योग  मूळ कुंडलीत असलाच पाहिजे . 




शुभम भवतु !!!

No comments:

Post a Comment