कृष्णमूर्ति ज्योतिष

Tuesday 26 February 2019

पत्रिका मेलन

           गेल्या आठवड्यात  माझ्याकडे दोन पत्रिका आल्या. ह्या पत्रिका ज्यांच्या आहेत ते दोघांचे अफेअर चालू आहे पण अलीकडे दोघांमध्ये धुसफूस वाढली  आहे.छोटे छोटे वाद होत आहेत. म्हणून दोघांनी पत्रिका जुळते का ते पाहण्यासाठी मला दिल्या आहेत.प्रथम दोन्ही पत्रिकेची लग्न शुद्धी सब --चंद्र  संबंध पद्धतीने करून घेतली

मुलगी..
लग्नाचा सब शुक्र आहे
चंद्रा तुळ राशीत विशाखा नक्षत्रात . आहे.
या ठिकाणी लग्नाचा सब शुक्र व चद्रचा राशी स्वामी शुक्र च आहे म्हणून पत्रिका बरोबर आहे.
पत्रिकाजुळविताना मी दोन्ही पत्रिका स्वतंत्रपणे पाहतो.
मुलगी...
७ च सब शुक्र आहे
शुक्र...२
शनी...४,५,६,५ क.यू
गुरु...
रवी...१

शुक्र ३-४ पायरीला पूर्ण विरोधी आहे. म्हणजे हिच्या पत्रिकेत विवाहाची शक्यता खूप कमीच आहे.झाला तरी वैवाहिक सौख्य असमाधानकारक . पहिल्या दोन पायरीला २,५ चा कार्येश आहे परंतु ३--४ पायरीला पूर्ण अशुभ , विरोधी भाव आहेत

मुलगी...
५ चा सब केतू आहे
केतू..
मंगळ..१०,८
बुध...२
गुरु...१२,७

मुलीच्या पत्रिकेत ५ चा सब७ चा कार्येश आहे तसेच ७ चा सब ५ कार्येश आहे.हिच्या पत्रिकेत प्रेम विवाहाचे योग्य आहेत असे म्हणता येईल . त्याच बरोबर पंचमच सब मंगळाशी संबंधित असून ८,१२ शी संबंधित आहे म्हणजे सर्वस्व स्वाहा केल्याचे संकेत देतात.
मुलगी...
लाभाचा सब जर ७ चा कार्येश असेल तर वैवाहिक सौख्य चांगले असेल इथे  लाभाचा सब शुक्र च आहे शुक्र ७ चा कार्येश नाही.
म्हणजेच वैवाहिक सौख्य असमाधान काराक असणार.
आणि ते ७ च्या सब ने दाखविले आहेच.

आता मुलाची पत्रिका पाहू

या ठिकाणी लग्नाचा सब. शुक्र आहे चंद्रा कन्या राशीत रवी नक्षत्रात आहे. लग्नाचा सब व चंद्र यांचा कोणत्याही प्रकारे संबंध येत नाही. ह्या पत्रिकेचे BTR केले पाहिजे. म्हणून मी जन्मवेळ ४ मी.२० से. ने वाढविली त्यामुळे लग्नाचा सब रवी येतो. आणि चंद्र रवी ननक्ष्ट्रत आहेच अशाप्रकारे सब व चंद्राचा संबंध प्रस्थापित झाला .
आता ७ च सब पाहू तो आहे शुक्र
शुक्र...१२,८
शनी...११
गुरु...
केतू...३, बू १२,४,७
शुक्र ३-४ पायरीला ३,७ च कार्येश आहे.
एकूण ३,७,११ अनुकूल व ४,१२ प्रतिकूल
परंतु यात ६ स्थान नाही. आणी विवाहासाठी ६ स्थान असूच नये.
आता ५ च सब बुध आहे
बुध...१२,४,७
शनी...११
बुध...१२,४,७
शनी...११

याठिकाणी ५ च सब ७ च कार्येश आहे पण ७ च सब ५ कार्येश होत नाही. म्हणून हा प्रेम विवाह होणारं नाही.
मुलाच्या पत्रिकेत ११ चा सब बुध आहे व तो ७ चा कार्येश आहे हे आपण आताच पहिले आहे मुलाचे वैवाहिक सौख्य चांगले आहे. परंतु मुलीचे वैवाहिक सौख्य चांगले नाही.मुलाच्या पत्रिकेत पंचमाचा  सब बुध  आहे . बुध हा ग्रह मुळातच द्वित्व  दाखविणारा आहे . आणि १२ शी संबंधित आहे म्हणजे विवाहानंतर सुद्धा याचे दुसरीकडे संबंध असू शकतील .
आता मला सांगा मुलीने हा विवाह करावा  का ? वरील सर्व कारणाने पत्रिका जुळत नाहीत असे सांगितले .

आपला अभिप्राय द्यावा

शुभम भवतु 

No comments:

Post a Comment