कृष्णमूर्ति ज्योतिष

Friday 25 January 2019

घर केंव्हा विकले जाईल
                                           एक  स्त्री , वय अंदाजे ४०--४२ , काही वर्षपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. ति सद्या   एकटीच असते तिचा एक फ्लॅट आहे . स्वतःचे अर्थाजनासाठी एक गाळा  आहे भाड्याचा . ऑनलाइन काम करत असते. घटस्फोटित स्त्री म्हटले कि समाजाचा  पाहण्याचा  दृष्टीकोण  तितकासा  चांगला नसतोच.  शेजाऱ्यांचा त्रास अधून मधून होतच असतो . एक  दिवस तिने मला फोन केला. म्हणाली  माझा एक फ्लॅट आहे तो विकून गावी जावे असे वाटते . त्यामुळे इथल्यासारखा त्रास होणार नाही आणि तिथेच एखादा छोटा व्यवसाय सुरु करता येईल . तर माझा फ्लॅट केंव्हा विकला जाईल ? मी २-३ वर्षे प्रयत्न करीत आहे अद्याप विकला जात नाही .अद्याप काही काम होत नाही . मी त्यांना सांगितले १ ते २४९ यापैकी एक संख्या सांगा . ती म्हणाली विचार करून थोड्यावेळाने सांगते. मी म्हटले ठीक आहे .
                               रोज संध्याकाळी मी फिरायला जातो. माझे घराशेजारी संस्थान काळातील विमानतळ आहे . फार पूर्वी २.. ३ माणसांचे विमान उतरत होते  (अंदाजे १०० एकर  जागा ) तेथे मी फिरायला गेलो होतो. अचानक फोन वाजला संबंधित स्त्रीचा फोन होता . हॅलो , मी म्हटले , ती म्हणाली संख्या सांगू का ? सांगा , मी म्हटले.  तिने ४५ हि संख्या सांगितली आणि फोन  ठेऊन दिला.माझे विचारचक्र सुरु झाले ४५ या सांख्येवरुन काय अर्थ बोध होतो का ? ४ हि संख्या घर दाखविते ५ हि संख्या घेणाऱ्या व्यक्तीचे ( ७) लाभ स्थान आहे  आणि ४व ५ ची बेरीज केली तर ९ येते. ९ हि संख्या घेणाऱ्या व्यक्तीचे ३ स्थान  ३ ऱ्या स्थानावरून कागदपत्रे ,दस्ताऐवज याचा अर्थबोध होतो.मनात  म्हटले  जागा विकली जाणार  परंतु ४५ या संख्येवरून कुंडली काढली तर मिथुन लग्न येणार . मिथुन म्हणजे द्विस्वभाव रास . घटना लवकर घडणार नाही . वेळ लागणार . कारण चर लग्न असते तर घटना लवकर घडली असती स्थिर लग्न असते तर घटना उशिरा घडली असती. पण द्विस्वभाव राशीला याच्या मधील वेळ लागेल. मनात म्हटले घरी गेल्यानंतर पाहू.

         मी के.पी. नंबर ४५ यावरून कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली
दि . १५/१/२०१९ वेल. २१-१८-४७ (रात्री ) फलटण

त्यावेळेचे रुलिंग खालीलप्रमाणे
L --रवी S --शुक्र R --मंगळ D --मंगळ

या कुंडलीत त्यांच्या मनातील विचार जुळतो का ते पाहू . चंद्र हा मनाचा कारक आहे . चंद्रावरून आपल्याला त्यांच्या मनाचा कानोसा घेता येईल. चंद्राचे कार्येशत्व ...

PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- (11)   (3)
It's N.Swami :-------- Venus:- (6)   (12)
It's Sub :------------ Mars:- (10)   6
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (7)   (9) 10     Mercury-Yuti  (7)   (1) 2 (5)
Itself aspects :------ 5

चंद्र पहिल्या पायरीला लाभाचा कार्येश आहे लाभ व्हावा हि पेक्षा असणे गैर नाही दुसऱ्या पायरीला ६ आणि १२ भावाचा कार्येश आहे  ६ भाव घर घेणाऱ्याची गुंतवणूक व १२ भाव हे घर विकून मिळाणाऱ्या पैस्याची गुंतवणूक  करायची दर्शवितात तिसऱ्या पायरीला १० भाव हे घेणार्यांचे घराचे स्थान  ४ त्या पायरीला ७,९,५ भाव आहेत ७ भाव घेणारी व्यक्ती, ५ भाव घेणार्यांचे लाभ स्थान , ९ स्थान घेणार्यांचे त्रितिय स्थान आहे त्रितिय स्थान कागदपत्रे दस्त हे भाव दर्शवितात. याचा अर्थ प्रश्न बरोबर आहे . 

दशम भावाचा सब १०, ५,६ भावाचा कार्येश असेल तर १०,५,६ भावांच्या संयुक्त दशे मध्ये घराची विक्री होईल.

या पत्रिकेत दशमभावाचा सब केतू आहे . केतुचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ... 

 PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- (8)    Cusp Yuti: (8)      Rashi-Swami Saturn (7)   (9) 10  Sun-Yuti  (8)   (4)
It's N.Swami :-------- Sun:- (8)   (4)  Cusp Yuti: (8)       Ketu-Yuti  (8)    Rahu-Drusht  (2)  
It's Sub :------------ Jupiter:- 6   7 8 11   
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (7)   (1) 2 (5)     Saturn-Yuti  (7)   (9) 10
Itself aspects :------ 2

केतू १,४,५,७, ८ ९ भावाचा कार्येश आहे केतू आपणाला हव्या असलेल्या ५ या भावाचा कार्येश आहे . घराची विक्री होणार हे निश्चित झाले 

भाव ५,८ हे घर घेणाऱ्या व्यक्तीला अनुकूल आहे . ह्या स्त्रीला प्रतिकूल आहे . याचा अर्थ अपेक्षेएवढी किंमत मिळणार नाही . कमी किमतीला विकावी लागेल. आता हव्यवहार केंव्हा होईल ह्यासाठी दशा अंतर्दशा पाहाव्या लागतील
प्रश्न पाहतेवेळी शुक्र महादशा मध्ये मंगळ अंतर्दशा १८ जानेवारी २०२० पर्यंत आहे
शुक्र मंगल चे कार्येशत्व

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 6   12
It's N.Swami :-------- Saturn:- (7)   (9) 10     Mercury-Yuti  (7)   (1) 2 (5)
It's Sub :------------ Rahu:- (2)    Cusp Yuti: (2)      Rashi-Swami Moon (11)   (3)  Sun-Drusht  (8)   (4)
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (6)   7 8 11
Itself aspects :------ 12

PLANET : MARS
Itself :-------------- Mars:- (10)   6   
It's N.Swami :-------- Saturn:- (7)   (9) 10     Mercury-Yuti  (7)   (1) 2 (5)
It's Sub :------------ Jupiter:- 6   7 8 11   
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (7)   (1) 2 (5)     Saturn-Yuti  (7)   (9) 10
Itself aspects :------ 4 1 5

शुक्र आपणाला हव्या असलेल्या ५,६ भावाचा कार्येश आहे व मंगळ ५,१० भावाचा कार्येश आहे आता विदशा अशी निवडायची ती जास्तीत जास्त भावाची कार्येश आहे सर्व भांवाचे कार्येशत्व पाहता चंद्र सर्व भावांचा कार्येश आहे 

PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- (11)   (3)   
It's N.Swami :-------- Venus:- (6)   (12)   
It's Sub :------------ Mars:- (10)   6   
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (7)   (9) 10     Mercury-Yuti  (7)   (1) 2 (5)
Itself aspects :------ 5

चंद्र १,३,५,६,७,९ १० ११ १२भावांचा कार्येश आहे 
यामध्ये ५,६,१० भाव घर घेणाऱ्या साठी अनुकूल आहेत , १,११,१२ हे भाव घर विकणार्यांसाठी अनुकूल आहेत. 

हा व्यवहार शुक्र मंगल चंद्र म्हणजेच १३/१२/१९ ते १८/१/२०२० या कालावधीत होईल . 
रुलिंग मधील सर्व ग्रह शीघ्र गतीचे आहेत म्हणून हा कालावधी निवडला आहे . 

परंतु हि कुंडली मिथुन लग्नाची आहे . मिथुन लग्न म्हणजे द्विस्वभाव राशी . लग्न जर चर राशीचे असेल तर घटना लवकर घडेल. लग्न स्थिर राशीचे असेल घटना उशिरा घडेल आणि द्विस्वभाव राशीचे असेल तर यामधील काळात घटना घडेल म्हणे फार उशिरा नाही आणि फार लवकर घडणार नाही . म्हणून सद्य चालू असलेली शुक्र मंगळ अंतर दशेमध्ये घटना घडेल च याची खात्री देता येणार नाही . त्यासाठी आपणाला पुढील अंतर्दशा घ्यावी लागेल. पुढील अंतर्दशा राहूची आहे . राहू चे कार्येशत्व ....

PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (2)    Cusp Yuti: (2)      Rashi-Swami Moon (11)   (3)  Sun-Drusht  (8)   (4)
It's N.Swami :-------- Jupiter:- (6)   7 8 11
It's Sub :------------ Rahu:- (2)    Cusp Yuti: (2)      Rashi-Swami Moon (11)   (3)  Sun-Drusht  (8)   (4)
It's Sub's N.Swami :-- Jupiter:- (6)   7 8 11
Itself aspects :------ 8

राहू  आपणाला हव्या असलेल्या ६ भावाचा कार्येश आहे . शुक्र ५,६ भावाचा कार्येश आहे . यामध्ये १० भाव लागत नाही . १० भाव फक्त चंद्र आणि मंगळ दाखवितात . जास्तीतजास्त भाव चंद्र दाखवितो म्हणून चंद्राची विदशा घातली चंद्राचे कार्येशत्व वर आपण पहिलेच आहे .

शुक्र राहू चंद्र दशेमघे १५/८/२०२२ ते १५/११/२०२२ या कालावधीत घडेल.
पाहू या काय होते ते ...
 महाजनांनी आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात. 

शुभम भवतु .


No comments:

Post a Comment